दिनांक 17/02/2025 रोजी आद्य क्रांतिकारक आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशालेमध्ये प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वसावे सर, उपमुख्याध्यापक श्री गवळे सर, ज्युनिअर कॉलेज प्रमुख श्री बागुल सर, शिक्षकवृंद आणि 11 वी च्या विद्यार्थ्यांनी प्रतिमापूजन करून आदरांजली वाहिली.
१४ फेब्रुवारी २०२५,शुक्रवार(माघ कृ द्वितीया) दिल्लीत पुन्हा प्रशालेचे नाव उजळले
📜 प्रवेश फेरी क्र 2️⃣
दि २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिनानिमित्त दिल्लीतील विश्वरूप एज्युकेशन तर्फे घेण्यात आलेल्या संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेत इ ५ वी ते इ १२ वी मधील ७० विद्यार्थी सहभागी झाले होते,त्यामधून २२ विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे तसेच प्रशस्तीपत्र मिळाले असून त्यांची नावे खालीलप्रमाणे
⏺️ इ ११वी ते १२ वी गट
१)पवार वैभव नितिन(१२ वी ब)
२)शिगवण यश प्रभाकर(११ वी अ)
३)पवार तुषार उदय(११ वी अ)
⏺️ इ ५ वी ते इ १० वी गट
१)जड्याल वेदांत विजय 5 ब
२)पवार प्रसन्न शरद 5 ब
३)रानवडे आदित्य दिपक 5 अ
४)वसाकरे वरद अभय 5 ब
५)आढाव आदित्य गोरख 5 ब
६)कांबळे खुशाल संतोष 5 ब
७)कुदळे आयुष राहुल 5 क
८)खान अर्शद वकील . 5 क
९)जाधव विराज अमित 5 ब
१०)तरडे शार्दुल सचिन 5 ब
११)बागवे विहान योगेश 5 अ
१२)बोडके रुद्र राजू 5 ब
१३)मोहोळकर रोशन भाऊसाहेब 5अ
१४)साळवी सोहम अनिल 5 ब
१५)सोनवणे श्रेयांश अमोल 5 अ
१६)कांबळे ओम सुनील 7 अ
१७)बडदे सूर्य महेश 7 ब
१८)मळेकर अथर्व संपत 9 ब
१९)तोरसे समर्थ प्रकाश 10 ब
*त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ चौधरी मॅडम,सौ हावळे मॅडम,सौ कांबळे ज्योती मॅडम,सौ चिप्पा मॅडम,सौ बधे मॅडम या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन.
स्पर्धेसाठी माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर,माननीय उपमुख्याध्यापक श्री गवळे सर,माननीय पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम,माननीय ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागुल सर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.
आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात; विद्यार्थ्यांचे औक्षण करून साखर वाटून स्वागत करण्यात आले .
आज दिनांक 30 जानेवारी 2025 वार गुरुवार रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त जुनिअर कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वर्गांच्या ग्रुप वर माहितीची pdf पाठविण्यात आली.

दिनांक 25 जानेवारी वार शनिवार रोजी जुनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्व जुनिअर कॉलेजच्या शिक्षिका सौ.जोशी कल्याणी यांनी सांगितले तर मतदार दिनाची शपथ इयता 11 वी अ मधील विद्यार्थी सिद्धराज आंद्रे याने म्हणवून घेतली. या मतदार दिनाच्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेतली होती त्यातून तीन क्रमांक व उत्तेजनार्थ क्रमांक काढले.प्रशालेचे उपमुख्याध्यापक माननीय श्री.गवळे सर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना
प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. उपमुख्याध्यापक सरांनी मतदार दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना थोडक्यात सांगितले. त्यानंतर तंबाखूमुक्त प्रशाला व परिसर या अतंर्गत तंबाखू मुक्त प्रशाला शपथ ज्युनिअर कॉलेज विभाग शिक्षक श्री वर्मा सर यांनी विद्यार्थ्यांकडून व शिक्षकांकडून म्हणवून घेतली.
दिनांक 23 जानेवारी वार गुरुवार रोजी प्रशालेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री.बागुल सर,जेष्ठ शिक्षिका सौ. कचरे मॅडम आणि सर्व शिक्षक वृंद यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन केले. इयत्ता 11 वी शास्त्र शाखेतील युवराज घोरपडे या विद्यार्थ्याने नेताजींच्या कार्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली.











शनिवार दि.11 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री.वसावे सर तसेच उपस्थित जुनिअर कॉलेज च्या शिक्षक वृदांनी व इयत्ता 11 वी च्या विद्यार्थ्यांनी प्रतिमा पूजन केले.
आज दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रतिमपूजन करून त्यांच्या महान कार्यास उजाळा देण्यात आला. ज्युनिअर कॉलेजच्या जेष्ठ शिक्षिका सौ.कचरे मॅडम यांनी तसेच सर्व शिक्षक वृंदानी प्रतिमा पूजन केले.
