आज दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रविवार रोजी प्रशालेतील NCC एअर विंग च्या मुलांनी मतदान जनजागृती केली यामध्ये त्यांनी आपल्या पालकांना आणि सर्वांना मतदान करा याबद्दल आवाहन केले . आज पालकांचा देखील मतदान जनजागृती मध्ये सहभाग घेण्यात आला पालकांनी देखील मतदान हा माझा हक्क आहे आणि तो मी नक्की बजावणार अशी ग्वाही दिली . पालक व मुलांना ANO मंजुश्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले .
बालदिन
आज दिनांक 14 नोव्हेंबर 2024 गुरुवार रोजी प्रशालेत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर , उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर , पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम विदयार्थी प्रतिनिधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन केले . इयत्ता 8 वी अ मधील जय जोशी या विद्यार्थ्यांने पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली आणि मा. मुख्याध्यापक वसावे सर यांनी बालदिन निमित्ताने सर्व मुलांना संदेश दिला .
पुण्यातल्या मलांच्या भावे शाळेने जमा केलेले एक मुठ धान्य आणि सेवावर्धिनींनी दिलेलं भाऊबीज किट शिवसेवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज लोणावळ्यात रेल्वे स्टेशन जवळील आपले कार्यकर्ते श्री जी पी यादव यांच्या घरी नागनाथ, ठाकूरवाडी, पाटण, कुसगाव आणि मळवली येथील आदिवासी जनजाती कुटुंबांना सुपूर्त केले. साधारणतः सव्वाशे कुटुंबांना या दिपावली कीटचा लाभ झाला. या किटमध्ये अंदाजे पाच किलो तांदूळ, चार किलो गहू, ज्वारी, बाजरी, एक किलो तेल, एक साडी, आणि दिवाळीचा काही फराळ असे एकत्रित देण्यात आलं.
दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी भावे हायस्कूलच्या प्रांगणात आकाश कंदील बनवणे कार्यशाळा संपन्न झाली. माननीय मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे सरांच्या कल्पनेतून पर्यावरण पूरक आकाश कंदील कंदील साकारण्यात आलेल्या या कार्यशाळे ची सुरुवात उपमुख्याध्यापक श्री चंद्रकांत गवळे यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाने झाली.विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी कागद, कार्डशिट पेपर, यांच्या सहाय्याने आकाश कंदील बनवले. पर्यवेक्षिका रसिका लिमये यांनी देखील कार्यशाळेस मार्गदर्शन दिले. चित्रकला शिक्षक श्री मस्के सर यांनी ही कार्यशाळा संयोजित केली. कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी व त्यांचे वर्गशिक्षक उपस्थित होते. दीपावलीच्या या पूर्वतयारीच्या कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाश कंदील लावून शाळेची सजावट करण्यात आली. या कार्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणखी तयार केलेले आकाश कंदील आपल्या घरात लावण्याचा संदेश विद्यार्थ्यांना याप्रसंगी देण्यात आला.
आज दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशालेत मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये सर्व शिक्षक व प्रशालेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
स्वच्छ सुंदर पर्यावरण पूरक शाळा स्पर्धेअंतर्गत वर्ग स्वच्छ्ता स्पर्धेतील विजेते वर्ग
म. ए. सो.मुलांचे विद्यालय येथे वाचन प्रेरणा दिन कल्पकतेने साजरा
दिनांक 15 ऑक्टोबर 2024 मंगळवारी प्रशालेच्या क्रीडांगणावर सरस्वती वंदना व डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.
मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाने क्रीडांगणावर महावाचन व पुस्तक यांच्या आकृतीच्या रचनेत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली. प्रास्ताविकातून प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री गवळे सरांनी इंटरनेटच्या युगात वाचन मागे पडू न देण्यासाठी तसेच कलाम जयंती निमित्त ज्ञानग्रहणासाठी वाचन करणे महत्त्वाचे आहे असे सांगून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. प्रशालेच्या शिक्षिका सौ दिपाली बधे यांनी मा. राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांची माहिती सांगितली. त्यानंतर ग्रंथपाल गायत्री जवळगीकर यांनी वाचन शपथ दिली. प्रशालेतील विद्यार्थ्यांना वाचनासाठी 550 पुस्तके भेट म्हणून दिली. 1977 च्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने प्रशालेस दहा पुस्तकांचा संच भेट म्हणून दिला. विद्यार्थ्यांचे वाचन अधिकाधिक वाढावे यासाठी मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे यांनी वर्षभरात जास्तीत जास्त पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यास 1001 रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. यानंतर मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे उपमुख्याध्यापक श्री चंदू गवळे पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या पुस्तकांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका सौ दिपाली बधे यांनी केले.
म.ए.सो.मुलांचे विद्यालय अर्थात भावे हायस्कूल येथे एक मुष्टी धान्य समर्पण सोहळा साजरा.
दिनांक 14 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी प्रशालेच्या प्रांगणात सरस्वती पूजनाने सोहळ्यास सुरुवात झाली. प्रास्ताविकातून मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे यांनी समर्पण सोहळ्यानिमित्त होणारा सामाजिक जाणिवेचा संस्कार महत्त्वाचा असून गरिबांची दिवाळी चांगली व्हावी हा हेतू स्पष्ट केला. याप्रसंगी शिवसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी आपल्या संस्थेचा स्थापना हेतू सांगून गरजूंपर्यंत हे धान्य पोहोचवण्यासाठी करीत असलेले प्रयत्न सांगितले. यानंतर प्रशालेचे शाळा समितीचे अध्यक्ष श्री दिलीप शेठ व मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे तसेच पदाधिकारी यांचे हस्ते नऊ पोती तांदूळ चार पोती गहू दोन पोती ज्वारी एक पोतं बाजरी व शालेय कर्मचाऱ्यांच्या वतीने 130 किलो खाद्यतेल शिवसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कार्यकर्ते यांना प्रशालेच्या वतीने देण्यात आले. सदरहू धान्य प्रशालेच्या पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी जमा केले होते. प्रमुख पाहुणे एन डी पाटील यांनी आपल्या मनोगतातून दा तृत्वाचे महत्त्व सांगितले. देण्याची वृत्ती जपणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुकही केले. त्यांनी सर्वांनी आपल्या संस्कृतीचे जतन करताना समाजाचाही विचार करावा असा संदेश दिला. दुसरे प्रमुख पाहुणे श्री पराग समुद्र यांनी आपल्या मनोगतातून सतपात्रिदानाचे महत्त्व सांगून एक मुष्टी धान्य सोहळ्याचे कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतातून शाळा समिती अध्यक्ष श्री दिलीप शेठ यांनी दान केल्याने चांगले परिणाम फळ मिळते असे सांगितले. यानंतर प्रशालेच्या शिक्षिका सौ दिपाली बधे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन सौ मंजुश्री शिंदे यांनी केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक श्री चंदू गवळे,पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये सर्व शिक्षक वर्ग व पाचवी ते दहावीचा विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी क्रीडा भारती आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मल्लखांबाचे क्रीडा केंद्र पेरुगेट भावे स्कूलच्या प्रांगणामध्ये सुरू करण्यात आले. क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री श्री राजजी चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पेरुगेट भावे स्कूलचे मुख्याध्यापक श्री वसावे सर, क्रीडा भारती प्रांत अध्यक्ष श्री विजयराव पुरंदरे, क्रीडा भारती पुणे महानगर अध्यक्ष श्री शैलेश आपटे तसेच महानगर मंत्री श्री विजय राजपूत उपस्थित होते. या क्रीडा केंद्रास मल्लखांब पटू श्री सत्यजित शिंदे आणि श्री अनिल उत्पात यांचे मार्गदर्शन लाभणार आहे..
