शाळेच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे व विशेष उल्लेखनीय घटना
कालखंड १ ते २५ वर्षे (१८६० ते १८८५)
- स्थापना – १८६० महागावकर यांचे शिकवणी वर्ग सुरू झाले. ते त्यांना बापू भाजेकर यांच्याकडे सोपवले.
- ३० ऑगस्ट १८७५ – सर जमशेटजी बॅरोनेट(सी. एस. आय) यांनी शाळेला भेट दिली. प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. पुढे या संस्थेचे अध्यक्षस्थान आनंदाने स्वीकारले.
- १८८४ – श्री. विष्णू बळवंत गोखले हे मॅट्रिक परीक्षेत दुसरे. जगन्नाथ शंकरशेठ पारितोषिक मिळवणारे स्कॉलर. परिणाम १८८४ मध्ये ३५० विद्यार्थी होते, ते १८८५ मध्ये ६५०-७०० विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला. त्याचवेळी मुंबई इलाख्याचे गव्हर्नर सर जेम्स फर्गसन (के. सी. बी., के. सी. आय. इ.) यांनी या संस्थेला भेट देत कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
- सयाजीराव महाराज गायकवाड – यांची संस्थेला भेट.५०० रू. देणगी म्हणून पाठवले.(दि ०४/०८/१८८५)
- २०/१०/१८८५ रोजी मे. जमशेटजी पेटिट यांनी ५०० रू. चा तर सर दिनशा माणिकजी पेटिट यांनी १०००रू चा पोर्ट ट्रस्ट बॉन्ड संस्थेला दिला.
- १७/११/१८८५ रोजी त्यावेळचे डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन मि. लीं. वॉर्नर यांनी शाळेस भेट दिली व संस्थेवर विश्वास प्रगट करणारा शेरा लिहिला.
- सन १९८५ मध्य वि.ना. भोर जन्मांध विद्यार्थी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला. कोल्हापूर दरबारकडून त्यास द. म. रू १५ ची शिष्यवृत्ती सुरू झाले.
दुसरा टप्पा-(१८८६ ते १९१०)
- ५/१०/१८८६ रोजी हीज रॉयल हायनेस ड्युक ऑफ कॅनॉट यांनी शाळेस भेट दिली. त्यावेळी त्यांनी समाधान व्यक्त करून संस्थेस भरभराट व सुयश मिळेल अशी आशा व्यक्त केली. २४ सप्टेंबर१८७४ पासून केलेल्या प्रयत्नांस १२ वर्षांनी यश मिळाले.
- १९/११/१८८७ रोजी ही संस्था कंपनीच्या कायद्यान्वये नोंदण्यात आली. संस्थेची वाढ होऊन संस्थेचे नाव दि पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन असोसिएशन असे ठेवण्यात आले व संस्थेचे ध्येयधोरण अधिक व्यापक करण्यात आले.
- सर जमशेटजी जिजाबॉय बॉरेनेट हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. खानबहादूर दस्तुर हुशंग जमारच, पी. एच. डी. हे चेअरमन होते.
- २० जानेवारी १८८८ रोजी पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशनचे वार्षिक नोंदणी रद्द होऊन ही शाळा कायमची नोंदली गेली. संस्था स्थिर होण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट झाली.
- फेब्रुवारी १८८८ रोजी हीज हायनेस दि. महाराज ऑफ म्हैसूर यांनी शाळेला भेट दिली. त्यांनी अभिप्रायात संपूर्णपणे स्थानिक (मॅनेजमेंट) व्यवस्थापनाखाली ८०० विद्यार्थी साहित्य, तंत्रज्ञान व शास्त्र विषयाचे शिक्षण घेत आहेत म्हणून पुण्याचे, संस्थेचे अभिनंदन केले. ह्या शाळेची वव्यवसायभिमुख आणि वाढती उपयुक्तता तशीच टिकावी अशी इच्छा व्यक्त केली.
- १८८८ मध्ये हीज हायनेस ऑफ त्रावणकोर यांनी शाळेस भेट दिली.
