आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी मा श्री धिरज घाटे साहेब यांची भाजप पुणे शहर अध्यक्ष पदी निवड. झाल्याबद्दल शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

शुक्रवार दिनांक 9 मे 2025 रोजी प्रशालेच्या शाळा समितीचे अध्यक्ष माननीय डॉ दिलीप शेठ सर यांच्या हस्ते फेब्रुवारी - मार्च 2025 मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पेढा देऊन अभिनंदन करण्यात आले
12 वी शास्त्र -
1) दळवी प्रथमेश भरत
2) शिंदे आर्यन अरूण
3) टाकळकर निरंजन नंदू
12 वी कॉमर्स (इंग्रजी माध्यम )
1)पवार वैभव नितीन
2)शेख अयान रियाझ
3)वेल्हाळ सुनील मनोज
12 वी कॉमर्स (मराठी माध्यम)
1)जाधव शिवराज ज्योतीराम
2)कुचेकर प्रज्वल परेश
3)जांभुळकर श्रेयस प्रकाश
तसेच करंदीकर पूर्वश मिलिंद या विद्यार्थ्याला अकाउंट विषयात 100 पैकी 99 गुण मिळाले, त्याचेही अभिनंदन करण्यात आले.
श्री शेठ सरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना पुढील वाटचालीसाठी संस्थेच्या व प्रशालेच्या वतीने शुभेच्छा दिल्यात. तसेच विद्यार्थी आणि पालक यांच्याशी मुक्तपणे संवाद साधला. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. तसेच आपण पुढे काय करतो, काय साध्य केले याबद्दल प्रशालेला कळविण्याविषयी सांगितले. सदर कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय वसावे सर, पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम , ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागुल सर, अध्यापिका सौ कचरे,सौ कुलकर्णी व सौ वामन मॅडम आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

दिनांक 1 मे 2025 रोजी म. ए. सो. मुलांच्या विद्यालयात इयत्ता 5 ते 9 वी तसेच इयत्ता 11 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याना प्रशालेचे शाला समितीचे अध्यक्ष श्री. दिलीपजी शेठ सर तसेच प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सरांच्या हस्ते निकाल पत्र देण्यात आले तसेच त्या विद्यार्थ्यांचे पेढे देऊन कौतुक करण्यात आले.
बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025, म. ए. सो मुलांचे विद्यालयात संत तुकडोजी महाराज जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केली गेली. प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. वसावे सर, पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री. गायकवाड सर, महिना प्रमुख श्री. कदम सर, श्रीमती. काळे मॅडम, सौ. हावळे मॅडम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन केले.

दिनांक 29/04/2025 मंगळवार रोजी सार्थक फाऊंडेशन च्या सर्वेसर्वा श्रीमती स्वाती नामजोशी यांच्या हस्ते Stem Lab चे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला शाळा समिती अध्यक्ष श्री शेठ सर, शाळेचे महामात्र श्री गाडे सर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वसावे सर, उपमुख्याध्यापक श्री गवळे सर,पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम, सार्थक foundation चे श्री पुरंदरे सर, श्री बागाईतकर सर, सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.गावडे सभागृहामध्ये कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. मुख्याध्यापक श्री वसावे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सौ कुलकर्णी मॅडम यांनी श्रीमती स्वाती नामजोशी आणि त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला. त्यानंतर श्रीमती नामजोशी मॅडम यांनी सार्थक फाऊंडेशन चे कार्य आणि उद्देश याविषयी माहिती दिली तसेच स्टेम लॅब चा वापर विद्यार्थ्यांसाठी प्रभावीपणे कसा करावा याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शाळा समिती अध्यक्ष श्री शेठ सर यांनी ही शिक्षकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती काळे मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सौ वामन मॅडम यांनी केले.
म. ए. सो मुलांचे विद्यालयांमध्ये सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली गेली. सर्वप्रथम प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री.वसावे सर, ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख श्री.बागुल सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. चौकटे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री.गायकवाड सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. महिना प्रमुख श्रीमती. काळे मॅडम यांनी प्रास्ताविकातून थोडक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य सांगितले. त्यानंतर प्रमुख वक्ते म्हणून प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. गायकवाड सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन पट व त्यांच्या कार्याचा आढावा थोडक्यात सांगितला. प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. वसावे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाचे काम श्रीमती. सुवर्णा काळे यांनी केले.
शनिवार दिनांक 12/04/2025 रोजी प्रशालेमध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेचा माजी विद्यार्थी व आजच्या पूजेचे गुरुजी केशव कुलकर्णी यांनी विधिवत श्री. दहिभाते यांच्या हस्ते हनुमानाच्या मूर्तीवर अभिषेक व पूजा करून हनुमान जन्म साजरा केला .सर्वांनी मारुतीस्तोत्र म्हणून हनुमानाचे स्मरण केले.तसेच माननीय मुख्याध्यापक श्री. वसावे सर, उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर,पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये मॅडम, श्री. बागुल सर,महिना प्रमुख यांच्या हस्ते हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
म.ए.सो मुलांचे विद्यालय मध्ये रामनवमीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री.वसावे सर, पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये मॅडम, श्री. बागुल सर, महिना प्रमुख श्री.कदम सर, श्रीमती.काळे मॅडम , सौ. हावळे मॅडम, प्रातिनिधीक स्वरूपात प्रशालेचे विद्यार्थी यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर श्रीमती. सुवर्णा काळे यांनी विद्यार्थ्यांना रामनवमीच्या उत्सवाची माहिती सांगितली. त्यानंतर सामूहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रम झाला.
गुरुवार दिनांक 3 एप्रिल 2025 श्री. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. वसावे सर,उपमुख्याध्यापक श्री.गवळे सर, पर्यवेक्षिका सौ.रसिका लिमये मॅडम, महिना प्रमुख श्री. कदम सर व श्रीमती.काळे मॅडम व प्रातिनिधिक स्वरूपात इयत्ता नववी क चे विद्यार्थी यांनी प्रतिमा पूजन केले. श्री. कदम सर यांनी वर्गवाणीवर श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.