आज ११ ऑक्टोबर २०२४ खंडेनवमी निमित्त प्रशालेतील ग्रंथालयात मा.मुख्याध्यापक ,पदाधिकारी,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सरस्वती व ग्रंथपुजन केले.प्रसंगी 12वी क मधील चि. प्रज्वल कुचेकर या विद्यार्थ्याने उत्तम असे संबळ वाजवले महिलांनी गोंधळ व जोगवा म्हणून पूजन केले. तसेच संगणक विभागात मा. मुख्याध्यापकांच्या हस्ते संगणक पूजन करण्यात आले.
आज १० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशालेमध्ये शासनाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी प्रशालाचे मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे सर यांच्या उपस्थितीत व आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय जाधव व त्यांच्या टीम यांच्याकडून मुलांची आरोग्य तपासणी करताना मुलांच्या आरोग्य विषयी तपासणी बरोबर आरोग्याची काळजी कशी घ्यावी या संदर्भात देखील मार्गदर्शन करण्यात आले.
दिनांक 30 सप्टेंबर 2024 सोमवार रोजी स्वच्छता ही सेवा अंतर्गत म.ए.सो. मुलांचे विद्यालयात एक पेड माँ के नाम हा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये NCC एअर विंग च्या कडेट्स नी स्वतःच्या आई साठी म्हणून एक झाड शाळेला भेट दिले आणि समाज जागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली त्यामध्ये एक पेड माँ के नाम , स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता आशा घोषणा देण्यात आल्या. या रॅली मध्ये प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सायसिंग , क्रीडा शिक्षक श्री. खुणे सर, ANO मंजुश्री शिंदे उपस्थित होते .
आज दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी प्रशालेत आनंददायी शनिवार अंतर्गत रिव्हाइव्ह हार्ड फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना ‘सी पी आर चे ट्रेनिंग’ देण्यात आले. यामध्ये सीपीआर म्हणजे काय? ते कोणाला द्यायचे, त्याची आवश्यकता केव्हा असते, ते कशाप्रकारे द्यायचे, याचे ट्रेनिंग व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यासाठी पीपीटी व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचा उपयोग करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून सुद्धा हे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. ही माहिती देण्यासाठी रोटरीयन श्रीमती कमल कोनलाडे,श्री कौशिक कोनलाडे उपस्थित होते. रोटरी क्लब तर्फे डॉ.शेठ रिवाईव्ह हार्ड फाउंडेशनचे डॉक्टर ‘सीपीआर’मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी प्रशालेचे मा.मुख्याध्यापक श्री वसावे सर व मा. उपमुख्याध्यापक श्री गवळे सर उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय रोटरी क्लबच्या कोऑर्डिनेटर सौ बधे मॅडम यांनी परिचय करून दिला.
जिल्हा क्रीडा परिषद आयोजित जिल्हास्तरीय टेनीक्वाईट स्पर्धा महाराष्ट्र मंडळ येथे संपन्न झाल्या त्यामध्ये आपल्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली .
19 वर्ष वयोगटांमध्ये = द्वितीय क्रमांक
14 वर्षे = वयोगटांमध्ये तिसरा .
क्रमांक 17 वर्षाखालील वयोगटांमध्ये =चौथा क्रमांक मिळवला .त्याबद्दल सर्व सहभागी खेळाडूंचे व क्रीडा मार्गदर्श कांचे प्रशालेतर्फे खूप खूप अभिनंदन .
14 वर्ष वयोगट अंतर्गत शासकीय जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धा खाशाबा जाधव क्रीडा निकेतन मैदानावर स्पर्धा चालू होत्या.एकूण 260 संघ सहभागी होते.त्यात आपल्या शाळेचा संघाने उत्कृष्ट कामगिरी करून 3 रा क्रमांक मिळविला.सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे, मार्गदर्शकांचे (कोच) यांचे हार्दिक अभिनंदन .
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे 6 ऑगस्ट 2024 रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची अभिक्षमता मापन चाचणी ( Aptitude Test ) घेण्यात आली होती त्या चाचणीचे अहवाल 21 सप्टेंबर 2024 रोजी पालक व विद्यार्थी यांना देण्यात आले विद्यार्थ्यांच्या क्षमता नुसार तज्ञांकडून योग्य करिअर मार्गदर्शन करण्यात आले. अभिक्षमता मापन चाचणीच्या मार्गदर्शनाच्या वेळी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. वसावे सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यासाठी केंद्राचे समुपदेशक शोभा कुलकर्णी मॅडम, स्मिता लोकरे मॅडम, गायत्री वाणी मॅडम व केंद्राचे समुपदेशक व केंद्रप्रमुख श्री. सागर गायकवाड सर यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
आनंददायी शनिवार अंतर्गत आज कर्णबधिर यूनिट च्या 5 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना केळकर संग्रहालय दाखवण्यात आले.या संग्रहालयात जुनी स्वयंपाकाची साधने,जुने दागिने, कपड्यांचे विविध प्रकार,ऐतिहासिक काळातील हत्यारे, देवतांच्या मूर्ती, जुनी सौंदर्यप्रसादानाची साधने,जुनी कपाटे,विविध आरसे अशा विविध वस्तू दाखवण्यात आल्या.