दिनांक 24 डिसेंबर 2024
वार- मंगळवार
एकूण सहभागी विद्यार्थी: 5 ते 12 वी 200 विद्यार्थी
वेळ - सकाळी 8.30 ते 9.30
स्थळ - प्र ल गावडे सभागृह
प्रेक्षक:- इयत्ता 5 ते 12 विद्यार्थी
प्रास्ताविक: सौ.कुलकर्णी
गीत: सौ. जोशी , सौ. निजसुरे
विरगाथा गोष्ट: सौ. सातपुते
समारोप: पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम
दिल्लीत प्रशालेचे नाव उजळले
दि २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिनानिमित्त दिल्लीतील विश्वरूप एज्युकेशन तर्फे घेण्यात आलेल्या संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेत इ ५ वी ते इ १२ वी मधील विद्यार्थी सहभागी झाले होते,त्यामधून ७ विद्यार्थी पहिल्या फेरीत उत्तीर्ण झाले आहेत.त्यांची नावे खालीलप्रमाणे
१)पवार वैभव नितिन(१२ वी ब)
२)शिगवण यश प्रभाकर(११ वी अ)
३)पवार तुषार उदय(११ वी अ)
४)कांबळे ओम सुनिल(७ वीअ)
५)बडदे सूर्या महेश(७ वी ब)
६)मळेकर अथर्व संपत(९ वी ब)
७)तोरसे समर्थ प्रकाश(१० वी ब)
त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ चौधरी मॅडम,सौ हावळे मॅडम,श्री गायकवाड बलभीम सर,सौ सातपुते मॅडम,सौ टपळे मॅडम,सौ कांबळे ज्योती मॅडम,सौ चिप्पा मॅडम,सौ बधे मॅडम,या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन.
स्पर्धेसाठी माननीय पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.
म. ए. सो. मुलांचे विद्यालय पुणे येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात साजरा
दि. 23डिसेंबर 2024रोजी प्रशालेच्या प्रांगणात सकाळी ठीक 9वाजता प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी 1968ची बॅच चे इंजिनियर श्री. श्रीकांत केळकर,शाला समितीअध्यक्ष श्री. दिलीप शेठ मुख्याध्यापक सायसिंग वसावे, उपमुख्यध्यापक श्री. चंदू गवळे, पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये 5वीते 12वी शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आजी, माजी विद्यार्थी, यांच्या उपस्थितीत साजरा झाला.
प्रस्ताविकातून उपमुख्याध्यापक श्री. चंदू गवळे यांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या कार्यक्रमातून यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा हेतू स्पष्ट केला. यानंतर प्रमुख पाहुणे व पदाधिकारी यांचे हस्तेआदर्श शिक्षक,विविध विषयात पारितोषिक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
प्रमुख पाहुणे श्री. श्रीकांत केळकर यांनी आपल्या मनोगतातून उत्तम नागरिक बना. प्रामाणिक पणे मेहनत करा असा संदेश दिला. तर अध्यक्षीय मनोगतातून श्री. दिलीप शेठ यांनी प्रयत्नांचे महत्व सांगून विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सौ. बोरा सुषमा यांनी तर आभारप्रदर्शन सौ. चौधरी यांनी केले. यापूर्वी साजरे झालेले क्रीडास्पर्धा उदघाटन, क्रीडास्पर्धा पारितोषिक वितरण, विविध गुणदर्शन,स्नेहभोजन,वार्षिक पारितोषिक वितरण या कार्यक्रमांनी शाळेच्या सन्मानात वाढ केली.
आज दि 21 डिसेंबर शनिवार रोजी प्रशालेत इ 5 वी ते 12 वी च्या विदयार्थ्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
सनईच्या सुरात जेवणाच्या पंक्तीपद्धतीने सुग्रास जेवण वाढण्यात आले. जिलेबी, मसालेभात, पापड, पोळी, मटारबटाटा रस्साभाजी असा बेत होता. सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने भोजनाचा आस्वाद घेतला.
म. ए. सो.मुलांचे विद्यालय येथे वार्षिक संमेलन सोहळा संपन्न
दि. 20/12/24 वार शुक्रवार
सरस्वती पूजनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात आणि मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे यांनी संमेलनाचा हेतू सांगताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्राविण्य प्राप्त व्हावी यासाठीच वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असतो हे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 2001 सालचे माजी विद्यार्थी व एके स्टुडिओचे संचालक अभिनेते श्री केदार आठवले यांच्या हस्ते प्रशालेतील विविध स्पर्धातील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. आपल्या मनोगता तून प्रमुख पाहुणे केदार आठवले यांनी कोणत्याही क्षेत्रासाठी कौशल्य मिळवणे आवश्यक असून असलेल्या कौशल्यात वाढ करण्यासाठी मेहनत करा हा प्रात्यक्षिकाद्वारे संदेश दिला. आभारप्रदर्शन प्रशाळेच्या शिक्षिका सौ. वामन यांनी व सूत्रसंचालन अमृता अरणके यांनी केले. कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक सायसिंग वसावे, उपमुख्याध्यापक चंदू गवळे, पर्यवेक्षिका रसिका लिमये यांचे सह सर्व पाचवी ते बारावीचा शिक्षक व शिक्षकेतरकर्मचारी वर्ग बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होता. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमातून पाचवी तेबारावी च्या विद्यार्थ्यांनी स्व ची जाणीव विकसित होणाऱ्या समता, बंधुता,एकता, देशभक्ती, संस्कृती इत्यादी मूल्यांवर आधारित मनोरंजक कार्यक्रम सादर केले. त्यात विविध भाषिक, प्रादेशिक, धार्मिक नृत्य, नाट्य, वादन या कार्यक्रमांचा समावेश होता.
म. ए. सो. मुलांचे विद्यालय येथे स्नेहसंमेलनानिमित्त स्टॅचू स्पर्धा संपन्न.
मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे सर यांच्या मार्गदर्शन उपमुख्याध्यापक श्री चंदू गवळे, पर्यवेक्षिका रसिका लिमये यांच्या संयोजनाने प्रशालेत ठीक अकरा वाजता क्रीडांगणामध्ये स्टॅच्यू स्पर्धा संपन्न झाल्या. माननीय मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे यांनी सर्व स्टॅच्यू स्पर्धकांना शुभेच्छा देताना सहभागाचे महत्त्व सांगितले. प्रास्ताविकातून ज्यु. कॉलेज प्रमुख श्री. बागुल सरांनी स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये एकता, संघ भावना, सहकार्य निर्माण करण्याचा हेतू स्पष्ट केला. प्रत्यक्ष स्टॅचू स्पर्धेत ज्युनिअर कॉलेजच्या सर्व वर्गांनी प्रत्येकी एक याप्रमाणे स्टॅच्यू तयार केला. त्यात आदिवासी, पंजाबी , मारवाडी, शेतकरी, केरळी, गोंधळी इत्यादी स्टॅचू तयार केले. प्रशालेचे शिक्षक श्री. पारे सरांनी परीक्षण केले. मुख्याध्यापक व पर्यवेक्षिका यांनी प्रत्यक्ष स्टॅचू स्पर्धेचे अवलोकन केले. अकरावीच्या गटात अकरावी क ( मारवाडी) तर बारावीच्या गटात बारावी क ( गोंधळी) या वर्गांनी यश संपादन केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या सौ. माया कुलकर्णी यांनी केले.