आज १५ मार्च २०२५ रोजी प्रशालेत राज्यगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली .

सोम.दि.3मार्च 2025रोजी रोटरी क्लब डेक्कन जिमखाना व टेक महिंद्रा फाऊंडेशन यांच्या कडून प्रशालेस एकूण 5 लॅपटॉप व 5 UPS भेट देण्यात आले. तरी प्रशाले च्या वतीने रोटरी क्लब व टेक महिंद्रा फाऊंडेशन च्या सर्व पदाधिकारी , माजी विद्यार्थी यांचे मनापासून आभार.
प्रशालेचा 14 वर्षीय मुलांचा खो खो संघ

दिनांक शनिवार 22/2/2025 रोजी संत गाडगेबाबा जयंती व रामदास नवमी या कार्यक्रमाचे नियोजन मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर, मा. उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर मा. पर्यवेक्षिका लिमये मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार महिना प्रमुख सौ ज्योती कांबळे, श्रीमती खाडे व सौ. वामन मॅडम केले होते.
प्रथम मा. मुख्याध्यापक श्री वसावे सर, क्रीडा भारतीचे प्रमुख मा. श्री. शैलेश आपटे सर , त्यांचे सहकारी, शिक्षक वृंद यांनी व विद्यार्थ्यांनी प्रतिमा पूजन केले.
ओम जोशी व सोहम साळवी या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे संत गाडगे महाराज व रामदास नवमी यांची माहिती सांगितली.
आज आनंददायी शनिवार या उपक्रमा अंतर्गत इयत्ता पाचवी- ब या वर्गाचा परिपाठ आयोजित करण्यात आला होता. वर्ग शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना, सुविचार, दिनविशेष, मनाचे श्लोक व कथा सांगितली. अतिशय उत्तम असा परिपाठ या विद्यार्थ्यांनी सादर केला.
वरील सर्व कार्यक्रमास प्रशालेतील प्रमुख पाहुणे शालेय पदाधिकारी सर्व शिक्षक वृंद व इयत्ता पाचवी ते नववी चे विद्यार्थी उपस्थित होते.
शनिवार22/2/024 रोजी मएसो मुलांचे भावे हायस्कूल . पुणे येथे क्रीडा ज्ञान परीक्षेचा बक्षीस समारंभ करण्यात आला. यावेळेस मुख्याध्यापक श्री वसावे सर -
पुणे महानगर क्रीडा भारती प्रमुख
श्री आपटे सर -
पुणे महानगर मंत्री श्री रजपूत सर - कु . अंजली दाभाडे क्रीडाशिक्षक
श्री खुणे सर तसेच प्रशालेतील विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
1) प्रथम = श्रवण पाटनकर
2) द्वितीय = रुद्र ठाकर
3) तृतिय = मानस मोरे
"अभिनंदन "
NMMS परीक्षा इयत्ता आठवी.
NMMS या राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल इयत्ता आठवीतील विध्यार्थ्यांच्या परीक्षेत आपल्या प्रशालेतील सहा विध्यार्थी बसले होते. त्यातील
देवकुळे ओंकार संतोष( 8 वी D)
देशमुख श्रेयस संदीप ( 8 वी A)
हे दोन विध्यार्थी पास झाले आहेत. प्रशालेतर्फे या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
त्यांना मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर, श्री. पारवे सर, सौ. बधे मॅडम,सौ. शिंदे मंजुश्री, सौ. चिप्पा यांनी मार्गदर्शन केले. या परीक्षेचे काम श्री. हिंगसे आणि श्री. दौण्डकर यांनी पाहिले आहे.
शनिवार,दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी इयत्ता आठवीची आंतरवर्गीय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये दोन गट करण्यात आले होते. डॉ. अब्दुल कलाम संघ आणि डॉ. होमी भाभा संघ.
प्रत्येक गटात इयत्ता आठवीतील आठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यातील डॉक्टर होमी भाभा संघ यांचा 16 विरुद्ध 8 गुणांनी विजयी झाला. माननीय मुख्याध्यापक श्री. वसावे सर यांनी विजेत्या संघाचे कौतुक केले. श्री. हिंगसे आणि श्रीमती. काळे सुवर्णा यांनी या स्पर्धेचे आयोजन केले. प्रशालेतर्फे विजेत्या संघाला विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
आपल्या दहावीच्या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वसावे सर व सर्व शिक्षण परीक्षा केंद्रावरती उपस्थित होते.