आज दिनांक 21 सप्टेंबर 2024 शनिवारी रोजी NCC एअर विंग च्या कडेट्स ची एव्हीएशन गॅलरी येथे क्षेत्रभेट देण्यात आली यावेळी NCC चे 40 कडेट्स , श्री. बाजारे सर ,सौ. मंजुश्री शिंदे मॅडम उपस्थित होते. एव्हीएशन गॅलरी मध्ये मुलांना सर्व विमानाची माहिती सांगण्यात आली तसेच विमानाचा सर्व इतिहास सांगण्यात आला पुढे विमानात काय बदल होणार आहेत याची देखिल कल्पना मुलांना देण्यात आली. ही सर्व माहिती ओंकार माने सर आणि ओम माने सर यांनी दिली. वरील सर्व माहिती मुळे आपल्या मुलांच्या ज्ञानात अजून भर पडली याचा फायदा मुलांना नक्की होईल . या क्षेत्रभेटीसाठी मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर यांनी मार्गदर्शन केले .
आनंददायी शनिवार अंतर्गत दि. 21 /9/ 2024 रोजी इ. 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिसला भेट दिली. तेथे कामकाज कसे चालते याविषयी माहिती देण्यात आली. पत्र व्यवहार कसा करतात , पत्रावर पिनकोड टाकणे किती महत्त्वाचे आहे तसेच इतर कामकाज इ. ची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी सौ धानवले मॅडम श्री मस्के सर व सौ गायकवाड सविता मॅडम उपस्थित होते.
आनंददायी शनिवार अंतर्गत दि. 21 /9/ 20 24 रोजी इ.7वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी जनता सहकारी बँक, बाजीराव रोड ला क्षेत्रभेट दिली. विद्यार्थ्यांना बँकेविषयी माहिती सांगण्यात आली. यामध्ये नवीन खाते कसे उघडायचे, त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात, बँकेत पैसे भरण्यासाठी व काढण्यासाठी लागणारी स्लिप, मुदत ठेव(FD),लोन, एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेक बुक, बँकेच्या विद्यार्थ्यांसाठीच्या नवीन योजना इत्यादी विषयी माहिती देण्यात आली. यावेळी इयत्ता 7वीचे एकूण 55 विद्यार्थी व सौ नांगरे मॅडम सौ सातपुते मॅडम व सौ राऊत मॅडम उपस्थित होते.
आनंददायी शनिवार अंतर्गत दि. 21 /9/ 2024 रोजी इ. 6 वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पुणे भाजी मंडई येथे भेट दिली. तेथे भाजी विक्रेते जो व्यवसाय करतात उदा.विविध प्रकारच्या भाज्या,फळे, इत्यादींविषयी माहिती देण्यात आली. भाज्यांचे दर विद्यार्थ्यांना समजले. या क्षेत्रभेटी विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्य विकसित व्हावे यासाठी त्यांनी स्वतः भाज्यांची खरेदी केली. त्यानंतर मंडईतील 'शारदा गणपती मंडळ' येथे सुद्धा भेट देण्यात आली. येथील मंदिराला प्राचीन इतिहास असल्यामुळे मंदिरातील गुरुजींनी त्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वास्तू जतन व संवर्धनाचा संदेश मिळाला.
आज शनिवार दि.21/09/2024 रोजी आनंददायी शनिवार अंतर्गत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी फडके वाडा या ठिकाणी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. फडके वाडा या ठिकाणी गेल्यानंतर इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना भावे हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री.अभिजित जोशी यांनी फडके वाडा येथील इतिहास व श्री.नृसिंह मंदिराचे महात्म्य सांगितले. श्री.जोशी यांनी विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप केले. व त्यांनी श्रीफळ देऊन गुरुजनांचा सत्कार केला. यावेळी 5वी चे सर्व विद्यार्थी, श्री कदम सर, श्रीमती खाडे मॅडम व सौ चिप्पा उपस्थित होते.
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय 14 वर्ष वयोगटाच्या कबड्डी स्पर्धा बुधवार 11 सप्टेंबर यादिवशी सुरु झाल्या या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेच्या संघाने चांगला खेळ करून सलग 5 शाळांच्या संघाचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला त्याबद्दल या विद्यार्थ्यांचे प्रशाळेतर्फे अभिनंदन व पुढील स्पर्धेच्या राउंड साठी शुभेच्छा .
७ सप्टेंबर २०२४ रोजी, प्रशालेत गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणपती बाप्पाची सुंदर व सुबक मूर्तीची स्थापना मंगलमय वातावरणात करण्यात आली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे इयत्ता पाचवी ते सातवीच्या पालक सभेमध्ये सर्व पालकांसाठी मोबाईल एडिक्शन इंटरनेट एडिक्शन सोशल मीडिया एडिक्शन या विषयावरती एक तासाचे सत्र घेण्यात आले. व्यक्तिमत्व विकास केंद्राचे समुपदेशक श्री. सागर गायकवाड सर यांनी हे सत्र घेतले. सत्रा मध्ये व्यसनांचे प्रकार कोणकोणते आहेत हे सांगण्यात आले. व्यसनाची परिभाषा सांगण्यात आली. टेक्नॉलॉजी उपयोगी की धोकादायक याच्यावरती प्रश्न विचारण्यात आले व उत्तरे देण्यात आली. तसेच टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे मेंदूचा कितपत वापर होतो . या सर्व एडिक्शन मुळे व्यक्तीच्या जीवनावर पर्सनल लाईफ वर सोशल लाइफ वर सायकॉलॉजिकल काय परिणाम होतात याची माहिती देण्यात आली विविध उदाहरणे, गोष्टी,PPT, SHORT FILMS च्या माध्यमातून पालकांना माहिती सांगण्यात आले. इंटरनेट एडिक्शन व टेक्नॉलॉजीचा मुलांवर होणारा दुष्परिणाम रोखण्यासाठी पालकांनी घ्यावयाची काळजी पालकांनी स्वतःमध्ये कोणकोणते बदल करणे अपेक्षित आहे. मुलांना योग्य सवयी लावणे व मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालकांची भूमिका याची माहिती इयत्ता पाचवी ते सातवीच्या सर्व पालकांना देण्यात आली.
29 ऑगस्ट 2024 गुरुवारी म.ए.सो.मुलांचे विदयालय, पुणे -30 (भावे हायस्कूल,पेरुगेट) प्रशालेत मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला. यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी मेजर श्री. अरुण फाटक सर यांनी प्रशालेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.वसावे सर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ.सातपुते मॅडम यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी. एम. गायकवाड सर यांनी केले. यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री.गवळे सर उपस्थित होते. श्री.अनासपुरे सर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या बद्दल माहिती सांगितली.
