महत्त्वाचे टप्पे

Important Stages

१८६०

कै.ना.रा. महागावकर यांनी आपले खाजगी वर्ग कै. बापू भाजेकर यांच्या 'नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' वर्गात सामील केले.

१८७४

कै. वामनराव भावे, कै. लक्ष्मणराव इंदापूरकर व कै. वासूदेव बळवंत फडके यांनी खाजगी वर्गांची पुनर्रचना करून ' दि पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' ची स्थापना केली. (गुरुवार दि.२४ सप्टेंबर १८७४).

१८७५

मॅट्रीक्यूलेशन परीक्षेत शाळेचा गंगाधर वासुदेव दातीर हा पहिला विद्यार्थी उत्तीर्ण. | सर जमशेटजी बॉरोनेट, संस्थेचे पहिले अध्यक्ष यांची शाळेस भेट (दि.३० ऑगस्ट १८७५)

१८८०

डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रकशन्स श्री. चॅटफील्ड यांनी खाजगी शाळांसाठी सरकारजवळ पैसे नाहीत असे कळवले. (१५ सप्टेंबर१८८०) जनरल लॉर्ड मार्क केर यांची शाळेस भेट.

१८८१

शाळेस मुंबई सरकारची मान्यता (दि.६ डिसेंबर १८८१-ठराव क्र.१८७२)

१८८४

सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून नोंदणी.

१८८७

संस्थेची कंपनी कायद्यान्वये नोंदणी.'पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन असोसिएशन'असे नाव देण्यात आले. (दि १९ नोव्हेंबर १८८७)

१८९३

संस्थेकरिता थत्ते वाडा विकत घेण्यात आला.

१९२२

संस्थेचे 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' हे नाव बदलून 'महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे' असे ठेवण्यात आले. (दि.१४/०६/१९२६)

१९२६

सदगुरु श्री नारायण महाराज, बेट केडगाव यांच्या शुभहस्ते सदाशिव पेठेतील पेरुगेट जवळील तीन एकर जागेवर शाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन(दि.१४/०६/१९२६)

१९२८

शाळा नवीन स्वतःच्या इमारतीमध्ये भरू लागली. (जून महिना)

१९२९

बांधकाम पूर्ण झाल्यावर कै. विठ्ठल सायन्ना यांनी दिलेल्या उदार देणगीबद्दल इमारतीस 'विठ्ठल सायन्ना बिल्डिंग' असे नाव देण्यात आले. (बलिप्रतिपदा-कार्तिक शु.१)

१९३४

शाळेचा हीरक महोत्सव संपन्न.

१९७४

शाळेचा शताब्दी महोत्सव संपन्न.

१९८३

अपंग एकात्म शिक्षण योजनेतून कर्णबधिर युनिट सुरू.

१९९०-९१

आयुर्विमा महामंडळ व सेंट्रल बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने एल. आय. सी वर्ग सुरू.

१९९९

शतकोत्तर रौप्यमहोत्सवनिमित्त 'आकांक्षा' स्मरणिका प्रकाशित.

२००१-०२

पुण्यात प्रथमच इ.५ वी पासून 'सेमी इंग्लिश' माध्यमाची तुकडी सुरु.

२००९-१०

इ.८ वी साठी 'तंत्रशिक्षण' विषयाची सुरुवात. | १९ नोव्हेंबर - संस्थेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचा उद्घाटन समारंभ संपन्न.

२०२० - १९

नोव्हेंबर २०२० संस्थेच्या शतकोत्तर हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अभिवादनयात्रेत संस्थापकांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा चरित्ररथ.