ज्ञान प्रबोधनी,
शैक्षणिक उपक्रम संशोधिका
(समस्या परिहार स्पर्धा)
इयत्ता आठवी
पुणे शहर,
या स्पर्धेत आपल्या प्रशालेतील इयत्ता आठवीतील
कु. देशमुख श्रेयस संदीप
कु.जोशी जय घनश्याम
कु. निंबरे अश्विन बाबू
कु. लोळे अवधूत एकनाथ
या चार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळवारी ही स्पर्धा घेण्यात आली. "साऊंड ग्रुप कलासरूम"
हा प्रकल्प त्यांनी या स्पर्धेत तयार केला. सहभागी विध्यार्थ्यांचे प्रशालेतर्फे अभिनंदन. मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर यांनी त्यांचे कौतुक केले.
म. ए. सो. मुलांचे माध्य व उच्चं माध्य विद्यालय पुणे येथे शिवजयंती
19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त प्रशालेत मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर, मा. उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर, मा. पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम यांच्या प्रेरणेने महिना प्रमुख सौ. ज्योती कांबळे मॅडम ,श्रीमती खाडे मॅडम व उच्च माध्यमिक विभागाच्या वामन मॅडम यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.
विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित पावनखिंड व शिवप्रताप गरुड झेप हे मराठी चित्रपट दाखवण्यात आले.
श्री. पारे सर व विद्यार्थ्यांनी दिलेल्या
हर हर महादेव व जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा सर्व परिसरात दुमदुमल्या.
प्रशालेत शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ प्रशालेचे मा.मुख्याध्यापक श्री. वसावे सर , मा. उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री. बागुल सर व प्रशालेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन केले. प्रशालेतील ग्रंथालयातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून पूजन करण्यात आले. श्रीमती खाडे मॅडम व उच्च माध्यमिक विभागांमध्ये सौ. वामन मॅडम यांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगितली व विद्यार्थ्यांनी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या.
प्रशालेत शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ लाठीकाठीचे खेळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सात मावळे संवर्धन संस्था या संस्थेतील सात मावळ्यांनी आज विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष लाठीकाठीच्या विविध खेळाचे प्रकार सादर केले.
मस्के सर व सर्व विद्यार्थ्यांनी लाठीकाठीचे विविध खेळ पाहून जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन मुलांमध्ये एक प्रकारे उत्साहवर्धक असे वातावरण निर्माण झाले होते. घोषणांनी सर्व मैदान शिवमय झाले होते.
प्रशालेत शिवजयंती निमित्त घेतलेले या सर्व उपक्रमास प्रशालेतील मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर मा. उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर मा. पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री. बागुल सर व सर्व शिक्षक वृंद आणि इयत्ता पाचवी ते नववी व अकरावी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
अशाप्रकारे प्रशालेत शिवजयंती हा कार्यक्रम शालेय पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे अतिशय उत्साहात संपन्न झाला.
आज प्रशालेत 17 फेब्रुवारी 2025 रोजी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके थोर क्रांतिकारक व आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे व प्रशालेचे संस्थापक यांच्या स्मरणार्थ मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर यांनी प्रतिमा पूजन केले. श्रीमती खाडे मॅडम व विद्यार्थ्यांनी प्रतिमेचे पूजन केले.श्रीमती खाडे मॅडम यांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याचे माहिती सांगितली.
अशा या थोर महात्म्यास शतशः प्रणाम.
रविवार ,दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी रोटरी क्लब पुणे नॉर्थ यांच्यातर्फे स्पेल बी कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ डिस्टन्स लर्निंग मॉडेल कॉलनी या ठिकाणी घेण्यात आली. या स्पर्धेत आपल्या शाळेतील सहावी ते आठवीतील पाच विद्यार्थ्यांच्या गटाने सहभाग घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
जोशी ओम अमित 7 अ
केंडे मनीष सोमनाथ 7 अ
जाधव राजवर्धन योगेश 7 ब
देवरे यशराज सागर 7 ब
कंक मेघराज सुनिल 6 ब
वरील विद्यार्थ्यांना सौ.सविता गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
*स्व-बोध व मातृ -पितृ पूजन कार्यक्रम*
आप ल्या प्रशालेत स्व-बोध या उपक्रमांतर्गत मातृ-पितृ पूजन या कार्यक्रमाचे आयोजन करनेत आले होते. या कार्यक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थी आई वडिलांचे पूजन करण्यासाठी पूजेचे साहित्य घेऊन तयारीत आले होते. अशा या सुंदर सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन दुपारी4.00 ते 5.30 या वेळेत करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर यांनी केले. त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.
श्रीमती खाडे मॅडम यांनी मातृ-पितृ पूजन या कार्यक्रमाचे महत्त्व सांगून आपल्या जीवनातील आई वडिलांचे पूजनीय स्थान व भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले. प्रत्यक्ष मातृ-पितृ पूजन करण्याचा विधी व मंत्र या संदर्भात माहिती अमृता अराणके मॅडम यांनी सांगितली . सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे पूजन केले व आई वडिलांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला. अथर्व गंदुरकर-8अ व स्वराज पठारे -7अ या विद्यार्थ्यांनी आई वडील यांना पूजनीय अशा स्वरचित कविता सादर केल्या. पाचवी ब वर्गातील विद्यार्थ्यांनी माता पितांना वंदनीय असे एक नृत्य सादर केले. या कार्यक्रमास श्रीमती खाडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले होते.अशा या भावनिक प्रसंगातून पालक विद्यार्थी यांच्यातील आदर व सन्मानाचे नाते वाढीस लागले.
आजच्या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी ऑफिसर सौ. मंजुश्री शिंदे यांनी केले.
*स्व-बोध व मातृ -पितृ पूजन कार्यक्रम*
आपल्या प्रशालेत स्व-बोध या उपक्रमांतर्गत प्रत्येक राज्याची ओळख व प्रदर्शन याचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक वर्गाला नेमून दिलेले राज्याची माहिती व त्या राज्यातील विविधता तसेच खाद्य संस्कृती याचे प्रदर्शन प्रत्येक टेबलवर अतिशय उत्तम रीतीने मांडण्यात आले होते. अशा या सुंदर सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन दुपारी4.00 ते 5.30 या वेळेत करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर यांनी केले. त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. श्रीमती काळे मॅडम यांनी स्व-बोध या कार्यक्रमाबद्दलची माहिती सांगितले. स्व-बोध या उपक्रमांतर्गत प्रत्येक राज्याची ओळख व विविधता या आजच्या प्रदर्शनाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. माननीय पर्वेक्षिका सौ. रसिका लिमये यांनी आजच्या कार्यक्रमांतर्गत आपली भारतीय संस्कृती चे महत्त्व सांगून सर्व पालक व विद्यार्थ्यांना बोधपर संदेश दिला. नंतर सर्व पालकांनी प्रदर्शन पाहून भारतातील विविध राज्यातील भाषा,कलाकृती,मनोरंजन यांच्यातील विविधता अनुभवली. खाद्य संस्कृती यामधून प्रत्येक राज्यातील पदार्थांचा आस्वाद घेतला. पालकांनी कार्यक्रमाच्या अखेरीस स्व-बोध. या उपक्रमांतर्गत मराठीतून स्वाक्षरी करून आपल्या मातृभाषेचे महत्त्व जोपासले. आजच्या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी ऑफिसर सौ. मंजुश्री शिंदे यांनी केले.
शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी आनंददायी शनिवार अंतर्गत 'स्वचा बोध' या विषयावर श्री हेमंतराव हरहरे यांचे व्याख्यान झाले.
याप्रसंगी 'स्व'ची जाणीव विद्यार्थ्यांना होणे गरजेचे आहे. त्याची सुरुवात घरातील व्यक्तींपासून करणे आवश्यक आहे. आई-वडील, गुरुजनांना मान देणे महत्त्वाचे आहे. प्रेरणादायी कथेचे वाचन विद्यार्थ्यांनी करावे. तसेच विद्यार्थ्यांनी कण्हेरी मठ, कोल्हापूर येथील स्थळास भेट द्यावे. तसेच लहान कथा सांगून विद्यार्थ्यांना 'स्व'ची जाणीव करून दिली. यावेळी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री वसावे सर, मा. उपमुख्याध्यापक श्री गवळे सर, मा. पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कांबळे ज्योती तर पाहुण्यांचा परिचय श्री मस्के सर यांनी करून दिला.
शुक्रवार दि. 7/2/2025 शुक्रवार रोजी श्री. विनोद पारे, सौ. चिप्पा मॅडम व प्रशालेतील 67 मुले यांनी श्रीरंग कलादर्पण फाउंडेशन पुणे यांच्या अभूतपूर्व अशा भव्य रांगोळी प्रदर्शन "हर हर महादेव" या उपक्रमाला बालगंधर्व या ठिकाणी जाऊन रांगोळीच्या विविध प्रकारांमध्ये व नेत्रदीपक अशा प्रदर्शनाला भेट देताना श्री. अक्षय शहापूरकर व त्यांच्या सर्व कलाकार विद्यार्थी यांच्याशी संवाद साधत रांगोळीतील विविध प्रकार व तेही नाविन्यपूर्ण व नेत्रदीपक अशा रांगोळी पाहताना मुले भारावून गेली होती. श्री. शहापूरकर यांनी मुलांना पाण्यातील रांगोळी, पाण्यावरील रांगोळी, पाण्यामधील रांगोळी, थ्रीडी व ड्वेल रांगोळी अशा विविध रांगोळीचे प्रकार व त्यामागील एकाग्रता या संदर्भात मुलांना माहिती दिली व श्री. पारे सर यांचा सत्कार करताना त्यांना परमनंट रांगोळीची एक फ्रेम प्रदान केली. प्रशालेच्या वतीने कलाशिक्षक श्री. विनोद पारे यांनी सर्व टीमचे आभार मानले व आपल्या शाळेमध्ये कार्यशाळा घेण्याचे आवाहन केले. सर्व मुलांनी आनंद व्यक्त करताना आम्ही आमच्या घरच्यांना व परिचयातील सर्वांना प्रदर्शन पाहण्यास पाठवण्याचे आश्वासन दिले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. साईसिंग वसावे, उप मुख्याध्यापक श्री. गवळे सर व पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये यांनी मुलांचा प्रदर्शनातील अनुभव विचारत आपण स्वतःही हे प्रदर्शन पाहायला जाणार असल्याचे आवर्जून सांगितले.
बुधवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ प्रशालेच्या डॉ. प्र.ल.गावडे सभागृहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रशालेचे मा.मुख्याध्यापक श्री.वसावे सर, उपमुख्याध्यापक श्री.गवळे सर आणि पर्यवेक्षिका सौ.लिमये मॅडम, प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद व इयत्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. शुभेच्छा समारंभाचे प्रास्ताविक मा.उपमुख्याध्यापक श्री.गवळे सर यांनी केले. प्रास्ताविकामधून शुभेच्छा समारंभाचे महत्त्व व उद्दिष्ट सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना सविस्तरपणे श्री.पारवे सर यांनी सांगितल्या. परीक्षेसंदर्भात, अभ्यासासंदर्भात मार्गदर्शन केले. श्रीमती काळे मॅडम यांनी विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा विषयी माहिती दिली, महत्त्वाच्या सूचना सांगितल्या. कॉपीमुक्त अभियान या संदर्भात विद्यार्थ्यांनी सौ. कांबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाद्वारे शपथ घेतली.
या समारंभात अमेय वाडदेकर (१०अ) , हर्षल चौधरी (१०अ) , गणेचारी रुद्राक्ष (१०ब), सपकाळ सुरज (१०क ) या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील शिकवण, शिस्त, उत्तम संस्कार, शिक्षणाचे महत्त्व, शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन यातून आमचे व्यक्तिमत्त्व घडले, शाळा मातेचा आम्हाला कधीही विसर होणार नाही, शाळेतील अविस्मरणीय घटना, शाळेतील उपक्रमातील संधी, आनंदाचे क्षण, आमची जडणघडण यातूनच झाली असे विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. या समारंभात शाळेस ऋषभ कोळेकर (१० क) याने एक वाचनीय पुस्तक भेट दिले. या कार्यक्रमात सौ. जाधव वैष्णवी या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळामाता विद्यार्थ्यांचे जीवन घडविते, कर्णबधिर (दिव्यांग) मुलांना सामान्य मुलांप्रमाणे सामावून घेते, त्यांना मार्गदर्शन करते,आईप्रमाणे सांभाळते,तसेच त्यांना घडवते, त्यांचे व्यक्तिमत्व ,कलागुण विकसित करते असे विचार आपल्या भाषणात सांगून त्यांनी शाळेविषयी व शाळेतील शिक्षकांविषयी आदर व्यक्त केला.
ज्येष्ठ शिक्षक श्री. गायकवाड बी.एम. यांनी मुलांना अनमोल मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम यांनी परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. महत्त्वाच्या सूचना दिल्या. समारंभाच्या अखेरीस प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले, आवडीच्या क्षेत्रात करिअर करा , त्यात यश संपादन करा , समाजात आदर्श प्रतिमा निर्माण करा व उत्तम व्यक्तिमत्त्व घडवा. भाषणाच्या अखेरीस सर्व विद्यार्थ्यांना मा. मुख्याध्यापकांनी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. सौ. पोखरकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या अखेरीस त्यांनी सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना अल्पोपहार शाळेच्या वतीने देण्यात आला व त्यांना घरी सोडण्यात आले.
म.ए. सो मुलांचे विद्यालयात दिनांक ४ फेब्रुवारी 2025 मंगळवार रोजी रथसप्तमी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मन आणि शरीर योग संस्था पुणे संस्थापक व संचालिका डॉक्टर मनाली अमोद देव या उपस्थित होत्या. म.ए. सो मुलांचे विद्यालयात दिनांक ४ फेब्रुवारी 2025 मंगळवार रोजी रथसप्तमी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सायसिंग सर उप मुख्याध्यापक मा. श्री गवळे सर ,पर्यवेक्षिका मा. सौ. लिमये मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री आनसपुरे सर यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी रथसप्तमी व सूर्यनमस्काराचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
प्रमुख पाहुण्याने आपल्या भाषणात सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले. अखंड सूर्यनमस्कार घालणे खूप महत्त्वाचे आहे .शरीरात विविध संस्था कार्यरत असतात .त्या संस्थेचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी सूर्यनमस्कार घालणे खूप महत्त्वाचे आहे .त्यामुळे एकाग्रता वाढते ,शरीर निरोगी राहते ,सर्व व्याधी दूर होतात ,मनाचे आरोग्य चांगले राहते ,मनाची ताकद वाढवण्यासाठी सूर्यनमस्कार घालणे आवश्यक असते.
प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना सूर्याच्या आकारांमध्ये उभे राहून सूर्यनमस्कार घालण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योती कांबळे मॅडम यांनी केले तसेच आभार श्रीमती खाडे मॅडम यांनी मानले.

आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री चारूहास पंडित यांच्या समवेत इयत्ता 7वी चे विद्यार्थी व व श्रीमती खाडे,सौ नांगरे ,सौ सातपुते, श्री मस्के,श्रीअनासपुरे.

आनंददायी शनिवार अंतर्गत
*विश्व मराठी संमेलनास - २०२५ यास भेट *
शनिवार,दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी इयत्ता सातवी अ-ब-क च्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळा व्यंगचित्रांची दुनिया (चिंटू) मार्गदर्शक-श्री. चारुहास पंडित या संमेलनास भेट दिली. हे संमेलन, महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग यांच्या सौजन्याने भरवण्यात आले आहे. भेटीचे ठिकाण - फर्ग्युसन महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र. या कार्यशाळेत व्यंगचित्रकार श्री. चारुहास पंडित यांनी व्यंगचित्र कसे काढावे तसेच चिंटू या पात्राची निर्मिती कशी झाली ते सांगितले. याव्यतिरिक्त त्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन, पारंपारिक महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्रम (पोवाडा, पालखी नृत्य, गोंधळ, जागरण), नटसम्राट यांचा एकपात्री प्रयोग या सर्वांचा अनुभव घेता आला. तसेच प्रदर्शनास भेट देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना संमेलनातर्फे नरेंद्र मोदी निर्मित एक्झाम वॉरियर्स पुस्तक भेट देण्यात आले.
विद्यार्थ्यांसोबत सौ.नांगरे मॅडम,सौ. खाडे मॅडम,सौ. सातपुते मॅडम, श्री.मस्के सर, श्री. अनासपुरे सर यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
मा. मुख्याध्यापक श्री वसावे सर,मा. उपमुख्याध्यापक श्री गवळे सर व मा. पर्यवेक्षिका लिमये मॅडम यांनी या क्षेत्रभेटीस मार्गदर्शन केले.
आनंददायी शनिवार अंतर्गत विज्ञान प्रदर्शनास भेट
शनिवार,दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी इयत्ता आठवी ब व आठवी क च्या विद्यार्थ्यांनी Zoology Associations Wild Haven या प्रदर्शनास भेट दिली.
हे प्रदर्शन गरवारे कॉलेज, कर्वे रोड यांच्या सौजन्याने भरवण्यात आले आहे. जलचर,उभयचर प्राणी, मधुमक्षिका पालन, रेशीम किडे पैदास प्रकल्प, मानव व इतर प्राणी यांचे सांगाडे, रक्ताभिसरण, सरपटणारे प्राणी,विविध जलीय सजीव इ.चे models व प्रत्यक्ष नमुने या प्रदर्शनात पहावयास मिळाले. विद्यार्थ्यांसोबत सौ.चिप्पा मॅडम,सौ. गायकवाड मॅडम,सौ. मुंगी मॅडम, श्री.बाजारे सर यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. मा. मुख्याध्यापक श्री वसावे सर,मा. उपमुख्याध्यापक श्री गवळे सर व मा. पर्यवेक्षिका लिमये मॅडम यांनी या क्षेत्रभेटीस मार्गदर्शन केले.
आनंददायी शनिवार अंतर्गत क्षेत्रभेट
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळा व सारसबाग
आज शनिवार दि.1फेब्रुवारी 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त सारसबाग येथील पुतळ्यास इ. 5वी व 6वीतील विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी सौ. धानवले मॅडम यांनी त्यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच पुण्यातील ऐतिहासिक वास्तू सारसबाग येथे भेट देऊन तेथील श्री सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन विद्यार्थ्यांनी घेतले. या क्षेत्रभेटीत सौ राऊत, सौ.धानवले, सौ तांबे,सौ. शीतल सावंत,सौ. दर्प, श्री दौंडकर व श्री बुधियाळ सहभागी झाले. मा.मुख्याध्यापक श्री वसावे सर, मा. उपमुख्याध्यापक श्री गवळे सर व मा.पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम यांनी या क्षेत्रभेटीस मार्गदर्शन केले
आनंददायी शनिवार
शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी प्रार्थनेनंतर इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी संक्रांत व रथसप्तमीनिमित्त सूर्यनमस्कार घातले. प्रशालेतील शिक्षक श्री खुणे सर व श्री. मस्के सर यांनी विद्यार्थ्यांकडून बारा सूर्यनमस्कार मंत्रा सहित करून घेतले.
यानंतर प्रशालेतील शिक्षिका सौ. गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून हनुमान चालीसाचे पठण करून घेतले. श्री दौंडकर सर यांनी हनुमान चालीसा विद्यार्थ्यांना ऐकविली.