व्यक्तिमत्व विकास केंद्र तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इयत्ता पाचवीच्या सर्व मुलांसाठी चांगला स्पर्श व वाईट स्पर्श ( GOOD TOUCH AND BAD TOUCH ) हे सत्र घेण्यात आले सत्राचे उद्दिष्ट - विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण होण्यापासून सावध करणे, चांगला स्पर्श व वाईट स्पर्श विषय जागरूकता निर्माण करणे, स्वतःचा स्वतः बचाव कसे करावे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देणे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी
दिनांक 24-8-2024 शनिवार रोजी म.ए.सो. मुलांचे विद्यालयामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालीचे उप मुख्याध्यापक माननीय श्री गवळे सर यांनी केले गोपाळ कृष्णाच्या विविध लीलांचे व कृष्णजन्माष्टमीला काला का करतात त्याचे महत्त्व सांगितले दहीहंडीच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी प्रशालेचे माजी शिक्षक माननीय श्री लोखंडे सर उपस्थित होते सरांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व सांगितले राधा कृष्ण व बलराम यांच्या वेशभूषेत आलेले विद्यार्थी व इतर मुलांनी दहीहंडी फोडली या कार्यक्रमासाठी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर परिवेक्षिका सौ शिंदे मॅडम शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार सौ सातपुते मॅडम यांनी केले.
महाराष्ट्राचा पारंपारिक सण रक्षाबंधन भावे हायस्कूलमध्ये उत्साहात साजरा. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री बी.एम. गायकवाड सर यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व व माहिती सांगितली. यावेळी प्रशालेतील मुख्याध्यापक माननीय श्री वसावे सर व उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर व पर्यवेक्षिका माननीय सौ. विद्या शिंदे मॅडम यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. सातपुते मॅडम यांनी केले.
✅ विद्यार्थ्यांकडून राखी तयार करून घेण्यात आली. याला मार्गदर्शन केले प्रशालेतील शिक्षक श्री. मस्के सर यांनी..
✅विद्यार्थ्यांनी प्रशालेतील वृक्षांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचे वचन दिले.
✅विद्यार्थ्यांनी प्रशालेतील शिक्षक, सेवक, सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक यांनाही सामाजिक बांधिलकी जपत राखी बांधण्यात आली.
✅प्रशालेतील विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याचे काम करणारे बस-रिक्षा-व्हेन चालक यांनाही राखी बांधण्यात आली.
✅रेणुका स्वरूप मधील विद्यार्थिनींनी भावे प्रशालेतील विद्यार्थ्यांना राखी बांधण्यात आली.
दिनांक 15 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी मुलांचे भावे हायस्कूल मध्ये भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर श्री विनोद चिप्पा तसेच प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ शिंदे मॅडम व ग्रंथपाल श्रीमती जवळगीकर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला राष्ट्रीय सलामी देण्यात आले त्यानंतर श्रीमती काळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवी ब च्या विद्यार्थ्यांनी ध्वजगीत सादर केले एनसीसीच्या छात्रांनी प्रमुख पाहुणांना मानवंदना दिले प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले अपरिचित भारतीय क्रांतिकारक या हस्तलिखिताचे प्रकाशन झाले तसेच आज वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर श्री विनोद चिप्पा यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन स्वतःसाठी न जगता देशासाठी जगताआलं पाहिजे आपलं जीवन देशासाठी व समाजासाठी अर्पण केले पाहिजे. शाळांनी दिलेले संस्कार लक्षात ठेवले पाहिजे असे ते म्हणाले शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री दिलीपजी सेठ सर यांनी सर्वांना संदेश दिला राष्ट्रध्वजाला अभिवादन करून मातृभूमीसाठी बलिदान दिलेल्या स्मरण केले पाहिजे .देशाच्या हितासाठी व प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे महामात्र माननीय श्री सुधीरजी गाडे सर माननीय मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे सर ,माननीय उपमुख्याध्यापक श्री गवळे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजी-माजी विद्यार्थी पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अनासपुरे सर यांनी केले.
प्रशालेत नागपंचमीनिमित्त पारंपरिक मंगळागौरीचे खेळ संपन्न.
दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी प्रशालेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनसमोर आपल्या संस्कृतीचे पारंपारिक मंगळागौरीचे खेळ खेळून दाखवण्यात आले. प्रास्ताविकातून पर्यवेक्षिका विद्या शिंदे यांनी पारंपारिक सणांचे महत्त्व विशद करून कार्यक्रमाचे प्रयोजन सांगितले. नंतर माननीय मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे पर्यवेक्षिका विद्या शिंदे यांच्या हस्ते नागदेवतेचे पूजन करण्यात आले त्याचबरोबर जीवती पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रशालेच्या शिक्षिका श्रीमती सुवर्णा काळे यांनी आपल्या भारतीय जीवनातील सणासमारंभाचे महत्त्व सांगितले संवादिनी ग्रुपच्या महिला व प्रशालेतील काही शिक्षिका यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.उत्साहाने साजरा झालेल्या या समारंभाचे सूत्रसंचालन प्रशाळेच्या शिक्षिका सौ. सातपुते यांनी केले.
[18:46, 12/08/2024] 🥰 Sushma Bora 🥰:
शिक्षण विवेक तर्फे आयोजित काव्यवाचन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या पाचवी ते सातवीच्या गटातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन
त्यात -
१) प्रज्ञान कळमकर (६ अ ),
२) समर्थ माचुत्रे (७ अ ),
३) ओम जोशी (७ अ )
म. ए. सो. मुलांचे विद्यालय येथे सैनिक बांधवांसाठी राखी प्रदान सोहळा संपन्न.
दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी प्रशालेच्या प्रांगणात सैनिक बांधवांसाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या राखी भेटकार्ड व चित्र प्रदान सोहळा व शिक्षण विवेक अंकाचा वर्धापन सोहळा साजरा करण्यात आला. प्रास्ताविकातून माननीय मुख्यध्यापक श्री वसावे सायसिंग यांनी आपल्या सणसमारंभात सैनिकांसाठी असणारी कृतज्ञ आठवण व्यक्त करून कार्यक्रमाचे प्रयोजन सांगितले. त्यानंतर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पत्रकार माजी विद्यार्थी श्री. आनंद सराफ यांनी सैनिकी जीवनाचा खडतरपणा सांगून आपण आपल्या कृतज्ञ भावना राखीच्या माध्यमातून व्यक्त करीत आहोत असे सांगितले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एअर व्हाईस मार्शल श्री.रवींद्र दत्तात्रय लिमये, माननीय मुख्याध्यापक श्री.वसावे सायसिंग उपमुख्याध्यापक श्री चंदू गवळे,पर्यवेक्षिका शिंदे,प्रशालेचे माजी विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते श्री आनंद सराफ यांच्या हस्ते शिक्षण विवेक च्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त ऑगस्ट 2024 च्या अंकाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी शिक्षण विवेकच्या शालेय प्रतिनिधी सौ. चौकटे यांनी शिक्षण विवेक अंकाचे महत्व थोडक्यात विशद केले. शिक्षण विवेक तर्फे आयोजित काव्यवाचन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या पाचवी ते सातवीच्या गटातील विद्यार्थ्यांचे यादी वाचन श्रीमती खाडे राजश्री यांनी केले.त्यात प्रज्ञान कळमकर (६ अ ), समर्थ माचुत्रे (७ अ ), ओम जोशी(७ अ )यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मनोगतातून प्रमुख पाहुणे रवींद्र लिमये यांनी आपला इतिहास उज्वल असून त्याबद्दल अभिमान बाळगण्यास सांगितले तसेच प्रशालेचा माजी विद्यार्थी म्हणून अभिमान व्यक्त करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली खेळाद्वारे शरीर तंदुरुस्त ठेवून शिवरायांसारखे व्हा असा उपदेश त्यांनी केला त्यानंतर प्रशालेत गेली अकरा वर्षे राखी प्रधान सोहळ्याचे संयोजन करणारे कलाशिक्षक श्री पारे विनोद यांच्या मार्गदर्शनातून जमा करण्यात आलेल्या राख्या, चित्रे,भेटकार्डे,प्रदान सोहळा संपन्न झाला. प्रशालेतर्फे सतराशे राख्या 442 भेटकार्डे व 59 चित्रे प्रदान करण्यात आली उत्साहात सुरू झालेल्या या सोहळ्यास पाचवी ते दहावीचे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन विनोद पारे या कलाशिक्षकांनी केले.
पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ.प्रभाताई अत्रे यांच्या नव्वदी पूर्ती प्रीत्यर्थ सुरू झालेली 'अमृतप्रभा समूहगीत गायन स्पर्धा'दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी मध्ये शुक्रवार दिनांक ९ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाली .आपल्या प्रशालेतील गट क्रमांक दोन इयत्ता ८ वी ते १०वी व गट क्रमांक तीन इयत्ता ११वी व १२वी च्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला, त्यामध्ये गट क्रमांक ८ वी ते १० वी मध्ये विद्यार्थ्यांनी 'सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू' ही प्रार्थना सादर केली तर ज्युनिअर कॉलेजच्या गटाने 'हम करे राष्ट्र आराधन' हे गीत सादर केले व आपला सहभाग नोंदवला. त्यांना मार्गदर्शन श्रीमती. सुवर्णा काळे मॅडम ,सौ.सुप्रिया कचरे मॅडम व श्री .पवनकुमार वर्मा सर यांनी केले.
आजकालच्या स्पर्धात्मक जगात वावरण्यासाठी विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शनाची अतिशय गरज असते, ही गरज समजून घेऊन विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या क्षमता जाणून घेण्यासाठी म. ए. सो. मुलांचे विद्यालयातील व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे, केंद्राचे प्रमुख श्री. सागर गायकवाड सरांनी ६ ऑगस्ट २०२४ रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची अभिक्षमता मापन चाचणी ( Aptitude Test ) घेतली.
दिनांक २१ जुलै २०२४ रोजी येणाऱ्या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दिनांक २० जुलै २०२४ शनिवार रोजी भावे हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे सरांनी करून गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. गुरु त्यांच्या शिष्यांना आपल्या जवळ असलेल्या विचारातून व ज्ञानातून हुशार बनवून यशस्वी व आनंदी जीवन जगण्याचा कानमंत्र देतात हे सांगून कृतज्ञता अभियानाबाबत माहिती देऊन सर्व माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, हितचिंतक, व पालक यांना सदर अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी सर्व माजी शिक्षकांचा गुलाब पुष्प श्रीफळ व भेटवस्तू देऊन गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या सर्व शिक्षकांचा आशीर्वाद घेतला. माजी शिक्षिका स्वाती भावे मॅडम यांनी विद्यार्थ्यांसमोर आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात त्याचप्रमाणे शिक्षक पण घडत असतो. धडपडणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शाळा व संस्थान नेहमीच प्रोत्साहन देते असे त्या म्हणाल्या. प्रशालेचे शाला समिती अध्यक्ष व माजी विद्यार्थी असणारे माननीय श्री दिलीपजी शेठ सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गुरु शिष्यांची गोष्ट सांगून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली. गुरूंच्या सांगण्याला प्रमाण मानून अभ्यास केला पाहिजे, गुरूंच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले व त्यानंतर त्यांनी एक हजार रुपये रोख देऊन अभियानाचे उद्घाटन केले. तसेच त्यांनी एक लाख रुपये कृतज्ञता निधी म्हणून देण्याचे घोषित केले. यानंतर वय वर्ष 92 असलेले माजी शिक्षक माननीय श्री पानसरे सरांनी विद्यार्थ्यांना कोणताही एक छंद जोपासायला पाहिजे त्यामुळे आपले मन आनंदित व प्रफुल्लित राहते असे सांगितले. माजी विद्यार्थी माननीय श्री दीपकजी पुजारी यांनी आपल्या भाषणात सांगितले की माणूस जोडा म्हणजे देश जोडला जाईल. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे उप-मुख्याध्यापक माननीय श्री गवळे सर, पर्यवेक्षिका सौ. शिंदे मॅडम, माजी शिक्षक सौ. सुनीती जोशी, माजी विद्यार्थी श्री सुहास साठे, श्री पुष्कर जोशी, श्री हेमंत उत्तेकर, श्री सचिन जयवंत, श्री आनंद सराफ व श्री पराग गुजराथी, श्री योगेश शहा, श्री बारी व सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक श्रीमती जवळगीकर व सूत्रसंचालन आणि आभार सौ. चिप्पा मॅडम यांनी मानले.
म ए सो मुलांचे विद्यालय येथे पालखी सोहळा भक्ती भावात संपन्न.
दिनांक 16 जुलै 2024 मंगळवारी सायंकाळी चार वाजता विठ्ठल रखुमाई च्या प्रतिमांचे प्रशालेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे पूजन करण्यात येऊन सोहळ्यास उत्साहाने सुरुवात झाली. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पूजन श्री सायसिंग वसावे, प्रमुख पाहुणे केसरी क्रीडा विभागाचे संपादक विक्रांत कुलकर्णी, श्री चंदू गवळे, पर्यवेक्षिका विद्या शिंदेयांनी केले. अत्यंत उत्साहात सुरू झालेल्या या कार्यक्रमात प्रास्ताविकातून पर्यवेक्षिका सौ शिंदे यांनी वारीचा मिळणारा आनंद सर्वांना मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असे सांगितले. प्रशालेच्या शिक्षिका वर्षा चीप्पा यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. प्रशालेतील विद्यार्थी काळे वेदांत यांनी आपल्या सुमधुर आवाजात पाऊले चालती पंढरीची वाट हे भजन सादर केले. पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक या सोहळ्यात रंगून गेले. तर त्यांच्या रिंगणाने व टाळाच्या तालातील विठू माऊलीच्या गजराने वातावरण भक्तिमय बनले. सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका श्रीमती काळे यांनी केले.
