‘स स... संविधानाचा’ नाटक सादरीकरण'
स्किन डोनेशन आणि ॲसिड अटॅक विषयावर व्याख्यान
प्रभावी संवाद कौशल्य या विषयावर कार्यशाळा
दिनांक 19 सप्टेंबर 26 शनिवार रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळात इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रभावी संवाद कौशल्य या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत प्रभावी संवादाचे महत्त्वाचे पाच घटक हे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आणि छोट्या नाटुकल्यातून दाखवण्यात आले यात मुलांचा खूप चांगला सहभाग होता अंदाजे 70 मुले होती कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक माननीय वसावे सर तसेच उपमुख्यध्यापिका माननीय पवार मॅडम व पर्यवेक्षिका माननीय लिमये मॅडम उपस्थित होत्या तसेच इतर वर्ग शिक्षक पण या कार्यशाळेस उपस्थित होते शाळेचे आणि सर्व शिक्षकांचे तसेच फिल्ड वर्क साठी असलेल्या विद्यार्थ्यांचेही उत्तम सहकार्य आजच्या कार्यशाळेस मिळाले
गणेश विसर्जन सोहळा
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आग प्रतिबंधन व्याख्यान
दिनांक 19सप्टेंबर 2026 शनिवार रोजी प्रशालेत प्रमुख पाहुण्या कुमुदिनी ट्रस्टच्या ट्रस्टच्या प्रेसिडेंट रोहिणी आठवले, उपमुख्याध्यापिका मार्गसिद्ध्दा पवार, पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये यांच्या सन्माननीय उपस्थितीत 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आग प्रतिबंधन संदर्भात जागृती करणारे व्याख्यान झाले रोहिणी ताई आठवले यांनी . भाजणे म्हणजे काय पासून त्यावर प्राथमिक उपचार काय असतात. कसे करावे याबाबत बोधपर माहिती स्लाईड्स द्वारा दिली. स्वयंपाक घरातील धोके, फटाके उडवणं, उडवताना घेण्याची काळजी गरम द्रव पदार्थ, विद्युत अपघात, याबाबत सचित्र माहिती दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत रोजच्या जीवनातील अनेक घटनांचा संदर्भ देऊन रोहिणी ताईंनी विद्यार्थ्यांना आपण काळजी कशी घेतली पाहिजे हे समजावून सांगितले त्यात मोबाईल चा वापर करताना दुर्घटना कशा घडतात? आपण फोन वापरताना ठेवण्याच्या जागेपासून चार्जिंग पर्यंत काळजी कशी घेतली पाहिजे हे सांगताना निष्काळजीपणे केलेल्या गोष्टीमुळे होणाऱ्या दुर्घटना कशा टाळता येतील हे सांगितले दक्षतेचे उपाय म्हणून आपण सावध राहण्यासाठी काय करावे काय करू नये. याबद्दल माहिती रंजकपणे दिली.आग प्रतिबंधनासाठी असणारी छोटी प्रतिज्ञा दिली. सर्वांना आग प्रतिबंधक उपाय असणारे डॉक्टर निखिल पानसे यांचे एक छोटे पुस्तक मोफत देण्यात आले. पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये यांनी प्रशालेतर्फे आभार प्रदर्शन केले.
गणेशोत्सवानिमित्त श्री गणेश प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन
म. ए. सो.मुलांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुणे ,येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला
दीप पूजन
पावनखिंड दौड व प्रेरणादायी व्याख्यानाचे प्रशालेमध्ये आयोजन
कारगिल विजय दिवस
गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा
इयत्ता 10 वी, 12वी गुणगौरव समारंभ उत्साहात साजरा
22 जुलै 2026 बुधवार रोजी मननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण संवाद या कार्यशाळेचे मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते.यासाठी राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेचे एअर विंग कमांडंट यज्ञरमन सर आणि म. ए. सो. मुलांचे विद्यालय मधील सेकंड ऑफिसर मंजुश्री शिंदे उपस्थित होते. या कार्यशाळेत एकूण 6 सत्रे होती त्यापैकी शालेय स्तरावर सैनिकी शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी या विषयावर एअर विंग कमांडंट यज्ञरमन यांनी व्याख्यान दिले आणि त्यात NCC चे महत्व आणि सैनिकी शिक्षण याचे महत्व सर्वांना समजून दिले.आणि शालेय स्तरावर राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी या विषयाच्या सत्रासाठी सेकंड ऑफिसर मंजुश्री शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.या कार्यशाळेसाठी माननीय शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे साहेब, शिक्षण आयुक्त माननीय सचिंद्र सिंह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
दिनांक 20 जुलै 2026 सोमवार रोजी संत सप्ताह निमित्त प्रशालेमध्ये विविध संतांचे पूजन व जीवन कार्याची माहिती या उपक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रशालेच्या माननीय पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम यांनी संत सप्ताह निमित्त संतांचे कार्य तसेच त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान यावर अतिशय अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन करणारे प्रास्ताविक केले. त्यानंतर इयत्ता सातवी ब मधील विद्यार्थी विराज जाधव याने संत मुक्ताबाई यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली त्याचबरोबर इयत्ता नववी ब मधील विद्यार्थी सवाई लिंबोरे याने देखील संत ज्ञानेश्वर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली. या उपक्रमांतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या विद्यार्थ्यांचे कौतुक प्रशालेच्या माननीय उपमुख्याध्यापिका सौ पवार मॅडम,माननीय प्रवेशिका सौ लिमये मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पेन भेट देऊन मनःपूर्वक कौतुक केले.



