Slide Two
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे
मुलांचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय
सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र, भारत
Slide Two
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे
मुलांचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय
सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र, भारत
म.ए.सो. मुलांचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय
राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने १८६० मध्ये स्थापन झालेली पहिली शाळा म्हणजे म. ए. सो. मुलांचे विद्यालय. आज या शाळेला दीडशे वर्षापेक्षा जास्त उज्वल परंपरा आहे. या प्रशालेत कनिष्ठ महाविद्यालय १९७५ साली सुरू करण्यात आले. आद्य क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके, कै. वामन प्रभाकर भावे, कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी दि पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन या नावाने संस्था चालविण्यात पुढाकार घेतला.१९२८ मध्ये आजच्या भव्य वास्तूत शाळा भरू लागली.कला, क्रीडा, संस्कृती, शिक्षण, उद्योग, व्यवसाय आदी विविध क्षेत्रात शाळेच्या विद्यार्थ्यांनी ठसा उमटविला असून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी विषयी
ज्ञानतेजाचा विस्तार करून संपूर्ण जग प्रकाशमान करण्याची क्षमता असणारे विद्यार्थी घडविण्याची प्रक्रिया जिथे एकशे पन्नासपेक्षाही आधिक वर्षांपासुन निरंतर सुरु आहे, अशी पुण्यातील नामवंत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी. कै. न.र. महागांवकारांच्या वर्गामुळे १८६० साली प्रज्वलित झालेली आणि कै.बापूसाहेब भाजेकर यांनी तेवत ठेवलेली ही ज्ञानाजोत पुढे कै.वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर आणि आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी हातात घेतली.