मुख्याध्यापकांची गौरवशाली परंपरा
१८७४ साली पुणे 'पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन'या प्राचीन व सुप्रसिद्ध विद्यालयाची स्थापना केली. या शाळेला सरकारकडून केवळ शिक्षणविषयक बाबतीत मान्यता मिळाली. पण अनुदान रूपाने होणारी मदत मात्र कित्येक वर्षे शिक्षणखात्याकडून मंजूर होईना. रा. भावे यांच्या सत्त्वपरीक्षेचा हाच काल होता. या काळात अत्यंत स्वार्थत्यागाने, चिकाटीने, काटकसरीने व धोरणाने वागून रा. भावे यांनी संस्थेचे रक्षण केले.
रा. भावे अत्यंत खटपटी, मेहनती व धोरणी होते. शाळेची भरभराट कशी होईल याकडे त्यांचे बहुतेक लक्ष असे. आपल्या संस्थेला थोर थोर लोकांचा आश्रय कसा मिळविता येईल या योजनेत ते गर्क असत. ब्रिटिश हिंदुस्थान सरकारचे दक्षिण भागाने सेनापती लॉर्ड मार्क केरसाहेब यांचा लोभ संपादन करून शिक्षणखात्याकडून पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशनला सरकारी अनुदान मिळवले. त्यांच्याच काळात बादशहाचे काका ड्युक ऑफ कॅनॉट यांच्या भेटीचा अलभ्य लाभ शाळेला घडला. लॉर्ड हॅरिस, लॉर्ड रे इ. गव्हर्नर मंडळी, अनेक राजे महाराजे तसेच इतर थोर मंडळीनीही शाळेस भेट दिल्या व संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. रा. भावे यांच्या कारकिर्दीत संस्थेची भरभराट होत गेली. सुदैवाने त्यांना साहाय्य करणारी शिक्षक मंडळी फारच चांगली मिळाली होती.
रा. वामनराव भावे यांच्या नेतृत्त्वाखाली विद्यालयाची आणि संस्थेची उत्तम वाढ होऊन, शिक्षणाचे कार्य सफल झाले. तेव्हा अशी शिक्षणसंस्था दिर्घकाल टिकावी अशा उदार बुद्धीने रा. वामनरावांनी सदर मालकीची शाळा सार्वजनिक स्वरूपाची केली. संस्थेच्या कामासंबंधी नियम ठरवून घेऊन नेटिव्ह इन्स्टिट्यूशन असोसिएशनच्या ताब्यात दिली.
संस्थेच्या कामात त्यांनी चांगले यश मिळवले व चांगला नावलौकिक मिळविला. त्यांची लोकप्रियता इतकी होती की, त्यांनी स्थापन केलेल्या पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशन या शाळेला लोक 'भावे स्कूल' म्हणत व आजही म्हणतात.


१९१० पासून शाळेत संस्थेचे आजीव सभासद होते. ऑगस्ट १९१२ते१९१४ पर्यंत शाळेचे मुख्याध्यापक होते.
संस्थेचे आजीव सभासद होते. ऑगस्ट १९१४ मध्ये रा. जोशी शाळेचे मुख्याध्यापक झाले. श्री. जोशी यांच्या कारकिर्दीत १९१५ सालात १८९८ साली मंजूर केलेली असोसिएशनची घटना बदलण्यात आली. ती अमान्य झाल्यामुळे रा. जोशी यांनी जून १९१६ मध्ये राजीनामा दिला. त्यांच्या काळात डेक्कन जिमखान्यातर्फे झालेल्या शिमगा स्पोर्ट्समध्ये शाळेला कुस्त्यांची ढाल मिळाली. तसेच रस्सीखेचचा विजयी चषक शाळेला मिळाला.