दि.8जुलै2026 रोजी म.ए.सो. मुलांचे विद्यालय येथील गुरुवर्य प्र.ल.गावडे सभागृहात श्री.मन्नृप शिवछत्रपती पालखी सोहळ्यानिमित्त श्री.संदिप महेंद्र यांचे आख्यान झाले.
संत श्री. तुकोबा महाराज यांच्या 330व्या पालखी वर्षाचे औचित्य साधून ज्येष्ठ वद्य अष्टमी बुधवार दिनांक 8/7/ 2026 रोजी दुपारी 3.30वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेतील शिक्षक श्री. मस्के सर यांनी केले. यामध्ये पोवाडे शिवस्तुती गीते राष्ट्रभक्तीपर गीते व यांचे सादरीकरण झाले. शेवटी विठ्ठलनामाचा गजर करत रिंगण घेतले.
या सोहळ्यासाठी इयत्ता 5वी ते 7वी तील सर्व विद्यार्थी सहभागी होते. या कार्यक्रमाचे नियोजन पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील कलाशिक्षक श्री. मस्के सर यांनी केले होते.
ई कचरा व प्लास्टिक कचरा संकलन अभियान
दिनांक 4 जुलै 2026 रोजी पुणे महानगरपालिका,के पी आय टी, व पूर्णम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने म ए सो मुलांचे विद्यालय ( भावे हायस्कूल ) पुणे येथे ई कचरा व प्लास्टिक कचरा संकलन याविषयीची जागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशालेतील 491 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.
घराघरातून तयार होणारा प्लॅस्टिकचा कचरा व ई वेस्ट याचे संकलन करून प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला प्रशालेमध्ये संकलित करून पूर्णम फाउंडेशन ला देण्यात येणार आहे.
अध्यापक प्रबोधिनी पुष्प 1
विषय : "शिक्षक-शिक्षक सहसंबंध"
दिनांक: 1 जुलै 2026
वार: बुधवार
अध्यापक प्रबोधिनी तर्फे "शिक्षक-शिक्षक सहसंबंध" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या व्याख्यानासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. हेमा अष्टपुत्रे मॅडम होत्या.
प्रशालेचे मा.मुख्याध्यापक श्री. वसावे सर, मा.उपमुख्याध्यापिका सौ. पवार मॅडम, मा.पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम.
रेणुका स्वरूप प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका सौ.कांबळे मॅडम, मा.पर्यवेक्षक श्री. अनासपुरे सर, रेणुका प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद
भावे प्राथमिक प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद
भावे हायस्कूलचे सर्व शिक्षकवृंद कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भावे हायस्कूलचे मा.मुख्याध्यापक श्री. वसावे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्याख्यानाच्या विषयाची ओळख व महत्त्व सांगितले.
त्यानंतर हेमा अष्टपुत्रे मॅडम यांनी शिक्षक-शिक्षक सहसंबंधाचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट केले. त्यांनी शिक्षकांमध्ये परस्पर विश्वास, सहकार्य, सुसंवाद, समन्वय आणि सकारात्मक कार्यसंस्कृती यांचे महत्त्व विविध उदाहरणांसह सांगितले. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षकांनी एकमेकांशी स्नेहपूर्ण व सहकार्याची भावना ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनीअधोरेखित केले.
पाहुण्याचा परिचय सौ.जोशी मॅडम यांनी केला आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिंदे मॅडम यांनी केले.शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
एन.सी.सी. तर्फे व्यसनमुक्ती दिन साजरा
दि. २६ जून २०२६ रोजी आपल्या शाळेच्या एन.सी.सी. विभागातर्फे व्यसनमुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम व व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. एन.सी.सी. कॅडेट्सनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली व समाजात जनजागृती करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनाबद्दल जागरूकता निर्माण झाली. यामध्ये 25 कॅडेट्स नी सहभाग घेतला तसेच पालकांचा देखील सहभाग घेण्यात आला.

नूतनीकृत गुरुवर्य डॉ. प्र. ल. गावडे सभागृहाचे
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा



































































































































