प्राचार्यांचा संदेश

नमस्कार

महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीचे मुलांचे विद्यालय हे पेरूगेट भावे हायस्कूल या नावानेच प्रसिद्ध आहे. आपल्या संस्थेची स्थापना १८६० सालची असून संस्थेची पहिली शाळा म्हणून प्रशालेचा नावलौकिक आहे. १६१ वर्षांची परंपरा लाभलेली अशी संस्था व शाळा संपूर्ण महाराष्ट्रात असेल असे मला वाटत नाही . अशा या सर्वांत दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या प्रशालेत आपण प्रवेश घेतला त्याबद्दल प्रशालेच्या वतीने मी तुमचे स्वागत करतो. आपल्या संस्थेचा विस्तार हा नावाप्रमाणे महाराष्ट्रभर विस्तारित होत . याचा आपणा सर्वांना अभिमानच वाटत आहे.

पुण्यनगरीतील सर्वात जुनी शाळा म्हणूनया या शाळेकडे पाहिले जाते ,त्याचे कारणही तसेच आहे. केवळ पुस्तकीशिक्षण न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे अधिक लक्ष देऊन एक सुजाण, आदर्श नागरिक घडावा, त्यांचे जीवनमान उंचावून समाजासाठीही त्यांचा उपयोग व्हावा, तसेच त्यांच्या अंगी राष्ट्रभक्ती रुजून उत्तम देशसेवा व्हावी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात कलागुणांनी नावलौकिक मिळवावा हेच प्रशालेचे ध्येय आहे.  आत्तापर्यंत या प्रशालेचे नामांकित विद्यार्थी सर्वच क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्त्वाने गगनभरारी घेत आहेत,  त्यापेकी , शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ श्रीराम लागू, डॉ. नीतू मांडके, श्री. प्रसाद ओंक,  सुहास बहुलकर, संदीप खरे, सचिन पुणेकर, डॉ. सतीश ओगले इ. अगदी अलीकडच्या साहित्य, कला, क्रीडा, बांधकाम, उद्योजक, राजकीय, सामाजिक या सर्व क्षेत्रातील नाव कमावणारे कित्येक माजी विद्यार्थ्यांची नावे सांगता येतील.

आपल्या प्रशालेमध्ये इ.५ वी ते १२वी पर्यत  शिक्षण दिले जाते. काळाची गरज ओळखून प्रत्येक इयत्तेच्या दोन तुकड्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या केल्या आहेत. शिवाय इ.५ वी ते ७ वी चा एक वर्ग दुपार विभागात भरवला जातो. पालकवर्गाची वेळेची सोय म्हणून हा बदल केला आहे.  बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा वापर म्हणून प्रेशलेतील एकून ११ वर्ग digital केले आहेत. त्यामुळे अध्यान सुलभ व आनंददायी होत आहे.

विशेष अभिमानाच्या बाब म्हणजे २०१३-१४ पासून आजपर्यंत इ.१२ विचा निकाल १००% लागत आहे. तसेच इ.१० वीचा ही निकाल ९५ टक्के च्या पुढे लागत आहे. विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा म्हणून टेक्नीकल विभाग सुरू केला आहे. तसेच दिव्यांग व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असे युनिट आपल्याकडे आहे. शाळेचे भव्य ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा व भव्य सुधारित क्रीडांगण, भव्य ऐतिहासिक दगडी वास्तू आपणा सर्वांना खुणावत आहे. आम्ही सर्वजण आपल्या स्वागतास उत्सुक आहोत.

शुभेच्छा आणि लवकर भेटू            

 प्राचार्य

श्री. वसावे सायसिंग मालजी

म. ए. सो. मुलांचे विद्यालय आणि उच्च माध्य. विद्यालय,

पुणे-३०