आजीव सभासद- रा. बापट मुख्याध्यापक झाल्यावर त्यांच्या लक्षात प्रथमच एक गोष्ट आली की शाळा व तिच्या शाखा उत्तम तऱ्हेने चालविण्यास उत्साही, तरतरीत, स्वार्थत्यागी व कर्तव्यदक्ष नवीन स्नेहयांची व शक्य तर माजी विद्यार्थ्यांची मदत आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करून त्यांनी माजी विद्यार्थीतील सहकारी जोडले. रा. बापट यांच्या कारकिर्दीत शाळेत पाली भाषा शिकविण्यास सुरुवात करण्यात आली होती.
१९१७ सांगली चालकांच्या प्रयत्नाने व डॉ. लददू व माजी विद्यार्थी यांच्या साहाय्याने १८९३ पासून रू.५५०० सगहाण असलेल्या विद्यालय भरत असलेला थात्तेवाडा मुक्त करण्यात आला व शाळेचा वाडा खरोखरच शाळेच्या पूर्ण मालकीचा झाला.
याच काळात रा. भोपटकर यांनी बी. टी. होण्यास पाठविण्यात आले. ससरकारमार्फत डायरेक्ट मेथडचा प्रचार करण्याकरिता शाळेत श्री. आचार्य यांनी व्याख्याने दिली व पाठ घेऊन दाखविले. या सर्वांचा परिणाम शिक्षणपद्धती सुधारण्याकडे झाला. सप्टेंबर महिन्यात मध्यभाग आयुक्त मि. सेडन, ऑनरेबल बी. एस. कामत व डॉ. सर. रा. गो. भांडारकर यांनी शाळेला भेटी दिल्या. डॉ. सर भांडारकर यांनी शाळेच्या व्यवस्थापनाचे तसेच शिक्षकांचे कौतुक केले. लहान वर्गात शिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डायरेक्ट मेथडमध्येही त्यांनी विशेष रस दाखविला.
१९१७ मध्ये ते आजीव सभासद होते.१९१९ च्या मार्च महिन्यात मध्यभाग आयुक्त मा. सेडन यांच्या हस्ते झालेल्या बक्षीस समारंभास डायरेक्टर ऑफ पब्लिक इंस्ट्रक्शन ऑनरेबल कॅनव्हंर्टन, पुणे जिल्हायाचे कलेक्टर मि. वेंस्ट्रप, गव्हर्निंग बोर्डाचे चेअरमन डॉ. मॅन, सरदार पुरंदरे, मा. कामत, मि. मॅकमिलन ई. मंडळी हजर होती. इमारतीसंबंधी केलेल्या प्रयत्नांचा इतिहास सांगून रू.२००० ची आश्वासने मिळाली असे जाहीर करण्यात आले. गंधर्व नाटक मंडळीने इमारत निधीसाठी एका नाट्य प्रयोगाचे उत्पन्न दिले. संस्थेने विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. बालगंधर्व यांस सोन्याचे पदक देऊन त्यांचा गौरव केला. शिवराज संगीत मंडळाचे मालक रा. टेंबे यांनीही इमारत निधी करिता खेळाचे उत्पन्न दिले. याच वर्षी जुने बाके काढून नवीन पद्धतीचे साहित्य करण्यात आले संस्थेने विद्यालय माजी विद्यार्थी श्री. बालगंधर्व या सोन्याचे पदक देऊन त्यांचा गौरव केला. शिवराज सांगी मंडळी चे मालक र. टिंबे यांनीही
इमारत निधी करिता खेळायचे उत्पन्न दिले. याच वर्षी जुनी बाके काढून नवीन पद्धतीचे साहित्य करण्यात आले. शास्त्र शिकवण्यासाठी उपकरणे घेण्यात आली .१९१९ च्या डेक्कन जिमखान्याच्या स्पोर्ट्समध्ये ज्युनिअर टीमला खो- खोचा चषक मिळाला. श्री.किंकर यांच्या नेतृत्त्वाखाली विद्यार्थी ग्रंथालय वेगळे करण्यात आली. ब्रम्हदेशातील शहा आलमखान यांच्याकडून मुसलमान विद्यार्थ्यास देण्याकरिता प्रतिवर्षी. रू.५० ची शिष्यवृत्ती ठेवण्यात आली.
