

दिनांक 25मार्च 2026 बुधवार रोजी रामनवमीच्या निमित्ताने प्रशालेत ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागूल सर ,शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांनी प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सौ. जोशी मॅडम यांनी अत्यंत प्रभावीपणे विद्यार्थ्यांना रामनवमीची माहिती सांगितली, तसेच वर्मा सर यांनी विद्यार्थ्यांकडून रामरक्षा पठण करून घेतले. महिना प्रमुख सौ सोनाली चौधरी मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
दिनांक 23मार्च 2026 सोमवार रोजी शहीददिनाच्या निमित्ताने प्रशालेचे ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागूल सर ,शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच सौ सोनाली चौधरी मॅडम यांनी शहीददिनाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
दिनांक 12 मार्च 2026 गुरवार रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेचे ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागूल सर ,शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच सौ सोनाली चौधरी मॅडम यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची माहिती सांगितली.

दिनांक 10 मार्च 2026 मंगळवार रोजी सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर,माननीय उपमुख्याध्यापिका सौ पवार मॅडम,ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागूल सर ,शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच सौ सोनाली चौधरी मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली.

शुक्रवार दिनांक 13/02/2026 रोजी प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेतर्फे इयत्ता 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पर व्याख्यान घेण्यात आले. यावेळी Spectrum Academy मधून श्री अंकुश माकोडे यांनी विद्यार्थ्यांना UPSC MPSC SSC CGS अशा विविध परीक्षा आणि त्यांचे स्वरूप याविषयी मार्गदर्शन केले. परीक्षांचे स्वरूप सोप्या पद्धतीने सांगितले. यावेळी ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख श्री बागुल सर आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
आज बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी म.ए.सो.मुलांचे विद्यालयात ज्युनिअर कॉलेज विभागात लाला लजपत राय जयंती साजरी करण्यात आली .ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागुल सर यांनी प्रतिमा पूजन केले.तसेच इयत्ता अकरावी ब मधील अथर्व घडशी या विद्यार्थ्याने लाला लजपत राय यांच्या विषयीची माहिती सांगितली.

म ए सो मुलांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक२६जानेवारी २०२६रोजी ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे एअर व्हाईस मार्शल श्री किरण प्रभाकर पळसुले व्हीएसएम (निवृत्त) माजी विद्यार्थी 1971ची बॅच यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सदर कार्यक्रमास शाला समिती अध्यक्ष मा.श्री दिलीपजी शेठ सर, महामात्र सुधीरजी गाडे सर शाळेचे पदाधिकारी, पालक, आजी माजी विद्यार्थी, शाळा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने सामुदायिक कवायत व विद्यार्थ्यांची विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच साक्षरता प्रतिज्ञा सर्व उपस्थितांनी घेतली.
दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी प्रशालेमध्ये ज्युनिअर कॉलेज तर्फे स्वामी विवेकानंद जयंती तसेच राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागुल सर तसेच सर्व शिक्षक वृंद व इयत्ता अकरावी व बारावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल तसेच आऊसाहेबांची माहिती सांगण्यात आली. माहिती सांगितल्यानंतर त्या माहितीवर आधारित प्रश्न विचारण्यात आले ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर दिले त्या विद्यार्थ्यास छोटी भेटवस्तू देण्यात आली.
दि 9 जानेवारी 2026,शुक्रवार रोजी पुणे पत्रकार भवन येथे Terre Olympiad बक्षिस वितरण सोहळा माननीय श्री प्रकाश जी जावडेकर यांच्या हस्ते आपल्या प्रशालेतील इ 12 वी विज्ञान अ मधील मित पराग व्होरा तसेच इ 12 वी वाणिज्य ब आणि क तुकडीतील गणेश शेळके,साहिल रासकर, समर्थ नाईक या विद्यार्थ्यांना बक्षिस मिळाले असून सदर कार्यक्रम Terre Olympiad परीक्षेच्या प्रमुख सौ सोनाली चौधरी मॅडम,प्रशालेतील निवडक विद्यार्थ्यां सह उपस्थित होत्या.
दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी प्रशालेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर ज्युनिअर कॉलेज प्रमुख श्री बागुल सर सर्व शिक्षक वृंद व इयत्ता 11वी व 12 वीचे विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल माहिती सांगण्यात आली.

