दिनांक 24 सप्टेंबर 26 रोजी सकाळी दहा ते साडेअकरा या वेळात इयत्ता बारावीच्या अ ब क या तिन्हीही वर्गांसाठी( कॉमर्स) बारावीच्या परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास कसा करायचा स्मरणात कसे ठेवायचे अभ्यासात चित्त एकाग्र करण्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या तसेच अभ्यासाकडे आणि परीक्षेकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मोबाईलचा कमीत कमी वापर कसा करायचा या मुद्द्यांना धरून बारावीच्या वर्गासाठी बारावीच्या परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर शाळेचे समुपदेशक कौस्तुभ जोगळेकर यांनी मुलांशी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेऊन संवाद साधला मुलांचा प्रतिसाद खूपच चांगला होता कार्यशाळेनंतर नंतर काही मुलांनी वैयक्तिक थांबून त्यांच्या प्रश्नांसाठी मार्गदर्शन घेतले या कार्यक्रमाला ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका सौ कुलकर्णी मॅडम व सौ जोशी मॅडम यांचे चांगले सहकार्य मिळाले तसेच विद्यार्थी समाज कार्यकर्ते ओंकार आणि आशुतोष यांचाही कार्यक्रमात खूप चांगला उपयोग झाला असे सत्र आठवड्यातून एकदा व्हायला हवे अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने दिली.

शालेय जिल्हास्तर बुद्धिबळ स्पर्धा २०२६-२०२७' मध्ये एम इ एस बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सदाशिव पेठ, पुणे येथील विद्यार्थी श्लोक क्षीरसागर याने उत्कृष्ट कामगिरी करत 'टॉप टेन' (Top 10) रँक मध्ये प्रवेश केला आहे.आता तो 'फायनल रँक' (अंतिम विजेतेपदासाठी) खेळणार आहे. श्लोकला पुढील अंतिम सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर 26 रोजी इयत्ता अकरावी कॉमर्सच्या अ आणि ब या दोन तुकड्यांवर मिळून व्यक्तिमत्व विकास केंद्र कडून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी जबाबदार असणारे घटक व अभ्यासात अडथळे निर्माण करणारे घटक या विषयावर सकाळी दहा ते साडे अकरा या वेळात कार्यशाळा घेण्यात आली याला एकूण 74 मुले उपस्थित होती विद्यार्थ्यांना या वयात ध्येयापासून किंवा अभ्यासापासून विचलित करणारे घटक कोणते यावर नियंत्रण कसे मिळवायचे याबाबत शाळेचे समुपदेशक कौस्तुभ जोगळेकर यांनी खूप उत्तम मार्गदर्शन केले यासाठी मुलांचा सहभाग खूपच छान होता. मुलांनी सत्र व्यवस्थित ऐकून घेतले सत्र संपल्यानंतर चार-पाच मुलांनी येऊन त्यांना पडणारे प्रश्न यावर वैयक्तिक मार्गदर्शन घेतले या कार्यक्रमाला जुनियर कॉलेजच्या सौ कुलकर्णी मॅडम व सौ जोशी मॅडम यांचे सहकार्य लाभले.
गणेश विसर्जन सोहळा
गणेशोत्सव निमित्त आरती स्पर्धा
गणेशोत्सवानिमित्त श्री गणेश प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन
म. ए. सो.मुलांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुणे ,येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला
दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यानी पर्यावरण पूरक "सृष्टी बंध राखी" उपक्रमात अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.
इयत्ता 10 वी, 12वी गुणगौरव समारंभ उत्साहात साजरा

अध्यापक प्रबोधिनी पुष्प 1
विषय : "शिक्षक-शिक्षक सहसंबंध"
दिनांक: 1 जुलै 2026
वार: बुधवार
अध्यापक प्रबोधिनी तर्फे "शिक्षक-शिक्षक सहसंबंध" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या व्याख्यानासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. हेमा अष्टपुत्रे मॅडम होत्या.
प्रशालेचे मा.मुख्याध्यापक श्री. वसावे सर, मा.उपमुख्याध्यापिका सौ. पवार मॅडम, मा.पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम.
रेणुका स्वरूप प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका सौ.कांबळे मॅडम, मा.पर्यवेक्षक श्री. अनासपुरे सर, रेणुका प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद
भावे प्राथमिक प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद
भावे हायस्कूलचे सर्व शिक्षकवृंद कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भावे हायस्कूलचे मा.मुख्याध्यापक श्री. वसावे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्याख्यानाच्या विषयाची ओळख व महत्त्व सांगितले.
त्यानंतर हेमा अष्टपुत्रे मॅडम यांनी शिक्षक-शिक्षक सहसंबंधाचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट केले. त्यांनी शिक्षकांमध्ये परस्पर विश्वास, सहकार्य, सुसंवाद, समन्वय आणि सकारात्मक कार्यसंस्कृती यांचे महत्त्व विविध उदाहरणांसह सांगितले. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षकांनी एकमेकांशी स्नेहपूर्ण व सहकार्याची भावना ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनीअधोरेखित केले.
पाहुण्याचा परिचय सौ.जोशी मॅडम यांनी केला आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिंदे मॅडम यांनी केले.शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
ऑलिंपिक स्थापना दिनानिमित्त पुणे येथे पुणे शहरातील सर्व शाळां, विविध क्रीडा संघटना सर्व खेळाडूंची क्रीडा ज्योत घेऊन रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये आपली प्रशाला मुलांचे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सदाशिव पेठ पुणे 30 यामध्ये सहभागी झाली होती. या रॅलीमध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री सायसिंग वसावे सर क्रीडाशिक्षक भाऊसाहेब खुणे सर, चौधरी मॅडम, बोरा मॅडम व पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते. ही रॅली शनिवार वाड्यापासून लक्ष्मी रस्त्याने एस पी कॉलेजच्या मैदानावरती ज्योतीची स्वागत प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी क्रीडाज्योती वरती आपल्या प्रदेशातील विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव केला. क्रीडा ज्योत पुढे प्रथम नागरिक महापौर यांच्याकडे सपृत करण्यात आली . यावेळी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिंपिक खेळाडू शालेय खेळाडू श्री छत्रपती अवॉर्ड पद्मश्री अर्जुन अवार्ड, खेलरत्न अवॉर्ड इत्यादी खेळाडू उपस्थित होते . जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे महानगरपालिका क्रीडा कार्यालय पुणे, महानगर आयुक्त, पुण्याचे प्रथम नागरिक महापौर, उपमहापौर, नगरसेवक व नागरिक जवळ जवळ पाच हजार हजर होते. वंदे मातरम ने कार्यक्रमाचा समारोप झाला ![]()
![]()
![]()
![]()
खेळाचा प्रसार आणि प्रचार होवा हेच उद्दिष्ट.


















