- ३ मार्च १८८८ मध्ये हिज रॉयल हायनेस दि. डयूक ऑफ कॅनॉट यांनी शाळेला पुनर्भेट दिली. शाळेचा बक्षीस समारंभ त्यांच्या हस्ते झाला.
- १९८८ मध्ये जामखिंडीचे अधिपती श्री. रामचंद्ररावसाहेब सरकार यांनी भेट दिली व भावे यांच्या गरिबास विद्याज्ञान
देण्याच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. दुसऱ्याच दिवशी सावंतवाडीचे सरदेसाई यांनी भेट दिली व समाधान व्यक्त केले. या वर्षात शाळेचे नाव सर्वदूर प्रसिद्ध झाले. - १८८९ मध्ये श्रीमंत गंगाधरराव पटवर्धन, विद्यमान अधिपती, मिरज संस्थान तसेच श्रीमंत महाराज छत्रपती, कोल्हापूर यांनी शाळेत भेट दिली व समाधान व्यक्त केले. याच कालावधीमध्ये शाळेची स्वतंत्र इमारत असावी म्हणून प्रयत्न चालू होते. त्या अनुषंगाने हिज एक्सलन्सी दि राईट ऑनरेबल लॉर्ड हॅरीस यांनी भेट दिली व त्यांचे
- हस्ते झालेल्या बक्षीस समारंभास खालील प्रमुख गृहस्थ उपस्थित होते. हिज एक्सलन्सी दि कमांडर इन चीफ मि. नेर्न, दि ऑनरेबल बर्डबबुड, कॉ. कॉकस, ए. डी. सी. कॅप्टन बोन्स, ए. डी. सी. ऑनरेबल क्रोबे, ऑन.मा. गो. रानडे, डॉ. भांडारकर, श्रीमंत विशाळगडकर, जनरल कॅनिंगहॅम, दिवाणबहादूर लक्ष्मण जगन्नाथ वैद्य, हीज एक्सीलनसी काद्री बेग, सरदार आनंदराव खंडेराव रास्ते, रा. व. नारायणभाई दांडेकर, विष्णु मोरेश्वर भिडे, मि. विश्वेश्वरच्या खा. ब. दस्तुर होषांग जमास्व , खा.ब. दोतिवाला , रा.ब. कुपुरस्वामी मुदलीयार इत्यादी.
- १८९० – मध्ये लक्ष्मण नारायण महागावकर हे दुसरे जगन्नाथ शंकरशेट स्कॉलर इलाख्यात ५ वे व पुणे सेंटरला पहिले आले.
- १८११ – वामन विश्वनाथ बापट हे पहिले जगन्नाथ शंकरशेट स्कॉलर झाले.
- १८९१ – दामोदर गणेश दाजी स्कूल फायनल इलाख्यात ३ रे व पुणे सेंटरला १ ले व सायन्स मध्ये एलिस पारितोषिक मिळाले.
- १८९२ – मोरेश्वर रघुनाथ आपटे ६ वे पुणे सेंटरला २ रे आले.
- १८९३ – वर्षअखेरीस संस्थेकरीता रा. थत्ते यांचा वाडा रू १५,००० स विकत घेण्यात आला.
- १८९६ – प्राथमिक शाळेची स्थापना झाली.
- १८९९ – वामन प्रभाकर भावे यांचे निधन.
- १९०१ – प्रांतधिपती लॉर्ड नार्थ यांनी शाळेस भेट दिली.
- १९०४ – शाळेचा आट्यापाट्याची ढाल मिळाली. तेव्हापासून भावे स्कूलचे नाव खेळाशी जोडले गेले.
- १९०५ – साली शाळेने क्रिकेटची ढाल मिळवली. अशा रीतीने या पंचवीस वर्षात संस्थेत प्राथमिक, दुय्यम व उच्च शिक्षण मिळू लागले. १८७४ साली १० विद्यार्थ्यांवर सुरूवात झालेल्या संस्थेत १००० विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले.