दिनांक 2 एप्रिल 2026 गुरुवार रोजी चैत्री पौर्णिमा हनुमान जयंती निमित्त प्रशालेत विद्यार्थ्यांनी श्री मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा यांचे पठण केले. प्रशालेच्या शिक्षिका सौ. योगिता चौकटे यांनी हनुमान जन्माची कथा सांगितली. सविता गायकवाड यांनी हनुमान चालीसाचे पठणास मार्गदर्शन केले.



दिनांक 23मार्च 2026 सोमवार रोजी शहीद दिनाच्या निमित्ताने प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर, माननीय उप मुख्याध्यापिका श्रीमती पवार मॅडम, माननीय पर्यर्वेक्षिका सौ. लिमये मॅडम, महिना प्रमुख श्री पारवे सर, सौ राऊत मॅडम व इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन केले.तसेच इयत्ता सातवी मधील चि. रुद्र गंदूरकर याने शहीद दिनाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
दिनांक 12 मार्च 2026 गुरुवार रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेच्या मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती पवार मॅडम व मा. पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम व विद्यार्थी यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच सौ.राऊत मॅडम यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची माहिती सांगितली.
म . ए. सो.मुलांचे विद्यालय पुणे प्रशालेच्या 9 वी च्या 40 विद्यार्थ्यांनी दिनांक 11 मार्च 2026 बुधवार रोजी आबासाहेब गरवारे कॉलेज येथील प्राणीशास्त्र विभागाला शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान आम्ही प्राणीशास्त्र विषयाशी संबंधित विविध नमुने आणि मॉडेल्स पाहिले. विभागात किटक, मासे, पक्षी आणि इतर प्राण्यांचे जतन केलेले नमुने प्रदर्शित केले होते. विद्यार्थ्यांना सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने काही सूक्ष्मजीवही दाखवण्यात आले. प्राण्यांचे वर्गीकरण आणि त्यांच्या शरीररचनेबद्दल माहिती देण्यात आली. विभागातील प्राध्यापकांनी प्रत्येक नमुन्याबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरे मिळवली. या प्रदर्शनामुळे आमचे प्राणीशास्त्र विषयाबद्दलचे ज्ञान वाढले. तसेच निसर्ग आणि प्राण्यांबद्दल अधिक जिज्ञासा निर्माण झाली. ही भेट आमच्यासाठी खूप उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरली.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकातून वासुदेव बळवंत फडके यांची माहिती थोडक्यात सांगितले, त्यानंतर श्रीमती. सुवर्णा काळे यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याची माहिती सांगितली. आपल्या संस्थेचे संस्थापक यांच्या जीवनावर आधारित सादर केलेले 'वज्रमूठ' नाटक इयत्ता 5 वी ते इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. त्याचे सर्व नियोजन सौ .मुंगी मॅडम व सौ . दर्प मॅडम यांनी केले होते .

दिनांक 17 फेब्रुवारी 2026 मंगळवार रोजी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी निमित्त इयत्ता पाचवी ब, आठवी ब व सातवी अ मधील विद्यार्थ्यांनी प्रशालेतील शिक्षक सौ सातपुते सौ चौकटे व श्री दौंडकर यांच्यासह फडके वाड्यास भेट दिली.या निमित्ताने प्रशालेचे शिक्षिका सौ.सातपुते यांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याची माहिती ते राहत असलेले नरसिंह मंदिर व फडके वाडा येथे देण्यात आली.
Chhote Scientist V-Solve स्पर्धेत इयत्ता 9 वी तून एकूण 18 गटांमधून म . ए. सो.मुलांचे विद्यालय ,पुणे 30 यांना द्वितीय क्रमांक प्राप्त!

सलाम मुंबई फाउंडेशन तर्फे गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी पुणे विद्यापीठातील जिओलॉजी डिपार्टमेंट मध्ये रोबोटिक्स एक्झिबिशन भरवण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी आपल्या म. ए . सो मुलांचे विद्यालयातील इयत्ता नववी अ, ब ,क आणि ड मधील एकूण 50 विद्यार्थी गेले होते. त्यांच्यासोबत विज्ञान शिक्षिका श्रीमती काळे सुवर्णा पुणे विद्यापीठात गेल्या होत्या. अतिशय उत्कृष्ट असे रोबोटिक्स एक्झिबिशन सलाम बॉम्बे फाउंडेशन च्या वतीने भरवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना ते प्रदर्शन खूप आवडले. खूप नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया या प्रदर्शनामध्ये बघायला मिळाल्या.
दि.28 व 29 जानेवारी 2026 रोजी केसरी वाडा या ठिकाणी अगस्त इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्यामार्फत 'डिझाईन थिंकिंग' या अनोख्या विषयाचे प्रकल्प प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनामध्ये इ. 7वी अ मधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी श्री कांबळे सर, श्री पराग सर, श्रीमती वैष्णवी राऊत, श्रीमती परविन शेख व परीक्षक श्री दिनेश गावित्रे व अगस्त फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुधीर सावंत, अगस्त फाउंडेशनचे सदस्य यांनी केले. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थी व शिक्षक यांचे मनोगत घेण्यात आले. त्यानंतर बक्षीस समारंभ झाला.अगस्त फाउंडेशन तर्फे प्रत्येक सहभागी शाळेस सन्मान चिन्ह व विद्यार्थ्याला पदक, प्रमाणपत्र, स्कूल बॅग चित्रकला साहित्य किट व इलेक्ट्रिक किट देण्यात आले.
दि.28 जानेवारी 2026 रोजी केसरी वाडा या ठिकाणी अगस्त इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्यामार्फत 'डिझाईन थिंकिंग' या अनोख्या विषयाचे प्रकल्प प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनामध्ये इ. 7वी अ मधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. श्री कराडकर सर, व्हाईस चॅन्सलर रायसोनी युनिव्हर्सिटी यांच्या हस्ते झाले. तसेच या कार्यक्रमाच्या वेळेस मा. सौ सुनंदा सरडे, मुख्याध्यापिका विश्वकर्मा विद्यालय, श्री प्रकाश हांडे,श्री. दिनेश गावित्रे (परीक्षक) हे उद्घाटन समारंभाच्या वेळेस उपस्थित होते.
म ए सो मुलांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक२६जानेवारी २०२६रोजी ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे एअर व्हाईस मार्शल श्री किरण प्रभाकर पळसुले व्हीएसएम (निवृत्त) माजी विद्यार्थी 1971ची बॅच यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सदर कार्यक्रमास शाला समिती अध्यक्ष मा.श्री दिलीपजी शेठ सर, महामात्र सुधीरजी गाडे सर शाळेचे पदाधिकारी, पालक, आजी माजी विद्यार्थी, शाळा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने सामुदायिक कवायत व विद्यार्थ्यांची विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच साक्षरता प्रतिज्ञा सर्व उपस्थितांनी घेतली.