दिनांक १३ जुलै २०२४ रोजी प्रशालेत गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.श्री अ.ल. देशमुख सर लाभले होते. तसेच प्रशालेच्या शाला समितीचे अध्यक्ष श्री दिलीप शेठ, प्रशालेचे महामात्र श्री सुधीर गाडे व प्रशालेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत आम्ही शाळेला विसरू शकणार नाही असे सांगितले प्रमुख पाहुणे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा मूलमंत्र सांगितला. प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री भालचंद्र महादेव भिडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री समीरजी भिडे यांनी एक शिष्यवृत्ती जाहीर केली. त्या शिष्यवृत्ती अंतर्गत इयत्ता दहावीतील विज्ञान व गणित विषयात एकुणात प्रथम व मागासवर्गीय गटात एकुणात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रत्येकी पाच हजार रुपयांचे शिष्यवृत्ती देण्यात आलली. या कार्यक्रमासाठी श्रीमती भिडे देखील उपस्थित होत्या.
व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे इयत्ता आठवीचे सर्व वर्ग व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्त राहण्यासाठी सत्राचे आयोजन करण्यात आले होते . हे सत्र घेण्यासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे पदाधिकारी माननीय सौ. सोनाली काळे मॅडम उपस्थित होत्या. या सत्रामध्ये व्यसनाचे प्रकार, अमली पदार्थांचे व्यसन व वर्तनात्मक व्यसन कोणत्या प्रकारचे असते? व्यसनांमुळे शारीरिक मानसिक भावनिक आजारांची टक्केवारी व व्यक्तीवर होणारे दुष्परिणामांची माहिती व सध्याच्या वयोगटावर व्यसनाचे होणारे परिणाम याबाबत माहिती दिली त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय व उपचार याची माहिती विविध उदाहरणे व पीपीटी च्या साह्याने मुलांना शास्त्रीय भाषेतून समजावण्यात आले. मुलांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली व सत्र पूर्ण झाले.
रविवार दिनांक ७ जुलै २०२४ रोजी आपल्या प्रशालेतील NCC च्या विद्यार्थ्यांनी पर्वतीटेकडीवर वृक्षारोपण केले. या प्रसंगी प्रशालेचे माननीय मुख्याद्यापक श्री. वसावे सर, प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री पराग गुजराथी व NCCच्या प्रमुख सौ मंजुश्री देशमुख मॅडम उपस्थित होत्या. यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. मुलांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी हा उद्देश होता.
शनिवार दिनांक 6जुलै 2024रोजी शैक्षणिक वर्ष 2023-24चा संस्कार या वार्षिक अंकाचा प्रकाशन सोहळा मा. मुख्याध्यापक सायसिंग वसावे यांच्या हस्ते संपन्न झाला. या समारंभास प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्रीयुत गवळे सर, पर्यवेक्षिका सौ विद्या शिंदे मॅडम यांसह पाचवी ते दहावीचा विद्यार्थी वर्ग, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. याच दिवशी शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील पहिला शिक्षण विवेक अंकाचेही प्रकाशन होऊन विद्यार्थ्यांना त्या अंकाचे वाटप करण्यात आले.
आषाढी वारीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका रायगडावरून पंढरपूरला जातात. श्री शिवछत्रपती पालखी सोहळ्यानिमित्त शनिवारी म.ए.सो. मुलांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (भावे हायस्कूल ) येथे शिवयोद्धा मर्दानी आखाडा मधील युवक युवतींनी दांडपट्टा, तलवारबाजी, भाला चालवणे आदी मर्दानी खेळ विद्यार्थ्यांसमोर सादर केले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये भक्ती आणि शक्तीची प्रेरणा जागावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू असल्याचे संदीप महिंद यांनी सांगितले.
शनिवार दिनांक २९ जून २०२४ रोजी, प्रशालेतील माजी विद्यार्थी चि. शंतनू कमलाकर नागवडे (बॅच 2016)
यांनी प्रशालेला माईक सह ऍम्प्लिफायर व स्पीकर भेट म्हणून दिले. त्याबद्दल चिरंजीव शंतनू याचे प्रशालेच्या वतीने आभार.
शनिवार दिनांक 29 जून रोजी रोटरी क्लब, लक्ष्मी रोड अंतर्गत इयत्ता आठवी व नववी साठी प्रसिद्ध गिर्यारोहक माननीय श्री. उमेश झिरपे यांनी विद्यार्थ्यांना एवरेस्ट पर्वतावर चढाई करताना येणारे विविध अनुभव ,घ्यावयाची काळजी गिरीप्रेमी संस्थेचे कार्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . यावेळी रोटरी क्लब समन्वयक बर्वे मॅडम व व्यंकटेश्वरा हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जन जागृती अभियान
माननीय महासंचालक केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभाग नवी दिल्ली यांच्या सूचने नुसार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आज दिनांक २६.०६.२०२४ रोजी दुपारी ३.०० ते ०५.३० च्या दरम्यान सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेच्या प्रांगणात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला.
अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जन जागृती अभियानांतर्गत रेणुका स्वरूप प्रशाला ते सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेपर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात श्री.संदीपसिंह गिल पोलीस उपायुक्त पुणे शहर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. याप्रसंगी मा.श्री.संदीपसिंह गिल, यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगून व्यसनापासून दूर राहण्याचा मोलाचा संदेश दिला.
सदर रॅलीचा मार्ग रेणुका स्वरूप प्रशाला, भावे हायस्कूल, अलका टॉकिज चौक, सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला असा होता.
रॅलीचा सांगता समारंभ सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेत करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त श्री. सुधाकर ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती दिपाली भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक श्रीयुत घोडके, श्रीमती सुप्रिया पढेरकर पोलीस उपनिरीक्षक, श्री.फडतरे पोलीस उपनिरीक्षक तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सचिन आंबर्डेकर, कार्यक्रमाचे समन्वयक भावे हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री.पराग गुजराथी, मएसो मुलांचे विद्यालय, पेरुगेट भावे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सायसिंग वसावे, मएसो रेणुका स्वरूप गर्ल्स मेमोरियल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी कांबळे व सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ, उपमुख्याध्यापिका श्रीमती ज्योती खिरीड, पर्यवेक्षिका श्रीमती मार्गसिद्धा पवार, तिन्ही शाळांचे NCC विभाग प्रमुख व शिक्षक वृंद उपस्थित होते. पोलीस उपायुक्त श्री.सुधाकर ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना व्यायाम, खेळ व अभ्यासाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. तसेच व्यसनांपासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.घोडके यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याची आवश्यकता तसेच यामुळे होणारे सामाजिक दुष्परिणाम याविषयी माहिती दिली. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये समुपदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीमती मृणाल क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी मी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही, तसेच इतरांनाही व्यसनांपासून दूर ठेवीन अशा प्रकारची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.रोहिदास भारमळ, तर सूत्रसंचालन व आभार श्रीमती नलिनी पवार यांनी केले.