म. ए. सो. मुलांचे विद्यालय पुणे येथे वार्षिक क्रीडापारितोषिक वितरण समारंभ साजरा
दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी प्रशालेच्या क्रीडांगणावर ठीक चार वाजता माननीय प्रमुख पाहुणे अर्जुन पुरस्कारविजेते सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे, क्रीडावर्धिनी समन्वयक गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स चे माजी क्रीडा संचालक श्री शैलेश आपटे, शाला समिती अध्यक्ष श्री दिलीप शेठ, महामात्र श्री सुधीर गाडे, मुख्याध्यापक श्री वसावे सायसिंग , उपमुख्याध्यापक श्री चंदू गवळे, पर्यवेक्षिका रसिका लिमये, सर्व पाचवी ते बारावीचा शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रास्ताविकातून माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सायसिंग यांनी निरोगी मन आणि निरोगी शरीर यांची सांगड घालणाऱ्या घालणाऱ्या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा उल्लेख करून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याचा या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. प्रशालेचे क्रीडाशिक्षक श्री भाऊसाहेब खुणे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देऊन स्वागत केले. शिक्षक प्रतिनिधी श्री मनोज अनासपुरे यांनी शैक्षणिक वर्ष 2024-2025 अहवालाचे वाचन केले. त्यात अंतर्वर्गीय क्रीडा स्पर्धा,स्कूल ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा इत्यादीमध्ये विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाचा उल्लेख केला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रीय राज्य व विभागीय स्तरावर पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना गोल्ड,सिल्वर ब्रांझ मेडल, प्रमाणपत्र तसेच फिरती ढाल या स्वरूपात पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री राहुल आवारे यांनी आपल्या मनोगतातून सुसंगतीचे महत्त्व सांगून नाउमेद न होता शिस्तीने व सातत्याने प्रयत्नरत राहण्याचा संदेश दिला. तर शैलेश आपटे यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने कष्ट करण्याचा संदेश दिला. शाला समिती अध्यक्ष दिलीप शेठ यांनी क्रीडेचे जीवनातील महत्व सांगून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक श्री.चंदू गवळे यांनी कवितेच्या माध्यमातून केले.कार्यक्रमाचे पारितोषिकाचे यादी वाचन सौ सातपुते यांनी तर सूत्रसंचालन सौ.मंजुश्री शिंदे यांनी केले.
आज रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या इंडियन रेड क्रॉस सोसायटी अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेमध्ये म. ए. सो. मुलांच्या महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. एकूण 8 गट स्पर्धेमध्ये समविष्ट होते. पथनाट्याचा विषय व्यसनमुक्ती हा होता. ह्या पथनाट्याला सौ. कल्याणी जोशी व सौ. श्रुती निजसुरे यांनी मार्गदर्शन केले होते.
आज दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी क्रीडा भारती ( पुणे महानगर ) आयोजित बाल शिक्षण मंदिर , मयूर कॉलनी येथे झालेल्या रिंगोस्टिक आणि रस्सीखेच या दोन्ही खेळांमध्ये म. ए. सो. मुलांचे विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज मधील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यानी तृतीय क्रमांक मिळविला .
ज्युनिअर कॉलेज आदर्श विद्यार्थी निवड स्पर्धा
आज शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्यांची आदर्श विद्यार्थी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता 12वीतील तीनही तुकड्यांमधील आठ विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यासाठी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर, प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री हिंगसे सर व ज्येष्ठ शिक्षिका मॅडम सौ. चिप्पा मॅडम उपस्थित होत्या.
रविवार दिनांक ८डिसेंबर २०२४ रोजी नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन निंबध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये आपल्या प्रशालेमधून 5 वी ते 12 वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता या पालकांना रेडक्रॉस संस्थेविषयी ,पुणे जिल्हा शाखेचे मानद सचिव मा.श्री. आर. व्ही.कुलकर्णी सरांनी मौलिक आणि प्रेरक असे मार्गदर्शन केले.तसेच उपस्थित पालकांच्या प्रश्नांचे निरसन केले.
आज शुक्रवार 6 डिसेंबर 2024 रोजी म.ए .सो.मुलांच्या ज्युनिअर कॉलेज विभागात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. इयत्ता बारावी ब मधील चि.वेध चव्हाण या विद्यार्थ्याने महापरिनिर्वाण दिनाची माहिती सांगितली. तसेच या कार्यक्रमात आंतरवर्गीय रांगोळी, घोषवाक्य तसेच मराठी व इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.या कार्यक्रमास प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर ,ज्युनिअर कॉलेज प्रमुख श्री बागुल सर ,शिक्षक प्रतिनिधी सौ. कचरे मॅडम व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
आज बुधवार दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी म ए सो मुलांचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पुणे येथे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत रोड सेफ्टी या विषयावर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित केले होते. सदर व्याख्यानासाठी व्याख्याते म्हणून माननीय अनिल पंतोजी सर रिटायर्ड RTO इन्स्पेक्टर लाभलेले होते.
