शाळेबद्दल

mes-mulanche-vidyalay-pune

प्रशालेची माहिती

राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने १८६० मध्ये स्थापन झालेली पहिली शाळा म्हणजे म. ए. सो. मुलांचे विद्यालय. आज या शाळेला दीडशे वर्षापेक्षा जास्त उज्वल परंपरा आहे. या प्रशालेत कनिष्ठ महाविद्यालय १९७५ साली सुरू करण्यात आले. आद्य क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके, कै. वामन प्रभाकर भावे, कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी दि पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन या नावाने संस्था चालविण्यात पुढाकार घेतला.१९२८ मध्ये आजच्या भव्य वास्तूत शाळा भरू लागली.कला, क्रीडा, संस्कृती, शिक्षण, उद्योग, व्यवसाय आदी विविध क्षेत्रात शाळेच्या विद्यार्थ्यांनी ठसा उमटविला असून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. आपल्या प्रशालेचा हा ‘विश्वसंचार ‘ नक्कीच  गगनाला गवसणी घालणारा आहे. याचा आपल्याला अभिमान आहे. प्रशालेच्या इमारतीचे अंतर्गत नूतनीकरण करण्यात आले असून, अद्यावत संगणक प्रयोग शाळा, तंत्रज्ञान कार्यशाळा, विविध खेळांचे प्रशिक्षण, स्पोकन इंग्लिश इ. नवीन विषय काळाची गरज ओळखून सुरू केले आहेत.. शाळा. अशा प्रकारे महाराष्ट्रात शाळा खूप लोकप्रिय झाली . ही समाजातील एक आदर्श शैक्षणिक संस्था आहे.