आजीव सभासद- मार्च १९२० मध्ये त्यांनी मुख्याध्यापक पदाची सूत्रे स्वीकारली. या काळात संस्थेसाठी सोईस्कर जागा मिळावी म्हणून प्रयत्न चालले होते. सदाशिव पेठ भागात माध्यमिक विद्यालयाची उणीव आहे ही गोष्ट लक्षात घेऊन संस्थेच्या नियामक मंडळाने विद्यालय थत्ते वाड्यातून सदाशिव पेठेत हलविण्याचे ठरवले . त्याप्रमाणे हायस्कूलचे सर्व वर्ग सदाशिव पेठेत हलविण्याचे ठरविले. त्याप्रमाणे हायस्कूलचे सर्व वर्ग सदाशिव पेठेच्या हौदाजवळ रा. पटवर्धन वकील यांच्या वाड्यात नेण्यात आले. अशा प्रकारे शाळेचे कार्यक्षेत्र जे शहराच्या दक्षिण व पूर्व भागात होते ते पश्चिम भागात गेले.
सन १९२०-२१ सलातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांच्या पगाराचे जे प्रमाण होते ते बदलण्यात आले व नवीन पगाराचे प्रमाण अंमलात आणण्यात आले.
१९२० मुझे अजीव सभासद झाले. इंग्रजी विषय शिकविण्याची हतोटी चांगली असे. ऑगस्ट १९२२ मध्ये मुख्याध्यापक म्हणून सूत्रे स्वीकारली.
याच वर्षी नोव्हेबर महिन्यात झालेल्या खेळांच्या सामन्यांत शाळेच्या टीमने पुन्हा एकदा ढाल मिळवले. ढाल मिळविण्याची ही चौथी वेळ होती. या वर्षी क्रिकेटच्या सामन्यात सिनियर क्रिकेट ढाल मिळाली..१९२३ च्या ऑक्टोबर महिन्यात भरलेल्या मुंबई इलाखा रॅलीस शाळेचे महाराष्ट्र पथक, पुण्यातून पाठविण्यात आले होते.१९२२ साली श्रीमंत फलटणकर यांनी संस्थेस भेट देऊन समाधान व्यक्त केले.
१९२३ साली नागपूरचे राजे लक्ष्मणराव भोसले, सर युसुफ व ऑफिसर कमांडिंग सदर्ण डिव्हिजन ले. जनरल डब्ल्यू. मार्शल यांनी संस्थेस भेटी दिल्या. त्याचप्रमाणे ऑक्टोबरमध्ये मध्यभाग कमिशनर मि. हॅच यांनीही संस्थेस भेट दिली. मार्च १९२४ मध्ये रा. पटवर्धन यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्याध्यापक पदाचा राजीनामा दिला.
वरील कालावधीसाठी मुख्याध्यापकपदी पुन्हा नेमणूक.
इ. स. १९२५ मध्ये सदाशिव पेठ मराठी शाळेचे अधिक्षक झाले.१९३६ ते १९४३ या काळात श्री. किंकर शाळेचे मुख्याध्यापक होते. ते इंग्रजी उत्तम शिकवीत असत. ते अत्यंत प्रेमळ होते. शिक्षक म्हणून काम करीत असताना विद्यार्थी ग्रंथालय वेगळे करण्यात आली व त्याचे काम श्री. किंकर पाहत असत. मुख्याध्यापक असतानाही हा उपक्रम चालूच होता.
रील कालावधीसाठी ममुख्याध्यापपदी निवड झाली.
गणित हा त्यांचा आवडता विषय. विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लावण्यात त्यांचा हातखंडा होता. अध्यापक म्हणून शाळेत सुरुवात केली व १९४५ते १९४७ या काळात मुख्याध्यापक होते.