आनंददायी शनिवार अंतर्गत प्रकाशाचे प्रवहन या विषयावर मार्गदर्शन
आज दि.1 फेब्रुवारी 2025 रोजी मानसा फाउंडेशन तर्फे श्री. आशिष देसाई यांनी इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करणे या विषयावर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी आपले लक्ष केंद्रित करणे सर्वात महत्त्वाचे आहे त्यामुळे अभ्यासाला गती मिळते.
प्रथम श्री. देसाई सरांनी सर्व विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करण्याचे फायदे समजावून सांगितले व त्यानंतर विद्यार्थ्यांकडून त्यानुसार क्रिया करून घेतली. लक्ष केंद्रित करणे, एकाग्रता ही क्रिया विद्यार्थ्यांना त्यांच्या रोजच्या जीवनात अभ्यास करताना नक्कीच फायदेशीर आहे.
यावेळी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर व मा. पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम उपस्थित होते.
आज गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी साजरा करण्यात आली. प्रशालेचे माननीय उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर, माननीय पर्यवेक्षिका सौ.लिमये मॅडम, शिक्षक व विद्यार्थी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. वर्गांच्या ग्रुप वर माहितीची पीडीएफ पाठवण्यात आली.

आज दिनांक 28 जानेवारी वार मंगळवार रोजी प्रशालेत लाला लजपतराय यांची जयंती साजरी करण्यात आली.