सरांनी अतिशय बहुमोल मार्गदर्शन करत वाहतुकीचे नियम, वाहतुकीची चिन्हे, हेल्मेटचा योग्य वापर कसा करावा, पादचारी म्हणून रस्त्यांचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, यासंबंधीची माहिती खूप प्रभावी पद्धतीने व्याख्यान तसेच PPT च्या माध्यमातून समजावून सांगितली.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री वसावे सर सर्व ज्युनिअर कॉलेज शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
आज 3 डिसेंबर 2024 जागतिक दिव्यांग दिनानिमित्त इयत्ता बारावी ब मधील पूर्वश करंदीकर याने अपंग दिनाची माहिती सांगितली.
आज दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी म.ए. सो. मुलांचे विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये एड्स दिनानिमित्त (1 डिसेंबर) व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्या व्याख्यानासाठी सौ .शिल्पा तोरो मॅडमना आमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर ज्युनिअर कॉलेज प्रमुख श्री बागुल सर व सर्व ज्युनिअर कॉलेज शिक्षक तसेच इयत्ता अकरावी व बारावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सौ शिल्पा तोरो मॅडम यांनी विद्यार्थ्यांना एड्स तसेच एचआयव्ही विषाणू बद्दल ची माहिती, त्याची कारणे व त्यासाठी काय खबरदारी घेऊन तो आजार आपण टाळू शकतो. याबद्दल सविस्तर माहिती सांगितली त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शंका देखील मॅडमना विचारल्या.
दि 30 नोव्हेंबर 2024 शनिवार रोजी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली . यामध्ये मुलांना राष्ट्रीय प्रतीके,राष्ट्र भक्ती, संविधान हे विषय देण्यात आले होते . ज्युनिअर कॉलेजच्या एकूण 32 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. ,मुलांना रांगोळ्या काढण्याचा मनसोक्त आनंद मिळाला.वरील उपक्रमासाठी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर,उपमुख्याध्यापक मा श्री. गवळे सर आणि पर्यवेक्षिका मा. सौ . लिमये रसिका,जूनियर कॉलेज विभाग प्रमुख मा.श्री बागूल सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.मा श्री म्हस्के सरयांनी परीक्षण केले. ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक व सौ चौधरी मॅडम यांच्या मदतीने हा उपक्रम संपन्न झाला.
म ए सो कलावर्धिनी तर्फे घेतल्या जाणाऱ्या `रंगवेध`स्पर्धेत १२ वी ब वर्गातील विद्यार्थी दुर्वेश राक्षे याने ज्युनिअर कॉलेज गटात उत्तेजनार्थ प्राप्त केल्याबद्दल प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर,ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागुल सर यांनी आज परिपाठात सर्व विद्यार्थ्यांसमोर ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले.इ १२ वी (ब) वर्ग शिक्षिका सौ चौधरी मॅडम.
म. ए. सो. कलावर्धिनी तर्फे आयोजित रंगवेध चित्रकला प्रदर्शन स्पर्धेत ज्युनिअर कॉलेज गटातून चि . दुर्वेश राक्षे इयत्ता १२ वी ब मधील विद्यार्थ्यास प्रथम पारितोषिक मिळाले.
दि. 28 नोव्हेंबर (गुरुवार )रोजी इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना जिंकी रे जिंकी हा चित्रपट म. ए. सो. मुलांचे विद्यालय येथे दाखवण्यात आला. चित्रपटाचा विषय खूपच प्रेरणादायी होता. या चित्रपटात कर्णबधिर मुलांच्या माऊंटेनिअरिंगच्या प्रशिक्षणाचे आणि प्रशिक्षणादरम्यान आलेले विविध हृदयस्पर्शी प्रसंग दाखवण्यात आले. आपल्या म.ए.सो. मुलांचे विद्यालय प्रशालेमध्ये अपंग एकात्म शिक्षण योजना राबवली जाते आपल्या प्रशालेतही कर्णबधिर विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे शिकवून त्यांचा विकास केला जातो.
आज दि 28 नोव्हेंबर 2024 गुरुवार रोजी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागूल सर,श्री खुणे सर,सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले व इ 11 वी अ मधील युवराज घोरपडे या विद्यार्थ्यांने महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली तसेच सौ सोनाली चौधरी मॅडम यांनी सामूहिकपणे संविधान वाचन करून घेतले.
आज दि 14 नोव्हेंबर 2024 गुरुवार रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागूल सर,तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी पंडित नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करताना.
Qualified for quarter final
M.E.S V/S SSPMS
SCORE :- SSPMS 85 RUNS IN 18.1 OVER
M.E.S BOYS 86 RUNS IN 9.3 OVERS
MES Boys' junior college WON THE MATCH
आज दि १८ ऑक्टोबर २०२४ शुक्रवार रोजी प्रशालेमध्ये इ ११ वी व इ १२ वी मधील सर्व विद्यार्थी,शिक्षक,सेवक वर्ग विद्यार्थांसाठी आपत्कालीन एकत्रीकरण प्रात्यक्षिक घेण्यात आले.विद्यार्थांना अचानक बेल वाजवून(धोक्याची घंटा) सुरक्षित ठिकाणी कमीत कमी पाच मिनिटांमध्ये संपूर्ण शाळा रिकामी करणे याबाबत कल्पना देण्यात आली व त्याप्रमाणे एकत्रीकरण प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. दोन मिनिटांत सर्व शाळा रिकामी करण्यात आली.कोणतीही आपत्ती आली तरी सर्वांनी याच पद्धतीने वागावे असे ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागूल सर यांनी सर्व विद्यार्थांना सांगितले.