आपल्या प्रशालेतील ६ ब मध्ये शिकणारा विद्यार्थी चि. आदित्य गोरख आढाव याला नुकत्याच पार झालेली राजा नातू करंडक नाट्य स्पर्धा या स्पर्धेत अभिनयासाठी बक्षीस मिळाले आहे. त्याचे प्रशालेतर्फे खूप खूप अभिनंदन.

दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी इयत्ता 7वीअ मधील विद्यार्थ्यांनी सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला येथील विज्ञान प्रदर्शन, ग्रंथालय प्रदर्शन,तसेच मराठी, भूगोल, हिंदी, शारीरिक शिक्षण, संगणक, पर्यावरण, इत्यादी विषयांचे प्रदर्शन पाहण्याकरिता भेट देण्यात आले. यावेळी श्री मस्के सर व सौ राऊत मॅडम हे सुद्धा या प्रदर्शना पाहण्याकरिता उपस्थित होते.

पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया फाउंडेशन, केपीआयटी टेक्नॉलॉजीस लि., पूर्णम व्हिजन फाउंडेशन आणि जनवाणु यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील शाळांमध्ये ई-कचरा जनजागृती मोहिमे अंतर्गत शहरातील निवडक शाळांमध्ये बेस्ट आऊट ऑफ ई-वेस्ट कॉम्पिटिशन ची पहिली फेरी आज प्रशालेमध्ये झाली. यामध्ये आपल्या प्रशालेतील इ. 5वी ते 8वी तील एकूण वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी पूर्णंम इकोव्हिजन फाउंडेशनचे सदस्य यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची पाहणी केली व त्यातील काही प्रकल्प पुढील स्तरासाठी निवडले गेले. या स्पर्धेकरिता प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री वसावे सर, उपमुख्याध्यापिका मा.श्रीमती पवार मॅडम व पर्यवेक्षिका मा.सौ लिमये मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

वार्षिक स्नेहसंमेलन 2025 अंतर्गत प्रशालेमध्ये इयत्ता 5 वी ते इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच कर्णबधिर युनिटच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान व पर्यावरण पूरक रांगोळी स्पर्धचे आयोजन आज शुक्रवार दिनांक 12/12/2025 रोजी दुपारी 12:00 ते 2:00 या वेळेत करण्यात आले होते.यामध्ये एकूण 67 विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यांनी पाठ्यपुस्तकातील विज्ञानाच्या आकृत्या,पाणी बचत, बेटी बचाओ, रक्तदानाचे महत्व, जलसुरक्षा व पर्यावरण हे विषय घेऊन अतिशय सुबक व रेखीव रांगोळ्या काढल्या . याचे परीक्षण माध्यमिक विभागाचे चित्रकला शिक्षक श्री. माळी सर,श्रीमती.काळे सुवर्णा व श्रीमती.पोखरकर ज्योती यांनी केले . तसेच माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर, पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये मॅडम,ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक प्रतिनिधी श्री. बागुल सर, माध्यमिक विभागाचे शिक्षक प्रतिनिधी श्री.पारवे सर,तसेच सौ.माया कुलकर्णी, सौ.सुपेकर मॅडम, सौ.साळुंके मॅडम, सर्व दुपार विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांच्या रांगोळ्या पाहुन कौतुक केले. सर्व पदाधिकारी, माझे सर्व सहकारी विज्ञान शिक्षक यांच्या सहकार्यामुळे रांगोळी स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली.

म. ए. सो.मुलांचे विद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा
शनिवार दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी प्रशालेच्या मैदानावर घोष पथकाच्या गजरात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री प्रतिक वाईकर (भारतीय खो खो संघाचे कर्णधार) व माननीय श्री धीरज घाटे (माजी विद्यार्थी, अध्यक्ष भाजप पुणे शहर) तसेच शालेय पदाधिकारी व इतर मान्यवरांचे आगमन झाले. पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.माननीय मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे यांनी प्रास्ताविकातून या शैक्षणिक वर्षात प्रशालेने क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत थोडक्यात आढावा घेऊन त्यांचे कौतुक करण्याचा उद्देश व्यक्त केला. तसेच विविध खेळ जसे खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल इत्यादी मध्ये शाळेचे नेतृत्व राज्य पातळीवर नेले असे सांगून राष्ट्रीय हॉकी व रायफल शूटिंग सारख्या खेळांमध्ये राष्ट्रीय पातळीवर सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय खो-खो संघाचे कर्णधार मा. श्री.प्रतीक वाईकर यांनी आपल्या मनोगतातून सहभागी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कोणतीही इतर गुंतवणूक करण्यापेक्षा शरीर संपत्तीत गुंतवणूक करा, मैदानाशी नाते जोडा,खेळाचा आनंद घ्या.असा संदेश दिला.आणि अशा क्रीडा महोत्सवातून विद्यार्थ्यांना खेळाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेचे कौतुक केले.दुसरे प्रमुख अतिथी प्रशालेचे माजी विद्यार्थी मा.श्री.धीरज घाटे यांनी आपल्या मनोगतातून सहभागी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या कौशल्यांचे शिक्षण खेळातूनच मिळते असे सांगितले. प्रशालेत मिळालेले शिक्षण , संस्कार या विषयी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शाला समितीचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ दिलीपजी शेठ सरांनी आपल्या मनोगतातून खेळाचे महत्त्व सांगताना निरोगी जीवनासाठी व्यायाम, नियंत्रित आहार असणे आवश्यक असून त्यात सातत्य हवे. असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय, राज्य, विभागीय, जिल्हा व आंतरवर्गीय स्पर्धेत खो खो कबड्डी व्हॉलिबॉल, रस्सीखेच लंगडी 100 मीटर धावणे इ.खेळ प्रकारात विजयी ,उपविजयी व वैयक्तिक खेळात प्राविण्य मिळवणाऱ्या खेडाळूंना मेडल,ढाल व प्रमाणपत्र देऊन गौरव करून अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक श्री.शैलेश आपटे सर प्रशालेचे महामात्र श्री.सुधीरजी गाडे सर उपमुख्याध्यापिका सौ.मार्गसिद्धा पवार, पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये, क्रीडा शिक्षक प्रतिनिधी श्री भाऊसाहेब खुणे, स्नेहसंमेलन शिक्षक प्रतिनिधी श्री. बागुल देवानंद, श्री पारवे राजेंद्र, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी श्री नाना चौरे ,विद्यार्थी प्रतिनिधी चि.भावेश ढोले ,चि.कुणाल ढेबे व आर्यन मळेकर.पालक प्रतिनिधी उदय पवार, सौ.दुधाळे, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता 5 वी ते 12 वी चे सर्व विद्यार्थी सदर कार्यक्रमास उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माया कुलकर्णी, यांनी केले तर पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादी वाचनाचे काम सौ. अमृता अराणके, सौ.स्वाती हावळे यांनी केले.आभार व क्रीडा अहवाल वाचन क्रीडा शिक्षक प्रतिनिधी श्री खुणे भाऊसाहेब यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या 165 व्या वर्धापन दिनानिमित्त म.ए.सो. मुलांचे विद्यालयातील विद्यार्थी शिवांश पळीवाले, अश्विन निंबरे, अथर्व गंदुरकर, स्वराज भुवड, जय जोशी, रुद्र गंदुरकर, प्रग्यान कळमकर तसेच शिक्षिका सौ. दीप्ती टपळे, सौ सुषमा बोरा व सौ कल्याणी जोशी यांनी भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठन केले.
राष्ट्रीय पातळीवर रायफल शूटिंग स्पर्धेत आर्यन मळेकर याला गोल्ड मेडल मिळाले त्याचे हार्दिक अभिनंदन

पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनाची प्रशालेतर्फे मदत.

शनिवार दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी अध्यापक प्रबोधिनी अंतर्गत पुष्प पहिले विद्यार्थी समजून घेताना या विषयावर श्री. भगवान पांडेकर सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री .वसावे सर, पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम, प्रमुख पाहुणे श्री. पांडेकर सर यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले यामध्ये श्री .पांडेकर सर यांनी अध्यापन करताना वेगवेगळ्या टूल्सचा वापर करण्याची आवश्यकता स्पष्ट केली, तसेच समायोजन शोधिका ही 140 प्रश्नांची टेस्ट सर्व शिक्षकांची घेतली. यामध्ये कौटुंबिक ,आरोग्य, सामाजिक, भावनिक यावरील प्रश्न होते. सर्व शिक्षक व पदाधिकारी यांनी टेस्टमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर त्याचे मूल्यमापन केले गेले व आपण कोठे कमी आहोत हे शोधा हे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये असलेले गुण किंवा कमतरता आपण या वेगवेगळ्या तंत्रांच्या साह्याने समजून घेऊ शकतो. या अध्यापक प्रबोधिनी साठी सर्व शिक्षक पदाधिकारी, उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .राऊत मॅडम यांनी केले तर आभाराचे काम श्री .गायकवाड सर यांनी केले.
दि ११ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रशालेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.

एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीच्या 76 विद्यार्थ्यांनी प्रशालेत झाडे लावली.

गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या आरती स्पर्धेचे व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त झालेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर व मा.उपमुख्याध्यापिका सौ. पवार मॅडम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

दि. २५ सप्टेंबर २०२५ गुरुवार रोजी प्रशालेमध्ये अनुलोम या संस्थेतर्फे प्रशालेतील इ.९ वी, इ.१० वी च्या विद्यार्थांसाठी आपल्या संविधानाची पंच्याहत्तरी यावर आधारित कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमामध्ये PPT व VIDEO द्वारे विद्यार्थांना संविधानावर आधारित माहिती अतिशय प्रभावीपणे श्री. सोमनाथ देवकाते यांनी सादर केली.याच कार्यक्रमामध्ये विद्यार्थांकडून संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवून घेण्यात आली.सदर कार्यक्रमासाठी श्री सौरभ शिंगाडे,सौ आशाताई खेडकर,श्री ताम्हनकर यांचे विशेष सहकार्य लाभले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मा. पर्यवेक्षिका सौ .लिमये मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.गायकवाड सर यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे 25-09-2025 रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची अभिक्षमता मापन चाचणी ( Aptitude Test ) घेण्यात आली. अभिक्षमता मापन चाचणीच्या वेळेस प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. वसावे सर उपस्थित होते. चाचणी घेण्याकरिता व्यक्तिमत्व विकास केंद्राचे समुपदेशक श्री. सागर गायकवाड सर व केंद्राचे इतर समुपदेशकांची ही मदत घेण्यात आली. ज्यामध्ये समुपदेशक सुरेखा नंदे मॅडम, स्मिता लोकरे मॅडम आणि साक्षी शहा या सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांना चाचणीचे मार्गदर्शन करून चाचणी पूर्ण करून घेतली. या चाचणीचा अहवाल तयार झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना एकत्र बोलावून करिअर मार्गदर्शन करण्यात येईल.
म.ए.सो मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, सदाशिव पेठ, पुणे. प्रशालेत आजच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी घेण्याची अत्यंत महत्त्वाची गरज आहे.या दृष्टीने आज आरोग्य विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विनया दीक्षित उपस्थित होत्या. माननीय उपमुख्याध्यापिका श्रीमती पवार मॅडम यांनी गुलाब पुष्प व पुस्तक देऊन स्वागत केले. शारदा शक्तीच्या डॉक्टर उज्वला माटे यांचे स्वागत मा. पर्यवेक्षिका सौ.लिमये मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन केले. पाहुण्यांचा परिचय प्रशालेतील शिक्षिका सौ राऊत मॅडम यांनी केले. तसेच शारदा शक्तीच्या कार्यकर्ता डॉक्टर उज्वला माटे यांनी शारदा शक्ती विषयी माहिती सांगितली. आहार तज्ञ डॉक्टर विनया दीक्षित यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. यामध्ये बुद्धिवर्धक पदार्थ, आहार व झोप, रोजच्या आहारामध्ये गुळ, शेंगदाणे, खोबरे यांचा समावेश असावा, रोज संतुलित आहार घ्यावा, आहार बनवताना आनंदी वातावरण असावे इ. माहिती PPT च्या द्वारे सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ सातपुते मॅडम यांनी केले.
म.ए.सो मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, सदाशिव पेठ, पुणे प्रशालेत दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी करण्यात आली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन मा. मुख्याध्यापक श्री वसावे सर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेचे शिक्षिका सौ.सातपुते प्रमिला यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याची माहिती सांगितली.


दिनांक 12 /9/ 25 शुक्रवार रोजी आपल्या प्रशालेत सागर मित्र फाउंडेशन यांच्यातर्फे सागरमित्र व्याख्यान आयोजित करण्यात आले. हे व्याख्यान इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.या व्याख्यानासाठी श्री .बोधनकर सर व्याख्याते म्हणून लाभले. श्री बोधनकर सरांनी समुद्रातील प्लास्टिकचा कचरा, त्यामुळे होणारे दुष्परिणाम याबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर प्लास्टिकच्या कचऱ्याचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी करावे लागणारे उपाय याबाबत माहिती सांगितली. या या कार्यक्रमाला प्रशालेचे मा.मुख्याध्यापक श्री. वसावे सर ,मा.उपमुख्याध्यापिका सौ.पवार मॅडम ,मा. पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम, प्रशालेतील शिक्षक व इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी उपस्थित होते.
म.ए.सो मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, सदाशिव पेठ, पुणे प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्यूनिअर कॉलेज विभागात व माध्यमिक विभागात शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मा. मुख्याध्यापक श्री वसावे सर यांच्या हस्ते करण्यात आले. नरवडे या विद्यार्थ्याने शिक्षक दिना ची माहिती सांगितली ज्यूनिअर कॉलेजमधील १२वी मधील विद्यार्थी व माध्यमिक विभागातील ६ वी ते १० वी तील विद्यार्थी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक अभिरूप भूमिका वेगवेगळे विषय उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांना शिकवून साजरा केला. विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात मा.मुख्याध्यापक श्री.वसावे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच मा. पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम व उपमुख्याध्यापिका श्रीमती. पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या साकारलेल्या भूमिकेबद्दल प्रोत्साहन दिले, त्यांनी केलेल्या अध्यापनाचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. याबद्दल सहभागी विद्यार्थ्यी जय जोशी, सिद्धेश वसावे, त्रिशूल कांबळे, कुणाल मानकर कर्णबधिर युनिट मधून श्रेयस शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या वतीने आदित्य आढाव या विद्यार्थ्याने आजच्या अभिरूप शिक्षकांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.सहभागी शिक्षकांनी दिलेली जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडून हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी केला.
मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी म.ए.सो. मुलांच्या विद्यालयात मोठ्या आनंदात व उत्साहात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
प्रशालेतील सर्व पदाधिकारी , शिक्षक व सेवक श्रींच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.
श्रींच्या सुंदर विलोभनीय मूर्तीचे विसर्जन प्रशालेतील मा.मुख्याध्यापक श्री. वसावे सर, पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम व सर्व सेवक यांच्या हस्ते करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी प्रशालेत इको फ्रेंडली गणपती, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येने आणि उत्साहाने विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले होते.
प्रशालेच्या विसर्जन मिरवणुकीत मा.मुख्याध्यापक श्री वसावे सर, मा.उपमुख्याध्यापिका श्रीम. पवार मॅडम, मा. पर्यवेक्षिका लिमये मॅडम व ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख श्री बागुल सर, शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले. प्रसाद वाटप सौ. टपळे मॅडम आणि सौ.गायकवाड मॅडम यांनी केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे समुपदेशक श्री.सागर गायकवाड यांनी इयत्ता 8 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लैंगिक शोषण होण्यापासून थांबविण्याकरिता ' चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श ' ( GOOD TOUCH AND BAD TOUCH ) या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती व्याख्यान देण्यात आले. गुड टच आणि बॅड टच हे बालकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या शरीराच्या सुरक्षेविषयी आणि त्यांच्या शरीरासंबंधी योग्य व चुकीच्या स्पर्श बाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना गुड टच म्हणजे काय तो कोणत्या प्रकारचा असतो याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर बॅड टच बद्दल माहिती देण्यात आली व तो कशा प्रकारचा असू शकतो हे सांगण्यात आले. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना एक शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली. गुड टच आणि बॅड टचचा विद्यार्थ्यांवर शारीरिक परिणाम, मानसिक परिणाम, शैक्षणिक परिणाम कसा होऊ शकतो हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी अडकले तर स्वतःचा बचाव करण्याकरिता आपण कोणकोणत्या पर्यायांचा वापर करू शकतो हे सांगण्यात आले व चाइल्ड हेल्पलाइन ( Child Helpline 1098 ) पासून विद्यार्थ्यांना कशी मदत मिळू शकते याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी PROTECTION OF CHILDREN FROM SEXUAL OFFENCES ( POCSO ACT - 2012 ) या विषयाचे व्याख्यान देण्यात आले. ज्यामध्ये 18 वर्ष खालील बालकांसाठी लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्याकरिता प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स फ्रॉम सेक्सयुअल ऑफेन्स कायदा 2012 म्हणजे ( POCSO ) कायदा करण्यात आला हे सांगितले व या कायद्याची माहिती देण्यात आली. या कायद्याची गरज का हे मुलांना सांगण्यात आले नेमका कायदा काय असतो हे स्पष्ट करण्यात आले. यात पीडित मुलाला किंवा मुलीला या कायद्यामध्ये त्यांच्यासाठी काय प्रक्रिया व तरतुदी आहेत तेही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले त्याचबरोबर या कायद्यातील वैशिष्ट्ये काय आहेत हे ही सांगण्यात आले व व्याख्यान पूर्ण करण्यात आले.
म. ए. सो. मुलांचे विद्यालयात 1975 सालच्या माजी विद्यार्थ्यंनतर्फे प्रशाळेतील दोन मजले रंगवण्याच्या कामात व वर्गाचे सुशोभीकरण करण्याचा उपक्रम केला. ह्या कामाचे उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी संस्थेचे CEO व 1975 बँच चे माजी विद्यार्थी,थत्ते सर, श्रीहर्ष थत्ते सर,बागूल सर , दहीतुले सर इ. उपस्थित होते.
शनिवार दिनांक 23/08/2025 रोजी डॉ.प्र.ल.गावडे सभागृहात Rotary Club Of Pune Lokmanyanagar RID3131 यांच्या तर्फ Science Teacher Training program ही एकदिवशीय कार्यशाळा सकाळी 9:00 ते 6:00 या वेळेत घेण्यात आली.या कार्यशाळेस डॉक्टर मनीषा जाईल कमिन्स कॉलेजच्या प्राध्यापिका यांनी Active learning अंतर्गत Show me board, Concept map, DART, Chemical jigsaws,Tarsia puzzle, practical Activity, Bingo ,Dominoes,Chemical reactions grid असे वेगवेगळे प्रयोग, activity आमच्याकडून करून घेतले, त्यामधून Science मधील Concept अधिकच क्लिअर झाले.या कार्यशाळेत आपल्या प्रशालेतील श्रीमती.सुवर्णा काळे व श्रीमती.ज्योती पोखरकर यांनी आपला सहभाग नोंदवला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे समुपदेशक श्री.सागर गायकवाड यांनी इयत्ता पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लैंगिक शोषण होण्यापासून थांबविण्याकरिता ' चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श ' ( GOOD TOUCH AND BAD TOUCH ) या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती व्याख्यान देण्यात आले. गुड टच आणि बॅड टच हे बालकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या शरीराच्या सुरक्षेविषयी आणि त्यांच्या शरीरासंबंधी योग्य व चुकीच्या स्पर्श बाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना गुड टच म्हणजे काय तो कोणत्या प्रकारचा असतो याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर बॅड टच बद्दल माहिती देण्यात आली व तो कशा प्रकारचा असू शकतो हे सांगण्यात आले. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना एक शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली त्याचबरोबर गुड टच आणि बॅड टचचा विद्यार्थ्यांवर शारीरिक परिणाम, मानसिक परिणाम, शैक्षणिक परिणाम कसा होऊ शकतो हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. त्याचबरोबर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी अडकले तर स्वतःचा बचाव करण्याकरिता आपण कोणकोणत्या पर्यायांचा वापर करू शकतो हे सांगण्यात आले व चाइल्ड हेल्पलाइन ( Child Helpline 1098 ) पासून विद्यार्थ्यांना कशी मदत मिळू शकते याबद्दल माहिती देण्यात आली.




* लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम
शुक्रवार ,दिनांक 1 ऑगस्ट रोजी प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री.वसावे सर, माननीय उपमुख्याध्यापिका सौ. पवार मॅडम, माननीय पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
* इयत्ता नववी अ मधील जय जोशी या विद्यार्थ्याने लोकमान्य टिळकांविषयी माहिती सांगितली तर निंबरे अश्विन या विद्यार्थ्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती सांगितली.
* लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
*
३१ जुलै, २०२५ रोजी म. ए. सो. शिक्षण प्रबोधिनी द्वारा होय, मी शिक्षक आहे . या विषयावर प्र.ल.गावडे सभागृहात मा. डॉ. प्रदीप आगाशे यांचे व्याख्यान आयोजित केले. यासाठी पुण्यातील शाळांमधील सर्व शिक्षक सभागृहात उपस्थित होते . तसेच पुण्याबाहेरील शाळांमधील सर्व शिक्षक online पद्धतीने सकाळी १०.०० ते ११.३० या वेळेत join होते .
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय,पुणे. येथे 28 जुलै 2025 रोजी आपल्या प्रशालेमध्ये कौशल्य विकसन आयोजित पुष्प पहिले.
नागपंचमीनिमित्त मेंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये इयत्ता 5 वी ते इयत्ता 10 वी पर्यंतचे 86 विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या सौ. धनश्री मनोज हेंद्रे
लिमका बुक रेकॉर्ड व युनिक वर्ल्ड रेकॉर्ड
पारितोषिक विजेत्या व सामाजिक काम करणाऱ्या पाहुण्या यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी विद्यार्थ्यांना कमवा व शिका. असा संदेश दिला. धनश्री मॅडम यांनी मुलांना संवाद साधताना असं सांगितले आहे की त्यांच्या वीस वर्षाच्या कार्यकाळात प्रथमतः मुलांनी मेंदी काढलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षण केले व विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले.
मृगनयनी मेहंदी टीम मधील सौ.धनश्री हेंद्रे (प्रमुख कलाकार),हर्षला पेढामकर, गौरी पवार व मेघा देवरुखकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रशालेतील महिला शिक्षिका यांच्या हातावर मेहंदी काढून नागपंचमी हा सण उत्साहाने साजरा केला.
मुलांनी मेहंदीचे कोण तयार करून सुबक व सुंदर मेहंदी कशी काढावी याबद्दल सर्व मृगनयनी मेहंदी टीम यांनी विद्यार्थ्यांना कलात्मक पद्धतीने कृतीयुक्त मार्गदर्शन केले.
कौशल्य विकसन या उपक्रमाच्या अंतर्गत
कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे सर यांनी केले.
प्रास्ताविक प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ.रसिका लिमये मॅडम यांनी केले. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती पवार मार्गसिद्धा मॅडम यांनी कौशल्य विकसन अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कलाकृती तयार करून विद्यार्थ्यांनी त्या वस्तू प्रदर्शित कराव्या असा संदेश दिला.
सूत्रसंचालन सौ.अनघा बोत्रे मॅडम यांनी केले.
स्पर्धेचे नियोजन कलाशिक्षक बाळासाहेब माळी यांनी केले.
प्रशस्तीपत्र प्रदान करण्याची जबाबदारी सौ नांगरे मॅडम यांनी केली.
26 जुलै कारगिल विजय दिवस
म.ए.सो.. मुलांचे विद्यालयात
२६ जुलै २०२५ रोजी कारगिल विजय दिवसानिमित्त म.ए.सो.भावे हायस्कूल, रेणुका स्वरूप मुलींचे विद्यालय,सौ. विमलाबाई गरवारे शाळा ,NCC विभागाच्या संयुक्त विद्यमाने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीत एन सी सी कॅडेट्सनी कारगिल विजय दिवस अमर रहे, 'जय जवान जय हिंद अशा घोषणा देत परिसरात देशभक्तीची प्रेरणा दिली .कॅडेट्सनी शिस्तबद्ध मिरवणूक काढून शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते परिसरातील प्रमुख मार्गापर्यंत रॅली काढली.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मैदानावर प्रार्थना व कारगिल युद्धातील वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. शाळेच्या शिक्षकांनी व एनसीसी अधिकारीयांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कारगिल विजय दिवसाचे महत्त्व व शौर्यगाथा सांगितल्या.
प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री वसावे सायसिंग यांनी प्रास्ताविकात या युद्धात अनेक शूर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे हे बलिदान आपण कधीही विसरणार नाही त्यांच्या अदम्य धैर्यामुळे आणि देशावरील प्रेमामुळेच आपण आज सुरक्षित आहोत. तसेच विद्यार्थ्यांना व्यसनांपासून , अंमली पदार्थांपासून दूर राहावे असे सांगितले.
प्रमुख पाहुणे मा.श्री सारंगजी भिडे सर यांनी कारगिल विजय दिवसाचे महत्त्व सांगून .कारगिल युद्धातील विजयाने भारताचे ताकद आणि आपल्या सैनिकांचे धैर्य जगाला दाखवून दिले. आजच्या या दिवशी आपण आपल्या सैनिकां बद्दल आदर व्यक्त करावा हे आपल्या सर्वांचे हे कर्तव्य आहे . आपण आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत.
या दिनाचे औचित्य साधून एनसीसी थर्ड ऑफिसर सौ मंजुश्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री निर्भयजी पिंपळे सर यांनी आपण आज जे स्वातंत्र्य उपभोगत आहे त्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या सैनिकांनी काय स्मरणात ठेवा असे ते म्हणाले.
या कार्यक्रमासाठी सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री भारमळ रोहिदास, उपमुख्याध्यापिका सौ खिरीड मॅडम , पर्यवेक्षिका सौ शिंदे मॅडम,रेणुका स्वरूप प्रशालेच्या मुख्याध्यापिका शुभांगी कांबळे, भावे हायस्कूलच्या पर्यवेक्षिका सौ.लिमये रसिका ,माजी विद्यार्थी श्री पराग गुजराती तसेच तिन्ही शाळेचे एनसीसी कॅडेट्स , व फस्ट ऑफिसर यशोधिनी कुलकर्णी व थर्ड ऑफिसर जोशी सुनील आणि शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ.बधे मॅडम यांनी मानले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती कार्यक्रम
बुधवार दिनांक 23 जुलै 2025 रोजी प्रशालेमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली .
प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री.वसावे सायसिग,उपमुख्याध्यापिका श्रीम पवार मॅडम व पर्यवेक्षिका श्रीमती लिमये मॅडम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
तसेच प्रशालेतील विद्यार्थी
१)कारिते ७ वी अ
२)हरमळे ७ वी अ
२)जोशी जय ९वी अ
यांनी टिळकांविषयी माहिती सांगितली .
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेमध्ये मराठी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.स्पर्धेत प्रत्येक इयत्तेतून प्रथम व द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना आज प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

