यशस्वी मुख्याध्यापक

मुख्याध्यापकांची गौरवशाली परंपरा

पुण्याच्या इतिहासातील अभिमानाने सांगावी अशी एक घटना २४ सप्टेंबर १८७४ रोजी घडली. या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी अनंत यातना भोगल्या ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके तसेच कै. वामन प्रभाकर भावे, कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर हे दोन देशाभिमानी शिक्षक यांच्या त्रयीने या शाळेची स्थापना केली. कै. वा. प्र. भावे हे या शाळेचे पहिले मुख्याध्यापक, निःस्वार्थ वृत्ती, कार्याविषयी निष्ठा, विद्यार्थ्यांविषयी जिव्हाळा, शिक्षणाची तळमळ अशा गुणांनी समृद्ध मुख्याध्यापकांची परंपरा हे या शाळेचे भूषण आहे.