हे नानाकाका गोडबोले म्हणून शाळेत प्रसिद्ध होते. भूगोल हा त्यांचा शिकविण्याचा विषय. सर्वात उत्तम मुख्याध्यापक म्हणून त्या काळात विशेष प्रसिद्ध होते. शिक्षकांना पुढे जाण्यास नेहमीच प्रोत्साहन देत असत. त्यामुळे शिक्षकप्रिय होते. शिक्षकांची नाटके बसून घेत असत.
हे अत्यंत अल्पकाळ मुख्याध्यापक होते. पण त्यांच्या अत्यंत कडक शिस्तीच्या स्वभावामुळे शिक्षकांना आपल्या कामात सतत दक्ष राहावे लागत असे.
वरील कालावधीसाठी मुख्याध्यापकपदी पुन्हा निवड झाली.
वरील कालावधीसाठी मुख्याध्यापकपदी पुन्हा निवड झाली.
सेवेच्या १९५५ ते १९७५ या प्रदीर्घ कालखंडानंतर शाळेच्या इतिहासात मा. चि. रा. आठले सरांचे नाव मुख्याध्यापक म्हणून ठळकपणे नोंदले गेले आहे. २०वर्षाच्या प्रदीर्घ काळात मुख्याध्यापक म्हणून ते काम करत होते. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते. शास्त्र हा त्यांचा विषय. त्यांच्या कारकीर्दीत शाळेला चौफेर यश मिळाले. विद्यार्थी कला, क्रीडा, वक्तृत्तव, शालांत परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा या सर्व क्षेत्रात आघाडीवर होते. शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून ते जसे ओळखले जात, तसेच प्रेमळही होते. म्हणूनच शाळेच्या सर्व कार्यक्रमांना ते नेहमी आवर्जून येत असत.
शाळेत अध्यापक - २० वर्षे
पर्यवेक्षक – ३ वर्षे
मुख्याध्यापक – ४ वर्षे
गणित व शास्त्र शिकवण्याचे विषय.त्यांच्या काळात शाळेतील विद्यार्थ्यांनी शास्त्र विषयात बोर्डात पहिला अगर दुसरा क्रमांक मिळवून पारितोषिके मिळविली. शिक्षक असताना शारीरिक शिक्षणाचे शिक्षक म्हणून काम माध्यमिक शिक्षण मंडळात अनेक वर्ष पेपर सेटर, चीफ मॉडरेटर, चीफ कंडक्टर म्हणून काम.
उपक्रम - दिंडी स्पर्धा, स्वच्छ सुंदर शाळा योजना, शिक्षक- पालक सभा.
५ सप्टेंबर १९७८- महानगरपालिकेचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार.
अत्यंत शांत व सुस्वभावी असून विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. ते गणित व शास्त्र विषय शिकवत असत. शाळेत असताना १९५५ ते ७२ अध्यापक म्हणून, १९७२ ते ७९ पर्यवेक्षक म्हणून आणि १९७९ ते ८० मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले
16 जुन १९८० रोजी शाळेचे नवे वर्ष सुरू झाले ते नवे माननीय मुख्याध्यापक श्री. वि. मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली. शाळेत असताना ७ जून १९४८ ते मे १९५३ शिक्षक म्हणून, १ जून १९५३ ते ३० एप्रिल १९६९ बारामती येथे आणि १ मे १९६९ ते १५ जून १९८० ते १९८१ या अल्पकाळात ते मुख्याध्यापक होते. परंतु त्यांची कारकीर्द ठसा उमटवून गेली. त्यांचे अस्तित्व आदर आणि धाक निर्माण करणारे असे.
