शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी प्रशालेच्या प्र.ल.गावडे सभागृहात आगामी शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या संदर्भात सर्व शालेय पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी संकल्प घेऊन नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवात केली. पर्यवेक्षिका सौ विद्या शिंदे मॅडम यांनी संकल्पचा हेतू व्यक्त करून नववर्षाच्या सदिच्छा दिल्या. प्रशालेच्या शिक्षिका सौ. खिरिड मॅडम यांनी संकल्पाचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळा समितीचे अध्यक्ष व प्रशालेचे माजी विद्यार्थी एस.पी. कॉलेजचे माजी प्राचार्य श्री दिलीप शेठ यांनी आपल्या मनोगतातून संकल्पाच्या महत्त्वापासून संकल्प सिद्धीच्या वाटेवर येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगितले. आशावादी दृष्टीकोन ठेवून कार्यरत राहण्याचा संदेश दिला. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वसावे सर यांनी आपले विचार व्यक्त करताना सहकार्याचे महत्त्व सांगत आरोग्य राखण्याचा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे हा संदेश दिला. त्याचबरोबर वक्तशीरपणा, स्वयंशिस्त, कार्य तत्परता यांचे पालन करण्यास सांगितले विद्यार्थी विकासासाठी आवश्यक गोष्टींबाबत सविस्तर आढावा घेतला.
२६ ऑगस्ट २०२३ रोजी इंडियन रेड क्रॉस सोसायटी पुणे डिस्ट्रिक्ट ब्रांच तर्फे शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख श्री सतीश चंद्र कांकरिया होते. ट्रेनिंग मध्ये श्री.आर.व्ही. कुलकर्णी सरांनी सोसायटीची माहिती सांगितली. प्रशालेतून श्रीमती बधे, श्रीमती खाडे व श्री दौंडकर या शिक्षकांचा सहभाग होता.

विशेष उल्लेखनीय कामगिरी
जिल्हा क्रीडा परिषद व पुणे मनपा आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटामध्ये १२ ब मधील शेळके अपूर्व रमेश यांस प्रथम क्रमांक मिळाला.
नगर, नेवासा फाटा येथे झालेल्या विभागीय (झोनल) ज्युदो स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील वयोगटामध्ये ११ अ मधील मार्टिन ओव्हाळ यांस ब्राँझ पदक मिळाले.
जिल्हा क्रीडा परिषद आयोजित झालेल्या जिल्हास्तरीय ड्रॉप रॉवॉल स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील गटामध्ये विध्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्ण व रौप्य पदक मिळवले. ११ ब मधील ढेबे अथर्व हा विद्यार्थी सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.
मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्रीयन मंडळ याठिकाणी टेन इक्विड या खेळात जिल्हास्तरीय स्तरावर १९ वर्षाखालील गटामध्ये प्रशालेला उपविजेते पद मिळाले.
रंगवेध चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन
म.ए.सो. कलावर्धिनीतर्फे घेण्यात आलेल्या ‘रंगवेध’ चित्रकला स्पर्धेत प्रशालेतील ११ क मधील चि.प्रज्वल कुचेकर परेश या विध्यार्थ्याचा ज्यु. कॉलेज गटामध्ये दुसरा क्रमांक मिळाला.

क्रांतीदिना निमित्त सावरकर भवनास ज्यु. कॉलेज विद्यार्थ्यांची भेट
9 ऑगस्ट 2023 प्रशालेत क्रांती दिन साजरा करण्यात आला क्रांती दिनानिमित्त ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना कर्वे रोडवरील सावरकर भवनास भेट देण्यास नेण्यात आले. त्या ठिकाणी सावरकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून पूजन करण्यात आले इयत्ता बारावी ब मधील डेंगळे व टोकापुरे यांनी सावरकरांबद्दल माहिती सांगितली त्यानंतर तेथील हॉलमध्ये मुलांना नेण्यात आले तेथे सौ कुलकर्णी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सावरकरांच्या तुरुंगातील अनुभवावर आधारित माझी जन्मठेप या पुस्तकातील सावरकरांचे काही अनुभव सांगितले त्यानंतर विद्यार्थ्यांना सावरकरांच्या जीवनावर आधारित एक चित्रफित दाखवण्यात आली दाखविण्यात आली.
जागतिक एड्स दिन – व्याख्यान
जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त एड्स बद्दलची जागरूकता व एड्स बद्दल समाजात असणारे समज-गैरसमज याबद्दल ऊहापोह करणारे व्याख्यान प्रशालेत शुक्रवार दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता ११वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आले होते.
या व्याख्यानासाठी एकूण तीन प्रमुख वक्ते बोलावले होते. श्री रोहित कांबळे, श्री रोहित बोरावके व श्री विकास गवळी हे सर्व वक्ते MSW प्राप्त जीवन कौशल्य प्रशिक्षक होते. स्त्री मुक्ती संघटनेचे सदस्य तसेच शालेय समुपदेशक म्हणूनही हे काम करीत आहे. या व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांना एड्स बद्दलचे समज-गैरसमज, ज्ञान म्हणजेच त्याची लागण होण्याची कारणे, एड्स झाल्यानंतरची औषधोपचार पद्धती याबद्दलची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी लैंगिक शिक्षणा अंतर्गत त्यांच्या शंकांचे निरसन व्याख्यात्याकडून करून घेतले.

ध्वज पथकाचे सादरीकरण
१२ जानेवारी स्वामी विवेकांनद जयंती अर्थात युवा चेतना दिनानिमित्त आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मैदानात दरवर्षी वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जाते. यावर्षी प्रशालेतील ११ ब या वर्गातील एकूण ७० विद्यार्थ्यांनी यावेळी ढोल,ताशा व झांज यांच्या तालावर ध्वज पथकाचे खूप सुंदररित्या सादरीकरण केले. या सादरीकरणात ध्वजाची वेगवेगळी प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली. यावेळी ढोल व ताशांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला. त्यामध्ये ढोल व ताशाच्या ठेक्यावर गोलाकार रचना,चौरस रचना, M.E.S. चे नाव अशा वेगवेगळ्या रचनांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री.तनपुरे सुनील व सौ. चौधरी सोनाली यांनी केले.

प्रश्नमंजुषा स्पर्धा ( बाह्य स्पर्धा )
विद्यार्थ्यांमध्ये चौकस वृत्ती, समाधीटपणा, नेतृत्त्व गुण, विषयाचे ज्ञान, वेळेची समय सूचकता, सतर्कता या गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने इयत्ता बारावी कॉमर्स विद्यार्थ्यांना Union Bank Of India आयोजित National Level General Awareness (U - Genious ) All India Quiz Competition साठी दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी बनतारा भवन ऑडिटोरियम, बाणेर या ठिकाणी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० पर्यंत प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी पाठवण्यात आले. इयत्ता १२वी ब कॉमर्स शाखेतील एकूण पाच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वरील सर्व विद्यार्थी पहिल्या फेरीपर्यंत चुरशीने खेळले.
या विद्यार्थ्यांना स्पर्धा सहभागाचे प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक करण्यात आले.

पालक आणि शिक्षक यांच्यातील स्नेह संबंध वाढण्यासाठी आणि आपुलकीचे नाते निर्माण होण्यासाठी २१ ऑक्टोबर २०२३ शनिवार रोजी प्रशालेमध्ये भोंडल्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. इयत्ता ५ वी ते १२ वीचे पालक, पालक प्रतिनिधी , सर्व शिक्षक वृंद आणि पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी होते. या कार्यक्रमाची सुरुवात हत्ती पूजनाने करण्यात आली. हत्तीचे पूजन केल्यानंतर भोंडल्याची माहिती सांगितली. त्यानंतर गाणी म्हणून फेर धरून भोंडला साजरा करण्यात आला. त्यानंतर दांडिया खेळण्यात आला. खिरापत म्हणून खिचडी देण्यात आली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या आठवणींना व त्यांच्या महान कार्याला उजाळा देण्यासाठी ३ ऑक्टोबर ,२०२३ मंगळवार रोजी प्रशालेमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन करून जुनिअर कॉलेजमधील इयत्ता १२ वी मधील चि.चैतन्य जाधव या विद्यार्थ्याने महात्मा गांधी यांची माहिती सांगितली व प्रणव कालेकर या विद्यार्थ्याने लालबहादूर शास्त्री यांची माहिती सांगितली. स्वच्छतेच्या प्रतिज्ञेचे वाचन
करून विद्यार्थ्याकडून आणि शिक्षकांकडून तसा शपथविधी पार पडला.


विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वेगवेगळ्या विषयातील माहिती आणि ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी १४ ऑक्टोबर ,२०२३ वार शनिवार रोजी प्रशालेमध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त सामुहिक वाचन आणि पुस्तक परीक्षण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशाळेतील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होते. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची माहिती सर्व विद्यार्थ्यांना सांगितली आणि विद्यार्थ्यांनी एकाच वेळेला सामुदायिक वाचक केले. तर जुनिअर कोलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी वाचलेल्या अवांतर वाचनाच्या पुस्तकाचे त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांसमोर परीक्षण केले.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्त्व गुण, सभाधीटपणा, विषयाचे ज्ञान व आपली बाजू ठामपणे, मुद्देसूद मांडणे या गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने प्रशालेत मंगळवार दिनांक १२ डिसेंबर २३ रोजी जुनिअर कॉलेज विभागात 'वादविवाद स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण ३६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रत्येक विद्यार्थ्याला आपली बाजू मांडण्यासाठी दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. ही स्पर्धा मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांतून घेण्यात आली. मराठी भाषेतून तीन व इंग्रजी भाषेतून तीन विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. मा.पर्यवेक्षिका सौ.देशपांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार या स्पर्धेचे परीक्षण प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. कांबळे ज्योती मॅडम व सौ.कचरे मॅडम केले. तर स्पर्धेचे नियोजन श्रीमती उबाळे मॅडम यांनी केले.
या स्पर्धेतील विजयी विद्यार्थास बक्षीस वितरण कार्यक्रमात रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
आंतरशालेय स्तरावर जिल्हा, राज्य स्तरावर विशेष कामगिरी
जिल्हास्तरीय आंतरशालेय ‘ड्रॉप रो बॉल’ स्पर्धेत चि. जाधव जयवर्धन, चि. ठाणेकर तन्मय व चि. पवार वरद यांनी ‘ट्रिपल इव्हेंट’ मध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. तसेच विभागीय स्पर्धेत पुणे शहर विभागाचे ‘ट्रिपल इव्हेंट’ मध्ये नेतृत्व करून द्वितीय क्रमांक पटकावला.
हायटेक टेक्निकल कॉलेज गाजियाबाद उत्तर प्रदेश येथे झालेल्या ‘सब ज्युनिअर’ या गटात ‘ट्रिपल इव्हेंट’ मध्ये महाराष्ट्रचे नेतृत्व करून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले.
जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय ‘फेंटबॉल’ स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे नेतृत्व करत ‘ट्रिपल इव्हेंट’ मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
इ.७वी क मधील चि. वरद विशाल पवार याने ड्रॉप रो बॉल जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत व निवड चाचणी २०२३ या स्पर्धेत ‘सिंगल इव्हेंट’ मध्ये तिसरा क्रमांक मिळवला. पुढे नायगाव सातारा येथे राज्यस्तरीय ड्रॉप रो बॉल स्पर्धेत ‘सिंगल इव्हेंट’ मध्ये सहभागी झाला. त्यातून पुढे राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड झाली.
प्रशालेतील १७ वर्षे वयोगटाचा कबड्डी संघ आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत सेमी फायनल मध्ये पोहोचले.
चि. दुबे अंश जितेंद्र ९वी मधील विद्यार्थ्यास जिल्हा क्रीडा परिषद पुणे व पुणे महानगरपालिका आयोजित कबड्डी स्पर्धेत निवड झाली.