आज दि 15 ऑक्टोबर 2024 मंगळवार रोजी डॉ ऐ पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो,यानिमित्ताने ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख श्री बागूल सर,जेष्ठ शिक्षिका सौ कचरे मॅडम तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानसाधनेत मग्न होते. म्हणूनच 15 ऑक्टोबर ही त्यांची जयंती "वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरी केली जावी याला विशेष औचित्य आहे. वाचन ही अशी सिद्धी आहे, की त्यामुळे आपल्याला एका हयातीत अनेक आयुष्ये जगता येतात. अनुभवविश्व व्यापक होतं. जाणीवा समृद्ध होतात. जीवनाचं आणि भवतालाचं आकलन अधिक सखोल होतं. मनाची अव्याहत मशागत करणारा आणि जीवनानुभवाचं अनवट दर्शन घडवणारा पुस्तकांसारखा दुसरा गुरू नाही. भाषेचा अभिजात गोडवा आणि आशयगर्भ कस याची नीजखूण वाचनामुळेच खोलवर पटत जाते.
आज रोजी प्रशालेमध्ये शासनाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले इयत्ता अकरावी व बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे सर यांच्या उपस्थितीत व आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय जाधव व त्यांच्या टीम यांच्याकडून मुलांची आरोग्य तपासणी करताना मुलांच्या आरोग्य विषयी तपासणी बरोबर आरोग्याची काळजी कशी घ्यावी या संदर्भात देखील मार्गदर्शन करण्यात आले.
दि 1 ऑक्टोबर 2024 मंगळवार रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागूल सर तसेच सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली. त्यानंतर इ 11 वी अ मधील विद्यार्थी सिद्धराज आंद्रे याने महात्मा गांधीजी यांच्या जीवनावरील प्रसंग,इ 11 वी अ मधील विद्यार्थी युवराज घोरपडे याने लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जीवनावरील प्रसंग,इ 12 वी क मधील विद्यार्थी प्रज्वल कुचेकर याने घटस्थापनेची माहिती सांगितली. तसेच 2 ऑक्टोबर गांधीजी जयंतीनिमित्त इ 11 वी ब मधील विद्यार्थ्यानी प्रशालेतील परिसर स्वच्छ करून घेतला.
दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी जुनिअर कॉलेज तर्फे महावाचन उपक्रम अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांकडून व शिक्षकांकडून शिक्षण विवेक पुस्तकाचे वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी आपण वाचन केलेल्या पुस्तकांचा थोडक्यात सारांश सांगितला.
म. ए. सो. मुलांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुणे मधील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील खेळाडू हर्षवर्धन रमेश खुणे याची (पंजाब) चंदिगड येथे चौदाव्या राष्ट्रीय हॉकी सब ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघात निवड झाली आहे. महाराष्ट्राचा हॉकी संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.
दिनांक 14 सप्टेंबर वार शनिवार रोजी गणेशोत्सवानिमित्त छत्रपती राजाराम मंडळ, हत्ती गणपती मंडळ यांच्यासमोर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 'व्यसनमुक्ती' या विषयावर पथनाट्य सादर केले.एकूण 14 विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साह पूर्ण सहभाग घेतला. प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्रीयुत वसावे सर तसेच ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्रीयुत बागुल सर हे व सहकारी शिक्षक श्रीयुत वर्मा सर उपस्थित होते. पथनाट्यास मार्गदर्शन ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका श्रीमती उबाळे मॅडम व सौ जोशी मॅडम यांनी केले.
'त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्व खल्विदं ब्रह्मासि असे म्हणत शुक्रवार (दि.१३) रोजी सकाळी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट'च्या बाप्पासमोर अथर्वशीर्ष पठण केले. सुमधुर आवाजात पंडित आनंद भाटे आणि डॉ. सलील कुलकर्णी यांनी अथर्वशीर्षाचे एक आवर्तन गायले.. त्यांच्या आवाजाने परिसरातील वातावरण प्रसन्न आणि भक्तीमय झाले होते. तसेच यावेळी पं. भाटे यांनी बालगंधर्व चित्रपटातील चिन्मया सकल हृदयात है गीत गायले. अथर्वशीर्ष पठणातील सहभागी Punit Balan Group महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुलांचे व उच्च मुलांच्या अथर्वशीर्ष पठाणाने परिसर भक्तीमय झाला होता. गणपतीचा जागर करत विद्यार्थ्यांच्या सुमधुर सामूहिक आवाजाने परिसर दणाणून गेला. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट आणि 'लोकमत सखी मंच'च्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष आयोजन पठणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवाप्रमुख पुनीत बालन, प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. आनंद भाटे, डॉ. सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी, लोकमान्य सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
५ सप्टेंबर २०२४ रोजी , सकाळ विभागात ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यानी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यात विद्यार्थ्यानी मुख्याध्यापक, उप- मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, सेवक अश्या विविध भूमिका साकारल्या . ईयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यानी ईयत्ता ११ वी तसेच ईयत्ता १२ वी विद्यार्थ्याना अध्यापन केले.
दि 3 सप्टेंबर 2024 मंगळवार रोजी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सामाजिक सुरक्षेविषयी मार्गदर्शन करताना , तसेच ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सामूहिक गायन स्पर्धेत उत्कृष्ट सहभाग नोंदविल्या बद्दल प्रशस्तिपत्र देऊन कौतुक करताना प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर.
इयत्ता ११ वी स्वागत समारंभ
आज प्रशालेत प्र. ल. गावडे सभागृहात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुप्रिया कचरे मॅडम यांनी केले, शिक्षक परिचय सौ. कल्याणी जोशी मॅडम यांनी केले तर विद्यार्थ्यांना सूचना श्री बागुल सरांनी सांगितल्या. माननीय मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी दोन वर्षात त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि या स्पर्धात्मक युगात ते कसे तयार होतील याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पेन देऊन त्यांचे प्रशालेत स्वागत करण्यात आले.
पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ.प्रभाताई अत्रे यांच्या नव्वदी पूर्ती प्रीत्यर्थ सुरू झालेली 'अमृतप्रभा समूहगीत गायन स्पर्धा'दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी मध्ये शुक्रवार दिनांक ९ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाली .आपल्या प्रशालेतील गट क्रमांक दोन इयत्ता ८ वी ते १०वी व गट क्रमांक तीन इयत्ता ११वी व १२वी च्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला, त्यामध्ये गट क्रमांक ८ वी ते १० वी मध्ये विद्यार्थ्यांनी 'सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू' ही प्रार्थना सादर केली तर ज्युनिअर कॉलेजच्या गटाने 'हम करे राष्ट्र आराधन' हे गीत सादर केले व आपला सहभाग नोंदवला. त्यांना मार्गदर्शन श्रीमती. सुवर्णा काळे मॅडम ,सौ.सुप्रिया कचरे मॅडम व श्री .पवनकुमार वर्मा सर यांनी केले.
दिनांक २१ जुलै २०२४ रोजी येणाऱ्या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दिनांक २० जुलै २०२४ शनिवार रोजी भावे हायस्कूलमध्ये ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यानी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी श्रीमती छाया उबाळे मॅडम यांनी गुरुपौर्णिमेची अतिशय सुंदर माहिती आणि महती मुलांना सांगितली. इयत्ता १२ वी ब मधील चि. अंश अडसूळ याने गुरुपौर्णिमेनिमित्त त्याला शिकविणाऱ्या शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली तर चि. आयान शेख याने आपल्या गुरूंवरील निष्ठा दाखविण्यासाठी गुरूंवर त्याची स्वरचित कविता सादर केली. नंतर विद्यार्थ्यानी गुरूंना श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.
बुधवार दि.17 जुलै 2024 रोजी येणा-या आषाढी एकादशी व मोहरम याचे औचित्य साधून प्रशालेत मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी सकाळी 7.00 वाजता परिपाठाच्या वेळेस आषाढी एकादशी व मोहरम चे महत्त्व ज्यु.काॅलेज शिक्षिका श्रीमती उबाळे छाया यांनी अतिशय प्रभावी व सुंदर शब्दांत सांगितले. यामध्ये त्यांनी आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात? त्यामागची पौराणिक कथा, वारीचा इतिहास व महत्त्व संत तुकारामांच्या काही अभंगातून सांगितले.तसेच आजच्या काळातही वारीचे महत्त्व काय आहे, वारीतून कोणती मूल्ये रूजवली जातात हे ही सांगितले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी मिळून विठ्ठल नामाचा जयघोष केला.
दिनांक १३ जुलै २०२४ रोजी प्रशालेत गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.श्री अ.ल. देशमुख सर लाभले होते. तसेच प्रशालेच्या शाला समितीचे अध्यक्ष श्री दिलीप शेठ, प्रशालेचे महामात्र श्री सुधीर गाडे व प्रशालेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत आम्ही शाळेला विसरू शकणार नाही असे सांगितले प्रमुख पाहुणे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा मूलमंत्र सांगितला. प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री भालचंद्र महादेव भिडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री समीरजी भिडे यांनी एक शिष्यवृत्ती जाहीर केली. त्या शिष्यवृत्ती अंतर्गत इयत्ता दहावीतील विज्ञान व गणित विषयात एकुणात प्रथम व मागासवर्गीय गटात एकुणात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रत्येकी पाच हजार रुपयांचे शिष्यवृत्ती देण्यात आलली. या कार्यक्रमासाठी श्रीमती भिडे देखील उपस्थित होत्या.
२१ जून २०२४ आंतरराष्ट्रीय योगदिन
21 जून 2024 रोजी प्रशालेच्या प्रांगणामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा. नगरसेविका सौ.गायत्रीताई खडके कार्यक्रमाचे व शाला समितीचे अध्यक्ष मा श्री.दिलीप शेठ क्रीडावर्धिनी समन्वयक श्री जयसिंग जगताप सर तसेच शाळेचे सर्व पदाधिकारी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना योग आहार याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी जीवनातील योगाचे महत्त्व सांगितले. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री.वसावे सायसिंग यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व व वर्षभर निरोगी आनंदी राहण्याकरता रोज योग प्राणायम व व्यायाम करावा असा संकल्प करण्यासाठी मार्गदर्शन केले. योग दिनाच्या कार्यक्रमाला 1000 विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी सहभागी होते अशा रीतीने योग दिन साजरा करण्यात आला.
शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी प्रशालेच्या प्र.ल.गावडे सभागृहात आगामी शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या संदर्भात सर्व शालेय पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी संकल्प घेऊन नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवात केली. पर्यवेक्षिका सौ विद्या शिंदे मॅडम यांनी संकल्पचा हेतू व्यक्त करून नववर्षाच्या सदिच्छा दिल्या. प्रशालेच्या शिक्षिका सौ. खिरिड मॅडम यांनी संकल्पाचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळा समितीचे अध्यक्ष व प्रशालेचे माजी विद्यार्थी एस.पी. कॉलेजचे माजी प्राचार्य श्री दिलीप शेठ यांनी आपल्या मनोगतातून संकल्पाच्या महत्त्वापासून संकल्प सिद्धीच्या वाटेवर येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगितले. आशावादी दृष्टीकोन ठेवून कार्यरत राहण्याचा संदेश दिला. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वसावे सर यांनी आपले विचार व्यक्त करताना सहकार्याचे महत्त्व सांगत आरोग्य राखण्याचा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे हा संदेश दिला. त्याचबरोबर वक्तशीरपणा, स्वयंशिस्त, कार्य तत्परता यांचे पालन करण्यास सांगितले विद्यार्थी विकासासाठी आवश्यक गोष्टींबाबत सविस्तर आढावा घेतला.