२१ जून २०२४ आंतरराष्ट्रीय योगदिन
21 जून 2024 रोजी प्रशालेच्या प्रांगणामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा. नगरसेविका सौ.गायत्रीताई खडके कार्यक्रमाचे व शाला समितीचे अध्यक्ष मा श्री.दिलीप शेठ क्रीडावर्धिनी समन्वयक श्री जयसिंग जगताप सर तसेच शाळेचे सर्व पदाधिकारी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना योग आहार याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी जीवनातील योगाचे महत्त्व सांगितले. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री.वसावे सायसिंग यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व व वर्षभर निरोगी आनंदी राहण्याकरता रोज योग प्राणायम व व्यायाम करावा असा संकल्प करण्यासाठी मार्गदर्शन केले. योग दिनाच्या कार्यक्रमाला 1000 विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी सहभागी होते अशा रीतीने योग दिन साजरा करण्यात आला.
शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी प्रशालेच्या प्र.ल.गावडे सभागृहात आगामी शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या संदर्भात सर्व शालेय पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी संकल्प घेऊन नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवात केली. पर्यवेक्षिका सौ विद्या शिंदे मॅडम यांनी संकल्पचा हेतू व्यक्त करून नववर्षाच्या सदिच्छा दिल्या. प्रशालेच्या शिक्षिका सौ. खिरिड मॅडम यांनी संकल्पाचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळा समितीचे अध्यक्ष व प्रशालेचे माजी विद्यार्थी एस.पी. कॉलेजचे माजी प्राचार्य श्री दिलीप शेठ यांनी आपल्या मनोगतातून संकल्पाच्या महत्त्वापासून संकल्प सिद्धीच्या वाटेवर येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगितले. आशावादी दृष्टीकोन ठेवून कार्यरत राहण्याचा संदेश दिला. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वसावे सर यांनी आपले विचार व्यक्त करताना सहकार्याचे महत्त्व सांगत आरोग्य राखण्याचा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे हा संदेश दिला. त्याचबरोबर वक्तशीरपणा, स्वयंशिस्त, कार्य तत्परता यांचे पालन करण्यास सांगितले विद्यार्थी विकासासाठी आवश्यक गोष्टींबाबत सविस्तर आढावा घेतला.
प्रशालेतील शिक्षकांच्या कलगुणांना वाव मिळण्यासाठी आणि कामाच्या धावपळीतून थोडा विरंगुळा मिळण्यासाठी २८ ऑक्टोबर ,२०२३ शनिवार रोजी प्रशालेमध्ये कोजागिरीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रशालेतील अनेक शिक्षक उत्साहाने सहभागी झाले होते. सादर कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशाळेतील शिक्षकांनी समूह काव्यवाचन, विनोदी नाट्यवाचन यामधून आपल्या कलगुणांचे प्रदर्शन केले. हसतखेळत आणि आनंददायी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने भावे हायस्कूलमध्ये इ ५वी ते १०वी तील विद्यार्थ्यांना आधुनिक युगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची थोरवी ‘गोष्ट येथे संपत नाही’ या कथाकथनाच्या सदरात शिवछत्रपती मंडळाचे कार्यकर्ते श्री.सारंग मांडके व श्री. सारंग भोईरे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय रंजक रोमहर्षक, जोशपूर्ण अशा कथाकथनातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची थोरवी सांगितली.तसेच सध्याच्या जगात आपली संस्कृती, मायभूमीचा आदर, सन्मान करावा हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. श्री. अनासपुरे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री सय्यद सर, उपमुख्याध्यापिका मा. श्रीमती शर्मिला जोशी मॅडम पर्यवेक्षक मा. श्री. जायभाय सर उपस्थित होते.
‘रांगोळीचे रंग विज्ञानाच्या संगे’
विज्ञान दिनाच्या निमित्ताने प्रशालेत दरवर्षी विविध उपक्रम घेतले जातात. इयत्ता ५वी ते १०वीच्या वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात असतो. विज्ञानाचे महत्त्व समजावताना विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला, कौशल्याला वेगवेगळ्या पैलूंनी सादर करण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध होत असते. म्हणून सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इतर विषयांबरोबर विज्ञानाचा असलेला सहसंबंध शिक्षकांच्या मार्गदर्शनांनी व विद्यार्थ्यांच्या कलांनी रांगोळीच्या माध्यमातून सादर करण्यात आला. हिंदी, मराठी, भूगोल, इंग्रजी व इतर अनेक विषयांतर्गत विज्ञानाचा संबंध रांगोळीतून प्रस्तुत केला. आधुनिक जीवनात प्रत्येक विषयात विज्ञान असते हे या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातील बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचे भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले.
पालक आणि शिक्षक यांच्यातील स्नेह संबंध वाढण्यासाठी आणि आपुलकीचे नाते निर्माण होण्यासाठी २१ ऑक्टोबर २०२३ शनिवार रोजी प्रशालेमध्ये भोंडल्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. इयत्ता ५ वी ते १२ वीचे पालक, पालक प्रतिनिधी , सर्व शिक्षक वृंद आणि पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी होते. या कार्यक्रमाची सुरुवात हत्ती पूजनाने करण्यात आली. हत्तीचे पूजन केल्यानंतर भोंडल्याची माहिती सांगितली. त्यानंतर गाणी म्हणून फेर धरून भोंडला साजरा करण्यात आला. त्यानंतर दांडिया खेळण्यात आला. खिरापत म्हणून खिचडी देण्यात आली.
मनयुद्ध (माईंड वॉर) प्रश्नमंजुषा
दि. ४ मार्च २०२४ रोजी झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेड यांच्यामार्फत मन युद्ध (माईंड वॉर) स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा चि.नमन जैन यांने घेतली. इ.७ वी च्या वर्गातील ९० विद्यार्थ्यांची प्रथम सामान्यज्ञानावर आधारित चाचणी घेण्यात आली.त्यातून फक्त १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. नंतर दोन-दोन चे गट करून प्रश्नमंजुषा घेण्यात आली. विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले.