वार्षिक स्नेहसंमेलन 2025 निमित्त प्रशालेमध्ये विज्ञान व पर्यावरण पूरक रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ज्युनिअर कॉलेज विभागातील इयत्ता अकरावी सायन्स व कॉमर्स विभागातून एकूण 24 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांना विज्ञान, बेटी बचावो आणि जलसुरक्षा व पर्यावरण हे विषय होते. याचे परीक्षण माध्यमिक विभागाचे चित्रकला शिक्षक श्री. मस्के सर यांनी केले. तसेच माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर, पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम, विभाग प्रमुख श्री बागुल सर व शिक्षक प्रतिनिधी श्री पारवे सर व श्री खुणे सर यांनी रांगोळी परीक्षण करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


म. ए. सो.मुलांचे विद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा
शनिवार दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी प्रशालेच्या मैदानावर घोष पथकाच्या गजरात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री प्रतिक वाईकर (भारतीय खो खो संघाचे कर्णधार) व माननीय श्री धीरज घाटे (माजी विद्यार्थी, अध्यक्ष भाजप पुणे शहर) तसेच शालेय पदाधिकारी व इतर मान्यवरांचे आगमन झाले. पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.माननीय मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे यांनी प्रास्ताविकातून या शैक्षणिक वर्षात प्रशालेने क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत थोडक्यात आढावा घेऊन त्यांचे कौतुक करण्याचा उद्देश व्यक्त केला. तसेच विविध खेळ जसे खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल इत्यादी मध्ये शाळेचे नेतृत्व राज्य पातळीवर नेले असे सांगून राष्ट्रीय हॉकी व रायफल शूटिंग सारख्या खेळांमध्ये राष्ट्रीय पातळीवर सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय खो-खो संघाचे कर्णधार मा. श्री.प्रतीक वाईकर यांनी आपल्या मनोगतातून सहभागी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कोणतीही इतर गुंतवणूक करण्यापेक्षा शरीर संपत्तीत गुंतवणूक करा, मैदानाशी नाते जोडा,खेळाचा आनंद घ्या.असा संदेश दिला.आणि अशा क्रीडा महोत्सवातून विद्यार्थ्यांना खेळाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेचे कौतुक केले.दुसरे प्रमुख अतिथी प्रशालेचे माजी विद्यार्थी मा.श्री.धीरज घाटे यांनी आपल्या मनोगतातून सहभागी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या कौशल्यांचे शिक्षण खेळातूनच मिळते असे सांगितले. प्रशालेत मिळालेले शिक्षण , संस्कार या विषयी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शाला समितीचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ दिलीपजी शेठ सरांनी आपल्या मनोगतातून खेळाचे महत्त्व सांगताना निरोगी जीवनासाठी व्यायाम, नियंत्रित आहार असणे आवश्यक असून त्यात सातत्य हवे. असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय, राज्य, विभागीय, जिल्हा व आंतरवर्गीय स्पर्धेत खो खो कबड्डी व्हॉलिबॉल, रस्सीखेच लंगडी 100 मीटर धावणे इ.खेळ प्रकारात विजयी ,उपविजयी व वैयक्तिक खेळात प्राविण्य मिळवणाऱ्या खेडाळूंना मेडल,ढाल व प्रमाणपत्र देऊन गौरव करून अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक श्री.शैलेश आपटे सर प्रशालेचे महामात्र श्री.सुधीरजी गाडे सर उपमुख्याध्यापिका सौ.मार्गसिद्धा पवार, पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये, क्रीडा शिक्षक प्रतिनिधी श्री भाऊसाहेब खुणे, स्नेहसंमेलन शिक्षक प्रतिनिधी श्री. बागुल देवानंद, श्री पारवे राजेंद्र, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी श्री नाना चौरे ,विद्यार्थी प्रतिनिधी चि.भावेश ढोले ,चि.कुणाल ढेबे व आर्यन मळेकर.पालक प्रतिनिधी उदय पवार, सौ.दुधाळे, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता 5 वी ते 12 वी चे सर्व विद्यार्थी सदर कार्यक्रमास उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माया कुलकर्णी, यांनी केले तर पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादी वाचनाचे काम सौ. अमृता अराणके, सौ.स्वाती हावळे यांनी केले.आभार व क्रीडा अहवाल वाचन क्रीडा शिक्षक प्रतिनिधी श्री खुणे भाऊसाहेब यांनी केले.
बुधवार दिनांक 3 डिसेंबर 2025 सकाळी ८:३० ते १०:३०.
स्थळ : प्र ल गावडे सभागृह
विद्यार्थी : इयत्ता अकरावी व बारावी
अस्मिता फाउंडेशन आयोजित वादविवाद स्पर्धा ज्युनिअर कॉलेज विभाग आज संपन्न झाली. यासाठी परीक्षक म्हणून आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे मराठी विषयाचे प्राध्यापक माननीय डॉ पांडुरंग कंद सर उपस्थित होते .तसेच प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर व विभाग प्रमुख श्री बागुल सर उपस्थित होते. एकूण 27 विद्यार्थ्यांनी या वादविवाद स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता .वादविवाद स्पर्धेचा विषय होता आजच्या युगात महिलांना समान संधी दिली जाते का?
मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून प्रशालेतील ज्युनिअर कॉलेज विभागात साजरा करण्यात आला. महिना प्रमुख सौ सीमा वामन मॅडम यांनी राष्ट्रीय शिक्षण दिनाची माहिती सांगितली.



एक्सलन्सी अकॅडमी आयोजित चौथ्या मोती जॉन स्मृती करंडक हॉकी स्पर्धे मध्ये हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी पुण्याच्या मान्यतेने नेहरूनगर (पिंपरी चिंचवड) येथे मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत एम.ई.एस. मुलांचे(भावे ) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मधील इयत्ता बारावी अ मधील खेळाडू चि. हर्षवर्धन खुणे याने क्रीडाप्रबोधिनी ने फ्रेंड्स युनियन क्लबवर 5 - 2 गोलने मात करून सुवर्ण पदक मिळवले . त्यात महत्त्वाचा वाटा 2 गोल करणाऱ्या हर्षवर्धन खुणे चा होता.

शनिवार दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी अध्यापक प्रबोधिनी अंतर्गत पुष्प पहिले विद्यार्थी समजून घेताना या विषयावर श्री. भगवान पांडेकर सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री .वसावे सर, पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम, प्रमुख पाहुणे श्री. पांडेकर सर यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले यामध्ये श्री .पांडेकर सर यांनी अध्यापन करताना वेगवेगळ्या टूल्सचा वापर करण्याची आवश्यकता स्पष्ट केली, तसेच समायोजन शोधिका ही 140 प्रश्नांची टेस्ट सर्व शिक्षकांची घेतली. यामध्ये कौटुंबिक ,आरोग्य, सामाजिक, भावनिक यावरील प्रश्न होते. सर्व शिक्षक व पदाधिकारी यांनी टेस्टमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर त्याचे मूल्यमापन केले गेले व आपण कोठे कमी आहोत हे शोधा हे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये असलेले गुण किंवा कमतरता आपण या वेगवेगळ्या तंत्रांच्या साह्याने समजून घेऊ शकतो. या अध्यापक प्रबोधिनी साठी सर्व शिक्षक पदाधिकारी, उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .राऊत मॅडम यांनी केले तर आभाराचे काम श्री .गायकवाड सर यांनी केले.
एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीच्या 76 विद्यार्थ्यांनी प्रशालेत झाडे लावली.


दिनांक 01 ऑक्टोबर वार बुधवार रोजी शालेय परिसर स्वच्छता या उपक्रमांतर्गत कॉलेजच्या 11 वी व 12 वी इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रशालेतील अंतर्गत परिसर तसेच प्रशालेबाहेरील हत्ती गणपती चौक या ठिकाणी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मास्क व ग्लोव्हज घालून स्वच्छता केली. इयत्ता 11 वी ब व 12 वी क च्या विद्यार्थ्यांनी हत्ती गणपती चौकात स्वच्छता केली तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांशी बोलून ते करत असलेल्या स्वच्छतेच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
दिनांक 01ऑक्टोबर 2025, वार बुधवार रोजी प्रशालेत लाल बहादूर शास्त्री जयंती , राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच दसरा या सणाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला गेला. सर्वप्रथम ज्येष्ठ शिक्षिका सौ कचरे मॅडम तसेच शिक्षक वृंद आणि प्रातिनिधीक स्वरूपात काही विद्यार्थ्यांनी प्रतिमा पूजन केले तसेच देवी सरस्वतीचेही पूजन केले. इयत्ता 12 वी अ मधील आंद्रे सिद्धराज या विद्यार्थ्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली, तसेच इयत्ता 11 वी ब मधील चव्हाण अक्षय या विद्यार्थ्याने लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त माहिती सांगितली, 11 वी ब च्या क्षिरसागर श्लोक या विद्यार्थ्याने दसरा या सणाबद्दल माहिती सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

दि 25 सप्टेंबर २०२५ गुरुवार रोजी प्रशालेमध्ये अनुलोम या संस्थेतर्फे ज्युनियर कॉलेज विभागातील विद्यार्थांसाठी आपल्या संविधानाची पंच्याहत्तरी यावर आधारित कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमामध्ये PPT व VIDEO द्वारे विद्यार्थांना संविधानावर आधारित माहिती अतिशय प्रभावीपणे श्री सोमनाथ देवकाते यांनी सादर केली.याच कार्यक्रमामध्ये विद्यार्थांकडून संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवून घेण्यात आली.सदर कार्यक्रमासाठी श्री सौरभ शिंगाडे,सौ आशाताई खेडकर,श्री ताम्हनकर यांचे विशेष सहकार्य लाभले.सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री वर्मा सर यांनी केले.

दिनांक 25 सप्टेंबर 2025,गुरुवार रोजी पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेच्या ज्युनिअर कॉलेज विभागातील जेष्ठ शिक्षिका सौ कचरे मॅडम,प्रशालेतील शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांनी पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता बारावी अ मधील अथर्व शिंदे या विद्यार्थ्याने पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांचे जीवन चरित्र मोजक्या शब्दात अतिशय उत्तम प्रकारे सादर केले.

दिनांक 17 सप्टेंबर 2025,बुधवार रोजी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेच्या ज्युनिअर कॉलेज विभागातील जेष्ठ शिक्षिका सौ कचरे मॅडम,प्रशालेतील शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता बारावी क मधील अनिश हतकमकर या विद्यार्थ्याने प्रबोधनकार ठाकरे यांचे जीवन चरित्र मोजक्या शब्दात अतिशय उत्तम प्रकारे सादर केले.

दिनांक 9 सप्टेंबर 2025 मंगळवार रोजी युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी बचत खाते ,तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या बँक सुविधा यावर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानासाठी युनियन बँक ऑफ इंडिया , सदाशिव पेठचे ब्रांच मॅनेजर श्री आकाश घुरडे सर यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेच्या माननीय उपमुख्याध्यापिका सौ पवार मॅडम यांनी श्रीफळ देऊन श्री घुरडे सर यांचे स्वागत केले. तसेच माननीय उपमुख्याध्यापिका सौ पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन बचत व जीवनमूल्य यावर बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात प्रशालेच्या माननीय पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम पूर्णवेळ उपस्थित होत्या.याच कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष बचत खात्याचे अर्ज भरून घेण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ जोशी मॅडम यांनी केले.
दिनांक 5 सप्टेंबर 2025,गुरुवार रोजी म.ए.सो मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, सदाशिव पेठ, पुणे प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्यूनिअर कॉलेज विभागात शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मा. विभाग प्रमुख श्री बागुल सर तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. इ १२ वी अ मधील अथर्व शिंदे याने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली.
ज्यूनिअर कॉलेजमधील इ १२वी व इ ११ वी मधील विद्यार्थी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांची भूमिका वेगवेगळे विषय उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांना शिकवून साजरा केला. विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात मा.मुख्याध्यापक श्री.वसावे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच मा. मुख्याध्यापक श्री.वसावे सर,मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती.पवार मॅडम,मा.पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम यांनी विद्यार्थ्यांना त्यांनी साकारलेल्या भूमिकेबद्दल प्रोत्साहन दिले व कौतुक केले. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सहभागी विद्यार्थी शिक्षकांनी दिलेली सर्व जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडून हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी केला.इ १२ वी अ मधील विद्यार्थी यश कांबळे याने आभार व्यक्त केले.
मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी म.ए.सो. मुलांच्या विद्यालयात मोठ्या आनंदात व उत्साहात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
प्रशालेतील सर्व पदाधिकारी , शिक्षक व सेवक श्रींच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.
श्रींच्या सुंदर विलोभनीय मूर्तीचे विसर्जन प्रशालेतील मा.मुख्याध्यापक श्री. वसावे सर, पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम व सर्व सेवक यांच्या हस्ते करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी प्रशालेत इको फ्रेंडली गणपती, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येने आणि उत्साहाने विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले होते. प्रशालेच्या विसर्जन मिरवणुकीत मा.मुख्याध्यापक श्री वसावे सर, मा.उपमुख्याध्यापिका श्रीम. पवार मॅडम, मा. पर्यवेक्षिका लिमये मॅडम व ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख श्री बागुल सर, शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले. प्रसाद वाटप सौ. टपळे मॅडम आणि सौ.गायकवाड मॅडम यांनी केले.

दिनांक 29/08/2025 वार गुरुवार रोजी 11 वी ब आणि 12 वी ब या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेतील गणपतीची आरती केली. या वेळी ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागुल सर , 11 ब च्या वर्गशिक्षिका सौ जोशी ,12 ब च्या वर्गशिक्षिका सौ कचरे, सौ चौधरी , सौ बोरा, श्री वर्मा, उपस्थित होते. आरतीनंतर सर्व जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आले.

दिनांक 28/08/2025 वार गुरुवार रोजी 11 वी अ आणि 12 वी अ या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेतील गणपतीची आरती केली. या वेळी ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागुल सर , 11 अ च्या वर्गशिक्षिका सौ वामन, 12 अ च्या वर्गशिक्षिका सौ हावळे, सौ कचरे , सौ कुलकर्णी उपस्थित होते. आरतीनंतर विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आले.


</div
दिनांक 22 जुलै 2025 मंगळवार रोजी संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी दिनानिमित्त प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर,ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागुल सर ,शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांनी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले .तसेच विभाग प्रमुख श्री बागुल सर यांनी अतिशय प्रभावीपणे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या कार्याची माहिती सांगितली.

दिनांक 18 जुलै 2025 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागुल सर अन्य शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच इयत्ता बारावी अ च्या वर्गशिक्षिका सौ हावळे मॅडम यांनी अतिशय प्रभावीपणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याविषयी व कार्याविषयी माहिती सांगितली.
इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ
दिनांक 30 जून 2025 सोमवार रोजी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रशालेचे माजी विद्यार्थी मा. श्री मिलिंदजी नागनाथ लिमये .शाला समितीचे अध्यक्ष मा. श्री दिलीपजी शेठ सर ,प्रशालेचे मा.मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे , उपमुख्याध्यापिका श्रीमती मार्गसिद्धा पवार, पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
प्रास्ताविकात मा.श्री सायसिंग वसावे सरांनी प्रशालेचा निकाल जाहीर केला. इयत्ता दहावीचा निकाल 100% इयत्ता बारावी सायन्स चा निकाल 100% व इयत्ता बारावी वाणिज्य शाखेचा निकाल 96% लागला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करा. खूप कष्ट करा. आई वडील ,शाळा व शिक्षकांनी केलेले संस्कार विसरू नका. समाजासाठी ,देशासाठी एक आदर्श नागरिक बना. असे ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे माननीय श्री मिलिंद जी लिमये सरांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना दलाई लामांच्या गोष्टीतून कठीण परिस्थितीतून दृढनिश्चय करणे त्याचप्रमाणे पूर्व नियोजित ध्येय ठरवा त्या त्या दृष्टीने प्रयत्न करा. जिज्ञासा, संकल्प ,दूरदृष्टी जोपासा त्यामुळे आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले व विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या
मा.श्री दिलीपजी शेठ सरांनी ज्याप्रमाणे शिल्पकार ओबडधोबड दगडातून मूर्ती साकारतो .त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात. विद्यार्थ्यांनी जिद्द उत्तम ध्येय ,संकल्प ,प्रयत्न केल्याने पुढील आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ चौधरी सोनाली, पाहुण्यांचा परिचय श्रीमती सुवर्णा काळे ,गुणवंत विद्यार्थ्यांचे यादी वाचन सौ सातपुते व सौ बोरा ,आभार श्री पारवे सर यांनी मानले.
२१ जून २०२५ - प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियान , निसर्गवारी 2025 या कार्यक्रमांतर्गत ज्युनिअर कॉलेजच्या इ 12 वीच्या विद्यार्थ्यांना बालगंधर्व रंगमंदिर येथे नेण्यात आले. तिथे विठू माऊली हा सुश्राव्य भक्ती गीतांचा कार्यक्रमाचा आनंद घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री वसावे सर, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागुल सर आणि सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन
दिनांक 21 जून 2025 शनिवार रोजी म . ए .सो. मुलांच्या विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी ज्युनिअर कॉलेज प्रमुख श्री बागुल सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सौ चौधरी मॅडम व सौ. बोरा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांनी मिळून सामूहिक योग व प्राणायाम केले. योग दिनाची माहिती सौ वामन मॅडम यांनी दिली व आभार सौ. कुलकर्णी मॅडम यांनी मानले.
आज दिनांक 18 जून 2025 बुधवार रोजी झाशी ची राणी लक्ष्मीबाई यांचा स्मृतीदिन .
त्या निमित्त प्रशाले मध्ये ज्युनिअर कॉलेज प्रमुख श्री बागुल सर आणि सर्व शिक्षकवर्ग , विद्यार्थी यांनी झाशी ची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी 12 वी चे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सौ. कुलकर्णी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना झाशी ची राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी माहिती सांगितली.
आज दिनांक 17 जून 2025 मंगळवार राजमाता जिजाऊ यांचा स्मृतीदिन .
त्या निमित्त प्रशालेमध्ये ज्युनिअर कॉलेज प्रमुख श्री बागुल सर आणि सर्व शिक्षकवर्ग , विद्यार्थी यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी 12 वी चे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सौ. कुलकर्णी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊबाई यांच्याविषयी माहिती सांगितली.

म. ए. सो. मुलांचे विद्यालयात संकल्पदिन उत्साहात साजरा.
दिनांक 14जून 2025शनिवार रोजी प्रशालेच्या डॉ प्र.ल गावडे सभागृहात शाला समिती अध्यक्ष श्री. दिलीप शेठ यांच्या सन्मान्य उपस्थितीत संकल्प दिन साजरा करण्यात आला. प्रशालेच्या पर्यवेक्षिका रसिका लिमये यांनी प्रास्ताविकातून गुणवत्त्ता विकसनासाठी प्रेरक विचार करण्या संदर्भात असलेला हा संकल्प दिन साजरा करण्याचा हेतू स्पष्ट केला. प्रशालेच्या प्राध्यापिका सौ. कल्याणी जोशी यांचे सह सर्वांनी सामुदायिक रित्या विद्यार्थी विकासाचा संकल्प केला. माननीय मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे यांनी आपल्या मनोगतातून सर्वांनी जबाबदारी व कर्तव्याचे अचूक भान राखून मनापासून कार्यरत राहण्याचा संदेश दिला. सर्वांनी नाविन्यपूर्ण अध्यापनासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत तसेच प्रशासकीय कामास सहकार्य होईल असे वर्तन असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. शाळा समिती अध्यक्ष श्री दिलीप शेठ यांनी आपल्या मनोगतातून वक्तशीरपणा, निश्चित नियोजन, सुदृढपणा यांचे महत्त्व सांगितले व त्यासाठीचे सोपे उपायही सांगितले. प्रसन्नता व शांततेसाठी ओंकाराचे प्रात्यक्षिक घेतले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक श्री चंदू गवळे, जुनिअर कॉलेज प्राध्यापक श्री बागुल यांसह पाचवी ते बारावीचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका अमृता अराणके यांनी तर आभार प्रदर्शन सविता गायकवाड यांनी केले.

























































































































































































































