या पुण्यातील मुलांच्या नामवंत शाळेच्या पहिल्या स्त्री प्रमुख. त्याआधी सासवड येथील आपल्याच संस्थेच्या वाघिरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून काम पाहत होत्या. सौ. उकिडवे बाई शाळेत आल्यापासून शाळेतील विद्यार्थी दत्तक योजना, माजी विद्यार्थी संघटना इ. उपक्रम नव्याने सुरू झाले. त्यांच्या कार्यकालावधीत त्यांनी पर्यवेक्षकांचे कार्यालय प्रशस्त केले. शाळा सुशोभित केली. शाळा भरण्यापूर्वी अभंगांच्या ध्वनिमुद्रिका लावून उत्तम वातावरण निर्मिती केली. इ.८ बी च्या शास्त्र विषयाच्या प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन भरविले. प्रशासकीय अनुभव, मिळालेल्या राज्य पुरस्कार, अचुक नियोजन, गुणग्राहकता, कामाचा उरक व चिकाटी, सहकार्यांशी उत्तम सुसंवाद यामुळे शाळेची अधिक प्रगती झाली.
जून ८६ मध्ये सरांनी मुख्याध्यापकपदाची सूत्रे स्वीकारली. पुढच्याच वर्षी माध्यमिक शालांत परीक्षेत १२ विद्यार्थी गुणवंत्त्ता यादीत झळकले आणि समीर सुरेश महाजन हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम आला आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्य नावलौकिकात मोलाची भर पडली. त्याचवर्षी शाळेतील चि.अजय घोटवडेकर माध्यमिक शालांत परीक्षेत पुणे विभागात प्रथम आला व इतर चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. यांच्या कारकीर्दीत माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा कायम राहिली.
१ मे १९९४ पासून आपल्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सूत्रे स्वीकारली. मराठी, इतिहास व हिंदी हे त्यांचे अध्यापनाचे विषय. संस्थेच्या निरनिराळ्या शाखांमध्ये श्री. गोसावी यांनी मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक अशी जबाबदारीची पदे सांभाळली. तसेच सासवड आणि बारामती येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून होते. या दोन्ही शाळांची प्रगती त्यांच्या काळात झाली. श्री. गोसावी अत्यंत उत्साही व सतत कार्यरत असणारे मुख्याध्यापक होते. दि.५ सप्टेबर २००१ रोजी पुणे म.न. पालिकेतर्फेही आदर्श मुख्याध्यापक म्हणून सरांचा सत्कार करण्यात आला.
जून २००८ ते २०११ या काळात विद्यालयाची धुरा समर्थपणे संभाळली.
श्री. कांतीलाल अरनाळे यांच्या कार्यकाळात अनेक प्रशंसनीय नवोपक्रम राबविले गेले. जसे, विद्यार्थी संकल्प दिन, आंतरराष्ट्रीय योग दिवस, शिक्षक व विद्यार्थी यांच्या प्रगट मुलाखती, सीमेवरील सैनिकांसाठी राखी समर्पण सोहळा, क्रांतिकारक सप्ताह, आरती स्पर्धा, पाणी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक मुक्त तसेच ई- कचरा मुक्त पुणे, वाचन प्रेरणा दिन अशा निरनिराळ या विषयांवरील पथनाट्ये सादरीकरण,कोजागिरी निमित्त शिक्षकांचा सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी काव्यसंमेलन, स्टॅच्यू स्पर्धा, मातृ-पितृ दिन, एक मुष्टी धान्य योजना आंतरराष्ट्रीय महिला दिन, पालक शाळा, इयत्तेनुसार विज्ञान प्रदर्शन, पीपीटी निकाल सादरीकरण, कृतिसंशोधन सादरीकरण, डिजिटल शाळा, ओझ्याविना दप्तर अभियान इ.