म. ए.सो. मुलांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (भावे हायस्कूल) येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी प्रशालेच्या प्रांगणात दुपारी 12:00 वाजता संस्थेचे शाला समितीचे अध्यक्ष मा श्री दिलीपजी शेठ, प्रमुख पाहुणे माननीय श्री मिलिंदजी लिमये ( माजी विद्यार्थी ) यांच्या सन्माननीय उपस्थितीत व्यास पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकातून माननीय मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे यांनी गुरूं प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवशी त्यांचे पूजन करीत आहोत असे सांगून प्रशालेत यावर्षी 10 जुलै ते पाच सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या कृतज्ञता निधी संकलनाविषयी माहिती देऊन सर्व माजी विद्यार्थी व शिक्षकांना सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी आवाहन करण्यात आले.
त्यानंतर प्रत्यक्ष गुरुजनांना श्रीफळ व पुष्प देऊन गुरुपूजन करण्यात आले. याचवेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रशालेचे माजी विद्यार्थी दिलीप जी शेठ व माजी विद्यार्थी श्री मिलिंद लिमये तसेच सर्व माजी विद्यार्थी यांच्या हस्ते सोहळ्यासाठी उपस्थित सर्व माजी शिक्षकांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार केला. त्यानंतर प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ ज्योती कांबळे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व मुलांना सांगितले. प्रतिनिधिक रूपात माजी पर्यवेक्षिका सौ घुमे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त छोटी गोष्ट सांगून घरातील वृद्धांचाही आदर करावा हा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री मिलिंदजी लिमये यांनी शाळेच्या संस्कारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून बाबत ऋणी राहण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीप जी शेठ यांनी या निमित्ताने दानशूरपणाचे महत्त्व सांगून शाळेच्या ऋण मनात ठेवून कृतज्ञता निधी अभियानास सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी प्रशालेचे माजी विद्यार्थी मा श्री मिलिंदजी लिमये यांनी प्रशालेसाठी 51 हजारांचा निधी प्रशालेस दिला.
याप्रसंगी उपमुख्याध्यापिका मार्गसिद्धा पवार ,पर्यवेक्षिका रसिका लिमये , प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री आनंदजी सराफ, माजी विद्यार्थी योगेश थत्ते,विश्वेश देसाई, सुरेंद्र निरगुडे, प्रसिद्ध राष्ट्रीय खेळाडू गोपाळ मिरजकर, पराग गुजराथी, तसेच माजी शिक्षिका माधुरी मुळे, सुमन केंची,श्रीमती अभ्यंकर, श्रीमती उमरे ,श्रीमती साळवी, अभ्यंकर, जोशी,केळकर ,भोळे, पीके कुलकर्णी, झेंडे ,श्री चव्हाण बी एन यांसह माजी मुख्याध्यापक श्री के एन अरनाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेच्या शिक्षिका सौ अनघा बोत्रे यांनी केले . याच कार्यक्रमात प्रशालेच्या सर्व शिक्षकांचा पालक शिक्षक संघातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बहुसंख्येने माजी विद्यार्थी,पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..
*आषाढी एकादशी निमित्त प्रशालेत पालखी सोहळा*
दिनांक शनिवार दिनांक ५ जुलै २०२५ रोजी प्रशालेमध्ये आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा अत्यंत उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे शाला समिती अध्यक्ष मा. श्री. दिलीपजी शेठ सर, प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री.सायसिंग वसावेसर उपमुख्याध्यापिका श्रीमती मार्गसिद्ध पवार पर्यवेक्षिका सौ.रसिका लिमये, शिक्षक पालक संघाचे सदस्य, सर्व शिक्षका - शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका मा. श्रीमती पवार मॅडम यांनी केले.शालासमिती अध्यक्ष आजचे प्रमुख पाहुणे श्री शेठ सर यांनी आपल्या मनोगतामध्ये पंढरीची वारी, पालखी सोहळा, ज्ञानेश्वरी तसेच वारकऱ्यांची शिस्त सांगितली. प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात गुरु असणे किती आवश्यक आहे? हे त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून सांगितले.
यानंतर पालखीचे पूजन होऊन शालेय परिसरामध्ये पालखी दिंडी निघाली. हरिनामाच्या जयघोषाने शालेय परिसर दुमदुमला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूजा नांगरे,पाहुण्यांचा परिचय श्री मस्के सर,आषाढी एकादशीची माहिती सौ. अनघा बोत्रे यांनी केले.याप्रसंगी इयत्ता सहावी क मधील गणराज लोंढे याने सुश्राव्य अभंग सादर केला.
आज शनिवार दि. 5 जुलै 2025 रोजी प्रशालेत पालक मित्र सेवा ग्रुप च्या वतीने शाळेतील गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शूज आणि साॅक्स चे वितरण करण्यात आले.
पालक मित्र सेवा ग्रुप हा दोन महिन्यापूर्वी शाळेतीलच काही पालकांनी एकत्रित येऊन तयार केला आहे. या ग्रुपच्या वतीने प्रशालेतील इ. 5 वी ते 10 वी तील 50 हुशार, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेष वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री वसावे सर, उपमुख्याध्यापिका श्रीम.पवार मॅडम, पर्यवेक्षिका सौ.लिमये मॅडम त्याचबरोबर पालक मित्र सेवा ग्रुप चे दहा, बारा पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
शिक्षण विवेक जुलै महिन्यातील याचे प्रकाशन करताना शालेय पदाधिकारी , शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