२६ ऑगस्ट २०२३ रोजी इंडियन रेड क्रॉस सोसायटी पुणे डिस्ट्रिक्ट ब्रांच तर्फे शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख श्री सतीश चंद्र कांकरिया होते. ट्रेनिंग मध्ये श्री.आर.व्ही. कुलकर्णी सरांनी सोसायटीची माहिती सांगितली. प्रशालेतून श्रीमती बधे, श्रीमती खाडे व श्री दौंडकर या शिक्षकांचा सहभाग होता.
विशेष उल्लेखनीय कामगिरी
- जिल्हा क्रीडा परिषद व पुणे मनपा आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटामध्ये १२ ब मधील शेळके अपूर्व रमेश यांस प्रथम क्रमांक मिळाला.
- नगर, नेवासा फाटा येथे झालेल्या विभागीय (झोनल) ज्युदो स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील वयोगटामध्ये ११ अ मधील मार्टिन ओव्हाळ यांस ब्राँझ पदक मिळाले.
- जिल्हा क्रीडा परिषद आयोजित झालेल्या जिल्हास्तरीय ड्रॉप रॉवॉल स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील गटामध्ये विध्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्ण व रौप्य पदक मिळवले. ११ ब मधील ढेबे अथर्व हा विद्यार्थी सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.
- मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्रीयन मंडळ याठिकाणी टेन इक्विड या खेळात जिल्हास्तरीय स्तरावर १९ वर्षाखालील गटामध्ये प्रशालेला उपविजेते पद मिळाले.
रंगवेध चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन
- म.ए.सो. कलावर्धिनीतर्फे घेण्यात आलेल्या ‘रंगवेध’ चित्रकला स्पर्धेत प्रशालेतील ११ क मधील चि.प्रज्वल कुचेकर परेश या विध्यार्थ्याचा ज्यु. कॉलेज गटामध्ये दुसरा क्रमांक मिळाला.
क्रांतीदिना निमित्त सावरकर भवनास ज्यु. कॉलेज विद्यार्थ्यांची भेट
9 ऑगस्ट 2023 प्रशालेत क्रांती दिन साजरा करण्यात आला क्रांती दिनानिमित्त ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना कर्वे रोडवरील सावरकर भवनास भेट देण्यास नेण्यात आले. त्या ठिकाणी सावरकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून पूजन करण्यात आले इयत्ता बारावी ब मधील डेंगळे व टोकापुरे यांनी सावरकरांबद्दल माहिती सांगितली त्यानंतर तेथील हॉलमध्ये मुलांना नेण्यात आले तेथे सौ कुलकर्णी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सावरकरांच्या तुरुंगातील अनुभवावर आधारित माझी जन्मठेप या पुस्तकातील सावरकरांचे काही अनुभव सांगितले त्यानंतर विद्यार्थ्यांना सावरकरांच्या जीवनावर आधारित एक चित्रफित दाखवण्यात आली दाखविण्यात आली.
जागतिक एड्स दिन – व्याख्यान
जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त एड्स बद्दलची जागरूकता व एड्स बद्दल समाजात असणारे समज-गैरसमज याबद्दल ऊहापोह करणारे व्याख्यान प्रशालेत शुक्रवार दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता ११वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आले होते.
या व्याख्यानासाठी एकूण तीन प्रमुख वक्ते बोलावले होते. श्री रोहित कांबळे, श्री रोहित बोरावके व श्री विकास गवळी हे सर्व वक्ते MSW प्राप्त जीवन कौशल्य प्रशिक्षक होते. स्त्री मुक्ती संघटनेचे सदस्य तसेच शालेय समुपदेशक म्हणूनही हे काम करीत आहे. या व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांना एड्स बद्दलचे समज-गैरसमज, ज्ञान म्हणजेच त्याची लागण होण्याची कारणे, एड्स झाल्यानंतरची औषधोपचार पद्धती याबद्दलची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी लैंगिक शिक्षणा अंतर्गत त्यांच्या शंकांचे निरसन व्याख्यात्याकडून करून घेतले.
ध्वज पथकाचे सादरीकरण
१२ जानेवारी स्वामी विवेकांनद जयंती अर्थात युवा चेतना दिनानिमित्त आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मैदानात दरवर्षी वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जाते. यावर्षी प्रशालेतील ११ ब या वर्गातील एकूण ७० विद्यार्थ्यांनी यावेळी ढोल,ताशा व झांज यांच्या तालावर ध्वज पथकाचे खूप सुंदररित्या सादरीकरण केले. या सादरीकरणात ध्वजाची वेगवेगळी प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली. यावेळी ढोल व ताशांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला. त्यामध्ये ढोल व ताशाच्या ठेक्यावर गोलाकार रचना,चौरस रचना, M.E.S. चे नाव अशा वेगवेगळ्या रचनांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री.तनपुरे सुनील व सौ. चौधरी सोनाली यांनी केले.
प्रश्नमंजुषा स्पर्धा ( बाह्य स्पर्धा )
विद्यार्थ्यांमध्ये चौकस वृत्ती, समाधीटपणा, नेतृत्त्व गुण, विषयाचे ज्ञान, वेळेची समय सूचकता, सतर्कता या गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने इयत्ता बारावी कॉमर्स विद्यार्थ्यांना Union Bank Of India आयोजित National Level General Awareness (U - Genious ) All India Quiz Competition साठी दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी बनतारा भवन ऑडिटोरियम, बाणेर या ठिकाणी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० पर्यंत प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी पाठवण्यात आले. इयत्ता १२वी ब कॉमर्स शाखेतील एकूण पाच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वरील सर्व विद्यार्थी पहिल्या फेरीपर्यंत चुरशीने खेळले.
या विद्यार्थ्यांना स्पर्धा सहभागाचे प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक करण्यात आले.