M.A.B.P.Ed
मा. श्री. भारमळ यांनी संस्थेच्या विविध शाळांच्या मुख्याध्यापकपदी जबाबदारी पार पाडली आहे. संस्थेच्या म. ए. सो. ज्ञानमंदिर कळंबोली येथील प्रशालेत मुख्याध्यापक म्हणून कार्य करीत असताना त्यांच्या शिस्तप्रिय दृष्टीने प्रशालेच्या चेहऱ्यात अमूलाग्र सकारात्मक बदल झाला. अत्यंत शिस्तप्रियतेमुळे २०१७ या शैक्षणिक वर्षापासून प्रशालेतील प्रवेशांमध्ये सातत्यपूर्ण वाढ होत आहे. या ख्यातनाम प्राचार्यांना २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षात पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'आदर्शक्रीडाशिक्षक'या पुरस्काराने गौरविण्यात आले.२०१९-२० या शैक्षणिक वर्षातच जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीतर्फे (टी. डी. एफ) शिक्षक दिनानिमित्त दिला जाणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार तसेच २०२० मध्ये गुरुकुल संस्थेतर्फे दिला जाणारा 'विद्यालंकार पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले आहे.
श्री. बी.डी.शिंदे सरांच्या कारकिर्दीची सुरुवात भावे हायस्कूल मध्ये झाली. विविध शाळांमधून शिक्षक, पर्यवेक्षक व मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी पार पाडत सेवापूर्तीही भावे हायस्कूल मध्येच झाली. सरांचा स्वभाव हसतमुख, मैत्री व स्नेहभाव जपणारा होता. शिक्षक ते मुख्याध्यापकांपर्यंतच्या प्रवासात राष्ट्रप्रेम, विद्यार्थ्यांमध्ये मातृभूमी विषयी प्रेम, सचोटी, स्वयंशिस्त ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे यासाठी सर कायम तत्पर राहिले. सरांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी होते. प्रशालेमध्ये राबवलेले पोखरण प्रकल्प, कारगिल प्रकल्प, सरस्वती भांडार प्रकल्प, ‘इथे मराठीचिये नगरी’ यासारख्या अनोख्या प्रकल्पांमधून सरांची उपक्रमशीलता व सर्जनशीलता प्रामुख्याने दिसून येते.
श्री. सय्यद सर अत्यंत शांत, संयमी, कष्टाळू वृत्तीचे व संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक होते. विविध शाळांमध्ये सरांनी शिक्षक ते पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक पदापर्यंत पदोन्नती मिळवली. प्रशालेच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी सर सतत प्रयत्नशील राहिले. प्रशालेमध्ये संत सप्ताह, सावित्रीबाई फुले दत्तक योजना, जागर अध्यापनाचा इत्यादी अनेक उपक्रम राबवले होते.
मा.श्री. वसावे सायसिंग मालजी (आपल्या शाळेत मुख्याध्यापक २०२४ ते आजतागायत )
श्री. वसावे सर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात म ए सो विद्यालय बारामती प्रशालेत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याच्या पवित्र कार्याला सुरवात केली आणि नंतर जून 2014 ला उपमुख्याध्यापक म्हणून म ए सो वाघिरे विद्यालय सासवड येथे कार्यरत होते, नोव्हे.2014ते मे 2015 बारामती विद्यालयात उप व प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम केले तसेच जुन 2015 ते मे 2017 या कालावधीत म ए सो रेणुका स्वरूप प्रशाला पुणे येथे उपमुख्याध्यापक व प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम केले आणि नंतर पदोन्नती होऊन जून 2017 ते एप्रिल 2024 पर्यंत एकूण सात वर्षे म ए सो रेनाविकर माध्यमिक विद्यालय नगर येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते .सर हे अतिशय मृदुभाषी, कार्य तत्पर आणि शिस्तप्रिय व दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत असतात.विद्यार्थी गुणवत्ता कडे जातीने लक्ष देतात.अद्ययावत तंत्रज्ञानाविषयी सरांना सखोल ज्ञान आहे. तसेच प्रशासकीय कामे व शासकीय ऑनलाईन प्रणालीचेही सरांना ज्ञान आहे. सर खो खो व 100मीटर धावणे या खेळात सलग तीन वर्षे विद्यापीठ खेळाडू आहेत.