संत सप्ताह आज दिनांक २ जुलै बुधवारपासून सुरुवात झाली.
संत तुकारामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ
दिनांक 30 जून 2025 सोमवार रोजी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रशालेचे माजी विद्यार्थी मा. श्री मिलिंदजी नागनाथ लिमये .शाला समितीचे अध्यक्ष मा. श्री दिलीपजी शेठ सर ,प्रशालेचे मा.मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे , उपमुख्याध्यापिका श्रीमती मार्गसिद्धा पवार, पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
प्रास्ताविकात मा.श्री सायसिंग वसावे सरांनी प्रशालेचा निकाल जाहीर केला. इयत्ता दहावीचा निकाल 100% इयत्ता बारावी सायन्स चा निकाल 100% व इयत्ता बारावी वाणिज्य शाखेचा निकाल 96% लागला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करा. खूप कष्ट करा. आई वडील ,शाळा व शिक्षकांनी केलेले संस्कार विसरू नका. समाजासाठी ,देशासाठी एक आदर्श नागरिक बना. असे ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे माननीय श्री मिलिंद जी लिमये सरांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना दलाई लामांच्या गोष्टीतून कठीण परिस्थितीतून दृढनिश्चय करणे त्याचप्रमाणे पूर्व नियोजित ध्येय ठरवा त्या त्या दृष्टीने प्रयत्न करा. जिज्ञासा, संकल्प ,दूरदृष्टी जोपासा त्यामुळे आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले व विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या
मा.श्री दिलीपजी शेठ सरांनी ज्याप्रमाणे शिल्पकार ओबडधोबड दगडातून मूर्ती साकारतो .त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात. विद्यार्थ्यांनी जिद्द उत्तम ध्येय ,संकल्प ,प्रयत्न केल्याने पुढील आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ चौधरी सोनाली, पाहुण्यांचा परिचय श्रीमती सुवर्णा काळे ,गुणवंत विद्यार्थ्यांचे यादी वाचन सौ सातपुते व सौ बोरा ,आभार श्री पारवे सर यांनी मानले.
दिनांक 12 जून ते 24 जून 2025
मध्ये राष्ट्रीय डेफ कुस्ती स्पर्धा आणि ज्युडो स्पर्धाउत्तर प्रदेश येथे झाली या स्पर्धेत कर्णबधिर युनिट मधील अक्षय राम बोराडे याला कुस्ती स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल आणि ज्युडो स्पर्धेमध्ये सिल्व्हर मेडल मिळाले.