पालक आणि शिक्षक यांच्यातील स्नेह संबंध वाढण्यासाठी आणि आपुलकीचे नाते निर्माण होण्यासाठी २१ ऑक्टोबर २०२३ शनिवार रोजी प्रशालेमध्ये भोंडल्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. इयत्ता ५ वी ते १२ वीचे पालक, पालक प्रतिनिधी , सर्व शिक्षक वृंद आणि पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी होते. या कार्यक्रमाची सुरुवात हत्ती पूजनाने करण्यात आली. हत्तीचे पूजन केल्यानंतर भोंडल्याची माहिती सांगितली. त्यानंतर गाणी म्हणून फेर धरून भोंडला साजरा करण्यात आला. त्यानंतर दांडिया खेळण्यात आला. खिरापत म्हणून खिचडी देण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या आठवणींना व त्यांच्या महान कार्याला उजाळा देण्यासाठी ३ ऑक्टोबर ,२०२३ मंगळवार रोजी प्रशालेमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन करून जुनिअर कॉलेजमधील इयत्ता १२ वी मधील चि.चैतन्य जाधव या विद्यार्थ्याने महात्मा गांधी यांची माहिती सांगितली व प्रणव कालेकर या विद्यार्थ्याने लालबहादूर शास्त्री यांची माहिती सांगितली. स्वच्छतेच्या प्रतिज्ञेचे वाचन
करून विद्यार्थ्याकडून आणि शिक्षकांकडून तसा शपथविधी पार पडला.
- ‘आम्ही भावेमय’
- माजी विद्यार्थी स्नेह मेळावा 2023-24
शनिवार दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी प्रशालेच्या प्रांगणात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न झाला. शाळेची घंटा, सरस्वती वंदना यांनी सुरू झालेल्या या सोहळ्यात प्रशालेतर्फे खास माजी विद्यार्थी समिती स्थापन करण्यात आली. या मेळाव्यास डेक्कन कॉलेजचे माझी कुलपती मा. श्री गोरक्ष देगलूरकर सर, प्रख्यात लेखिका श्रीमती माधवी वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शाला समितीचे अध्यक्ष मा. श्री राहुल मिरासदार सर, प्रशालेच्या महामात्रा श्रीमती अश्विनी पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कीर्तीवंत व दिग्गज माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते श्री आनंद सराफ यांनी शाळेची घोषणा देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती कल्याणी जोशी व श्रीमती दिपाली बधे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री बाजारे सर यांनी केले. या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, तसेच बहुसंख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वेगवेगळ्या विषयातील माहिती आणि ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी १४ ऑक्टोबर ,२०२३ वार शनिवार रोजी प्रशालेमध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त सामुहिक वाचन आणि पुस्तक परीक्षण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशाळेतील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होते. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची माहिती सर्व विद्यार्थ्यांना सांगितली आणि विद्यार्थ्यांनी एकाच वेळेला सामुदायिक वाचक केले. तर जुनिअर कोलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी वाचलेल्या अवांतर वाचनाच्या पुस्तकाचे त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांसमोर परीक्षण केले.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्त्व गुण, सभाधीटपणा, विषयाचे ज्ञान व आपली बाजू ठामपणे, मुद्देसूद मांडणे या गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने प्रशालेत मंगळवार दिनांक १२ डिसेंबर २३ रोजी जुनिअर कॉलेज विभागात 'वादविवाद स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण ३६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रत्येक विद्यार्थ्याला आपली बाजू मांडण्यासाठी दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. ही स्पर्धा मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांतून घेण्यात आली. मराठी भाषेतून तीन व इंग्रजी भाषेतून तीन विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. मा.पर्यवेक्षिका सौ.देशपांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार या स्पर्धेचे परीक्षण प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. कांबळे ज्योती मॅडम व सौ.कचरे मॅडम केले. तर स्पर्धेचे नियोजन श्रीमती उबाळे मॅडम यांनी केले.
या स्पर्धेतील विजयी विद्यार्थास बक्षीस वितरण कार्यक्रमात रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
आंतरशालेय स्तरावर जिल्हा, राज्य स्तरावर विशेष कामगिरी
- जिल्हास्तरीय आंतरशालेय ‘ड्रॉप रो बॉल’ स्पर्धेत चि. जाधव जयवर्धन, चि. ठाणेकर तन्मय व चि. पवार वरद यांनी ‘ट्रिपल इव्हेंट’ मध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. तसेच विभागीय स्पर्धेत पुणे शहर विभागाचे ‘ट्रिपल इव्हेंट’ मध्ये नेतृत्व करून द्वितीय क्रमांक पटकावला.
- हायटेक टेक्निकल कॉलेज गाजियाबाद उत्तर प्रदेश येथे झालेल्या ‘सब ज्युनिअर’ या गटात ‘ट्रिपल इव्हेंट’ मध्ये महाराष्ट्रचे नेतृत्व करून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले.
- जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय ‘फेंटबॉल’ स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे नेतृत्व करत ‘ट्रिपल इव्हेंट’ मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
- इ.७वी क मधील चि. वरद विशाल पवार याने ड्रॉप रो बॉल जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत व निवड चाचणी २०२३ या स्पर्धेत ‘सिंगल इव्हेंट’ मध्ये तिसरा क्रमांक मिळवला. पुढे नायगाव सातारा येथे राज्यस्तरीय ड्रॉप रो बॉल स्पर्धेत ‘सिंगल इव्हेंट’ मध्ये सहभागी झाला. त्यातून पुढे राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड झाली.
- प्रशालेतील १७ वर्षे वयोगटाचा कबड्डी संघ आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत सेमी फायनल मध्ये पोहोचले.
- चि. दुबे अंश जितेंद्र ९वी मधील विद्यार्थ्यास जिल्हा क्रीडा परिषद पुणे व पुणे महानगरपालिका आयोजित कबड्डी स्पर्धेत निवड झाली.