मराठी दिनानिमित्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी रोजी प्रशालेत विद्यार्थांसाठी ‘काव्यवाचन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी इ. ५ वी ते ७ वी व ज्यु. कॉलेजच्या १४ विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेचे विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रजांच्याच कवितांचे तालासुरात, लयबद्ध पद्धतीने उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी तबला व पखवाज यांच्या साथीने उत्कृष्ट कविता सादर केल्या.
यावेळी मराठी दिनाची माहिती श्रीमती उबाळे यांनी सांगितली; तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कुलकर्णी माया यांनी केले. यावेळी पर्यवेक्षिका सौ. शिंदे विद्या व ग्रंथपाल श्रीमती जवळगीकर उपस्थित होत्या.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या आठवणींना व त्यांच्या महान कार्याला उजाळा देण्यासाठी ३ ऑक्टोबर ,२०२३ मंगळवार रोजी प्रशालेमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन करून जुनिअर कॉलेजमधील इयत्ता १२ वी मधील चि.चैतन्य जाधव या विद्यार्थ्याने महात्मा गांधी यांची माहिती सांगितली व प्रणव कालेकर या विद्यार्थ्याने लालबहादूर शास्त्री यांची माहिती सांगितली. स्वच्छतेच्या प्रतिज्ञेचे वाचन
करून विद्यार्थ्याकडून आणि शिक्षकांकडून तसा शपथविधी पार पडला.
- ‘आम्ही भावेमय’
- माजी विद्यार्थी स्नेह मेळावा 2023-24
शनिवार दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी प्रशालेच्या प्रांगणात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न झाला. शाळेची घंटा, सरस्वती वंदना यांनी सुरू झालेल्या या सोहळ्यात प्रशालेतर्फे खास माजी विद्यार्थी समिती स्थापन करण्यात आली. या मेळाव्यास डेक्कन कॉलेजचे माझी कुलपती मा. श्री गोरक्ष देगलूरकर सर, प्रख्यात लेखिका श्रीमती माधवी वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शाला समितीचे अध्यक्ष मा. श्री राहुल मिरासदार सर, प्रशालेच्या महामात्रा श्रीमती अश्विनी पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कीर्तीवंत व दिग्गज माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते श्री आनंद सराफ यांनी शाळेची घोषणा देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती कल्याणी जोशी व श्रीमती दिपाली बधे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री बाजारे सर यांनी केले. या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, तसेच बहुसंख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.
रोटरी क्लब तर्फे विद्यार्थ्यांना व्याख्यान
१० ऑगस्ट २०२३ रोजी इ. ८वी व ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब तर्फे व्याख्यान देण्यात आले. यावेळी डॉक्टर गौरी जोशी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या वयाच्या विविध अवस्था सांगून वय वर्षे १२ नंतर विद्यार्थ्यांना स्ट्रेस मॅनेजमेंट कसे करावे याचे त्यांनी स्लाईड शो मार्फत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे श्री. व सौ. शहा व श्रीमती गौरी जोशी यांचे सहाय्यक श्री नंद हे उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ बधे मॅडम यांनी केले.
लेखक आपल्या भेटीला
दि. ९ फेब्रुवारी २०२४ शुक्रवार रोजी प्रशालेत मुलांच्या भेटीला लेखिका श्रीमती मेधा इनामदार उपस्थित होत्या. त्यांनी मुलांशी संवाद साधून बडबड गीतांपासून ते कथा, कादंबऱ्यांचा प्रवास कसा असतो याबद्दल माहिती दिली. गाणी, कविता, गोष्टी, नाटक, सिनेमा, दूरदर्शन मालिका, अंतरजालातील मालिका अशा विविध प्रकारच्या लेखन प्रकाराबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती देशपांडे प्रज्ञा मॅडम कार्यक्रमास उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती चिप्पा मॅडम यांनी केले.
प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी एक ऑगस्ट 2023 निमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली यात प्रशालेतील इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी आणि ज्यु . कॉलेजमधील इयत्ता १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील विषय देण्यात आले होते. इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी व इयत्ता १२ वी च्या मुलांनी उत्कृष्टपणे तयारी केली व सादरीकरणही केले या स्पर्धेत प्रत्येक इयत्तेतून दोन विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. मुलांच्या अंगी वक्तृत्व कौशल्य, सभा धीटपणा आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी अश्या स्पर्धा उपयुक्त ठरतात.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वेगवेगळ्या विषयातील माहिती आणि ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी १४ ऑक्टोबर ,२०२३ वार शनिवार रोजी प्रशालेमध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त सामुहिक वाचन आणि पुस्तक परीक्षण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशाळेतील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होते. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची माहिती सर्व विद्यार्थ्यांना सांगितली आणि विद्यार्थ्यांनी एकाच वेळेला सामुदायिक वाचक केले. तर जुनिअर कोलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी वाचलेल्या अवांतर वाचनाच्या पुस्तकाचे त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांसमोर परीक्षण केले.
आंतरशालेय स्तरावर जिल्हा, राज्य स्तरावर विशेष कामगिरी
- जिल्हास्तरीय आंतरशालेय ‘ड्रॉप रो बॉल’ स्पर्धेत चि. जाधव जयवर्धन, चि. ठाणेकर तन्मय व चि. पवार वरद यांनी ‘ट्रिपल इव्हेंट’ मध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. तसेच विभागीय स्पर्धेत पुणे शहर विभागाचे ‘ट्रिपल इव्हेंट’ मध्ये नेतृत्व करून द्वितीय क्रमांक पटकावला.
- हायटेक टेक्निकल कॉलेज गाजियाबाद उत्तर प्रदेश येथे झालेल्या ‘सब ज्युनिअर’ या गटात ‘ट्रिपल इव्हेंट’ मध्ये महाराष्ट्रचे नेतृत्व करून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले.
- जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय ‘फेंटबॉल’ स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे नेतृत्व करत ‘ट्रिपल इव्हेंट’ मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
- इ.७वी क मधील चि. वरद विशाल पवार याने ड्रॉप रो बॉल जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत व निवड चाचणी २०२३ या स्पर्धेत ‘सिंगल इव्हेंट’ मध्ये तिसरा क्रमांक मिळवला. पुढे नायगाव सातारा येथे राज्यस्तरीय ड्रॉप रो बॉल स्पर्धेत ‘सिंगल इव्हेंट’ मध्ये सहभागी झाला. त्यातून पुढे राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड झाली.
- प्रशालेतील १७ वर्षे वयोगटाचा कबड्डी संघ आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत सेमी फायनल मध्ये पोहोचले.
- चि. दुबे अंश जितेंद्र ९वी मधील विद्यार्थ्यास जिल्हा क्रीडा परिषद पुणे व पुणे महानगरपालिका आयोजित कबड्डी स्पर्धेत निवड झाली.