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन
दिनांक 21 जून 2025 शनिवार रोजी म . ए .सो. मुलांच्या विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रशालेचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. श्रीकांतजी केळकर तसेच शाला समितीचे अध्यक्ष मा. श्री दिलीपजी शेठ सर, प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री वसावे सायसिंग ,उपमुख्याध्यापिका श्रीमती मार्गसिद्धा पवार मॅडम, पर्यवेक्षिका सौ रसिका लिमये मॅडम ,योग मार्गदर्शक श्री मारुती पाटील व सौ पाटील उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात मा. मुख्याध्यापक सर श्री सायसिंग वसावे सर यांनी योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे .आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग व प्राणायाम नियमितपणे करणे आवश्यक आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले.
प्रमुख पाहुणे मा. डॉ. श्रीकांतजी केळकर सरांनी आपल्या शाळेतील व कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला. आई वडील, गुरुजन व शाळेने केलेले संस्कार यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व घडले तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी योग व प्राणायाम करणे खूप महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
शाला समिती अध्यक्ष मा. श्री .दिलीपजी शेठ सरांनी श्वास ,मन व बुद्धी यांचा समन्वय साधण्यासाठी योग खूप महत्त्वाचे आहे. योग हे आपले व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी व शरीराला ऊर्जा देणारे साधन आहे असे ते म्हणाले.
त्यानंतर योग मार्गदर्शक मा. श्री मारुती पाटील व सौ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांनी मिळून सामूहिक योग व प्राणायाम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खूणे सर ,पाहुण्यांचा परिचय सौ अराणके मॅडम, योग दिनाची माहिती श्री अनासपुरे सर व आभार सौ. गायकवाड मॅडम यांनी मानले.
दिनांक: 18/6/2025
कार्यक्रम: झाशीच्या राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी.
आज प्रशालेमध्ये झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला इयत्ता पाचवी ते दहावी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर, माननीय पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम, श्री खुणे सर, सौ. सविता गायकवाड मॅडम, सौ. अराणके मॅडम, प्रशालेतील विद्यार्थी यांनी प्रतिमेचे पूजन केले. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची माहिती सौ. सविता गायकवाड मॅडम यांनी सांगितली.

दिनांक: 17/6/2025
कार्यक्रम: राजमाता जिजाऊ पुण्यतिथी.
आज प्रशालेमध्ये राजमाता जिजाऊ यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी ते दहावी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर, माननीय पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम, श्री खुणे सर, सौ सविता गायकवाड मॅडम, सौ अराणके मॅडम, प्रशालेतील विद्यार्थी यांनी प्रतिमेचे पूजन केले. राजमाता जिजाऊ यांची माहिती सौ. अराणके मॅडम यांनी सांगितली.

नवीन शैक्षणिक वर्ष सन 2025 -26 स्वागत समारंभ. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अंबर्डेकर सर, कसबा मतदार संघाचे क्रियाशील नगरसेवक मा. योगेश समेळ सर,म.ए.सो मुलांचे विद्यालय चे मुख्याध्यापक मा.श्री.वसावे सर, उपमुख्याध्यापक मा. श्री. गवळे सर, पर्यवेक्षिका मा. सौ. रसिका लिमये मॅडम, प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय उत्साहाच्या वातावरणात विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले गेले. कटपुतल्यांच्या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशालेबद्दल माहिती दिली गेली, त्याचबरोबर नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्याना प्रशालेकडून छोटीसी भेट देण्यात आली. प्रातिनिधिक स्वरूपात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप केले गेले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री अंबर्डेकर सर यांनी सर्व प्रशालेतील विद्यार्थ्यांचे स्वागत केले व पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर मा. नगरसेवक योगेश समेळ सर यांनी सुद्धा गोष्टीरूपाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
म. ए. सो. मुलांचे विद्यालयात संकल्पदिन उत्साहात साजरा.
दिनांक 14जून 2025शनिवार रोजी प्रशालेच्या डॉ प्र.ल गावडे सभागृहात शाला समिती अध्यक्ष श्री. दिलीप शेठ यांच्या सन्मान्य उपस्थितीत संकल्प दिन साजरा करण्यात आला. प्रशालेच्या पर्यवेक्षिका रसिका लिमये यांनी प्रास्ताविकातून गुणवत्त्ता विकसनासाठी प्रेरक विचार करण्या संदर्भात असलेला हा संकल्प दिन साजरा करण्याचा हेतू स्पष्ट केला. प्रशालेच्या प्राध्यापिका सौ. कल्याणी जोशी यांचे सह सर्वांनी सामुदायिक रित्या विद्यार्थी विकासाचा संकल्प केला. माननीय मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे यांनी आपल्या मनोगतातून सर्वांनी जबाबदारी व कर्तव्याचे अचूक भान राखून मनापासून कार्यरत राहण्याचा संदेश दिला. सर्वांनी नाविन्यपूर्ण अध्यापनासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत तसेच प्रशासकीय कामास सहकार्य होईल असे वर्तन असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. शाळा समिती अध्यक्ष श्री दिलीप शेठ यांनी आपल्या मनोगतातून वक्तशीरपणा, निश्चित नियोजन, सुदृढपणा यांचे महत्त्व सांगितले व त्यासाठीचे सोपे उपायही सांगितले. प्रसन्नता व शांततेसाठी ओंकाराचे प्रात्यक्षिक घेतले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक श्री चंदू गवळे, जुनिअर कॉलेज प्राध्यापक श्री बागुल यांसह पाचवी ते बारावीचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका अमृता अराणके यांनी तर आभार प्रदर्शन सविता गायकवाड यांनी केले.






























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