25 जानेवारी रोजी हिंदूहृदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहर शिवसेना शाखेचे संपर्क प्रमुख श्री. संदीप गायकवाड यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये साधारणतः दीड हजार विद्यार्थ्यांमधून आपल्याप्रशालेतील इयत्ता सातवी - अ मधील विद्यार्थी चि. वेदांत काची याने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवत प्रशालेचा चित्रकलेतील सर्व स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवण्याच्या परंपरेचा सन्मान राखला या स्पर्धेमध्ये आपल्या प्रशालेतील 37 विद्यार्थी सहभागी झाले होते. या चित्रकला स्पर्धेचे मुख्य परीक्षक म्हणून आपल्या प्रशालेचे कलाशिक्षक श्री. विनोद पारे यांनी काम पाहिले.



म. ए. सो. मुलांचे विद्यालय पुणे येथे 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला.
दिनांक 26 जानेवारी रविवार या दिवशी प्रभात फेरीने सुरू झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे निवृत्त मेजर मा.श्री अरुणजी फाटक, शाळा समिती अध्यक्ष मा.श्री दिलीपजी शेठ, शाळा समिती महामात्र मा. श्री सुधीरजी गाडे, मुख्याध्यापक मा. श्री. सायसिंग वसावे, उपमुख्याध्यापक मा. श्री. चंदू गवळे, पर्यवेक्षिका मा. सौ. रसिका लिमये, माजी विद्यार्थी पराग गुजराथी यांनी ध्वजारोहण करून सर्वांसह ध्वजास सलामी दिल्यानंतर ध्वजप्रतिज्ञा घेतली. प्रमुख पाहुण्यांसह पदाधिकाऱ्यांनी एनसीसी पथकांचे निरीक्षण केले. त्यानंतर भारतमाता पूजन केल्यानंतर संविधान वाचन केले गेले. शासन सूचनेनुसार तंबाखू मुक्त भारत अभियान अंतर्गत तंबाखू मुक्तीसाठी प्रतिज्ञा घेतली गेली. 'संविधान वाचन' प्रशालेतील शिक्षिका सौ ज्योती कांबळे व 'तंबाखू मुक्त प्रतिज्ञा वाचन' सौ.बधे यांनी केले.प्रशालेचे क्रीडा शिक्षक अनासपुरे यांनी प्रमुख पाहुणे श्री अरुणजी फाटक यांचा परिचय व स्वागत केल्यानंतर प्रशालेतील एनसीसी मध्ये वार्षिक उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना फिरते चषक देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक यादीचे वाचन प्रशालेच्या शिक्षिका सौ. नांगरे यांनी केले. तसेच प्रशालेतील वाढदिवस असणाऱ्या शिक्षिका व विद्यार्थी यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रमुख पाहुणे श्री अरुणजी फाटक यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की विद्यार्थी मित्रांनो आपण आगामी भारतातील युवक असून तुमच्यात शक्ती आहे ती तुम्ही राष्ट्रासाठी, एकतेसाठी खर्च केली पाहिजे. प्रामाणिकपणा, सहकार्य, एकता यावर विश्वास ठेवून आपण सकारात्मकपणे आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे. बलवान राष्ट्रासाठी आपण कटिबद्ध राहायला हवे. हा संदेश दिला. अध्यक्षीय मनोगतातून श्री दिलीप जी शेठ यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या" बाधा ये आती है आये ' कवितेचा संदर्भ देऊन आव्हानांचा सामना करण्याची जिद्द मनामध्ये बाळगा. संस्थापक वामन प्रभाकर भावे, ल. न.इंदापूरकर, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा आदर्श ठेवून प्रयत्नवादी रहा असा उपदेश केला.
इ. 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली त्यात देशभक्तीपर गीत, एरोबिक्स, पिरॅमिडस, देशभक्तीपर गीतावरील नृत्य, सायलेंट ड्रिल, घोष प्रात्यक्षिक, मल्लखांब प्रात्यक्षिक, लेझीम यांचा समावेश होता. या प्रात्यक्षिकांना अनुक्रमे सौ.कचरे, सौ राऊत, श्रीमती तांबे, श्री अनासपुरे, श्री बुधीहाळ, सौ. सातपुते, सौ अरणके,सौ. शिंदे, श्री खुणे, श्री तनपुरे,सौ. हावळे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते. उत्साहाने साजरा झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका श्रीमती सुवर्णा काळे यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सकाळी प्रभात फेरी काढली.


शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. वसावे सर, माननीय पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम, बीएलओ म्हणून कार्यरत असलेले शिक्षक तसेच सर्व शिक्षक व इ.५वी.ते १०वी चेविद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.
श्रीमती. तांबे मॅडम यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून घेण्यात आली. सौ.बोत्रे मॅडम यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
तसेच राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत इयत्ता ५ ते ९ वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रथम व द्वितीय क्रमांक काढण्यात आले. त्या विद्यार्थ्यांना माननीय मुख्याध्यापक श्री. वसावे सर व पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम यांच्याकडून प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
इंग्रजी संवाद स्पर्धेत जिंकलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशालेत झाले कौतुक
बुधवार दिनांक 22/01/2025 रोजी श्रीकांत भावे स्मृती इंग्रजी संवाद स्पर्धा उद्यान मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडली होती .या स्पर्धेत आपल्या प्रशालेतील इयत्ता पाचवी ते सातवी गट व इयत्ता आठवी ते दहावी गट अशा दोन गटात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. या स्पर्धेसाठी सौ .दिपाली बधे व सौ .सविता गायकवाड यांनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या
व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे 18-11-2024 रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची अभिक्षमता मापन चाचणी ( Aptitude Test ) चे निकाल विद्यार्थी व पालकांना देण्यात आले व विद्यार्थ्यांचे विविध क्षमता नुसार विद्यार्थ्यांना व पालकांना करियर मार्गदर्शन करण्यात आले
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना शाळेचे मुख्याध्यापक श्री. वसावे सर, पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये मॅडम उपस्थित होते विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यासाठी व्यक्तिमत्व विकास केंद्राचे समुपदेशक श्री. सागर गायकवाड सर व व्यक्तिमत्व विकास केंद्राचे इतर समुपदेशक सौ.शुभा कुलकर्णी, सौ.स्मिता लोकरे,सौ.सुरेखा नांदे मॅडम यांनी विद्यार्थी व पालकांना करियर मार्गदर्शन केले
शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी इयत्ता दहावीच्या व्याख्यानमालेमध्ये संस्कृत विषयाचे व्याख्यान झाले. रेणुका स्वरूप प्रशालेमधील ज्येष्ठ शिक्षिका सौ. सामदेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी व्यवस्थित मार्गदर्शन केले.
इयत्ता दहावी अ व ब या वर्गासाठी मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्याख्याते परिचय सौ टपळे मॅडम यांनी केला.

म. ए. सो.मुलांचे विद्यालय येथे दहावी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या व्याख्यानमाले अंतर्गत हिंदी संपूर्ण या विषयासाठी श्री. गजानन शांताराम गोसावी एम. ए. बी.एड. यांचे दिनांक 24 जानेवारी 2024 शुक्रवारी. सव्वातीन ते साडेचार या वेळेत व्याख्यान झाले. सदरहू व्याख्यानात हिंदी संपूर्ण विषयाच्या पेपर लेखनातील कौशल्य विषयी, तसेच अधिकाधिक गुण प्राप्त करण्यासंदर्भात मार्गदर्शन देण्यात आले.
दिनांक 23 जानेवारी 2025 गुरुवार रोजी महात्मा फुले इतिहास अकादमी तर्फे महात्मा फुले -सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार आपल्या प्रशालेतील *सौ. मंजुश्री रवींद्र शिंदे यांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले याबद्दल मा. युवराज छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते देण्यात आला याबद्दल प्रशालेच्या तर्फे अभिनंदन .

आज गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेचे शाला समितीचे अध्यक्ष माननीय श्री. शेठ सर, माननीय मुख्याध्यापक श्री. वसावे सर, माननीय उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर, माननीय पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम तसेच पालक शिक्षक संघाच्या प्रतिनिधी यांचा हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
माननीय श्री शेठ सर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस थोर देशभक्त, क्रांतिकारक यांच्या विषयीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच इयत्ता आठवी अ मधील चि. जय जोशी या विद्यार्थ्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना सांगितली.
माननीय पर्यवेक्षका सौ लिमये मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

गुरुवार दिनांक 23/ 01/ 2025 रोजी इयत्ता - दहावी व्याख्यानमाला अंतर्गत विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे मार्गदर्शन मॉर्डन हायस्कूलचे शिक्षक श्री पाटील सर यांनी केले.

बुधवार दिनांक 22 जानेवारी रोजी इयत्ता दहावीच्या व्याख्यानमालेमध्ये इंग्रजी विषयाचे व्याख्यान झाले रेणुका स्वरूप मधील ज्येष्ठ शिक्षक श्री माळी सर यांनी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी व्यवस्थित मार्गदर्शन केले . इयत्ता दहावी अ ब क या तीनही वर्गांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले. व्याख्याते परिचय बधे मॅडमने केला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योती कांबळे मॅडम यांनी केले.

बुधवार दिनांक 22/01/2025 रोजी श्रीकांत भावे स्मृती इंग्रजी संवाद स्पर्धा उद्यान मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडली .या स्पर्धेत आपल्या प्रशालेतील इयत्ता पाचवी ते सातवी गट व इयत्ता आठवी ते दहावी गट अशा दोन गटात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. या स्पर्धेसाठी सौ .दिपाली बधे व सौ .सविता गायकवाड यांनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत व्याख्यान
आज मंगळवार दि.21 जानेवारी 2025 रोजी रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत व्याख्यान इ.7वी व 8वीतील सर्व विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले.
पालक श्री भिसे यांच्या भिसे मोटर ड्रायव्हिंग स्कूल मार्फत श्री अनिल पंतोजी (निवृत्त मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर, आर टी ओ) यांना आमंत्रित करण्यात आले. यामध्ये वाहतुकीचे नियम, वाहतुकीचे चिन्ह, हेल्मेटचा वापर याविषयी पीपीटी व व्हिडिओच्या साहाय्याने विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. मा. पर्यवेक्षिका सौ.लिमये मॅडम यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.श्री.पारे सर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ राऊत यांनी केले.
आंबेगाव येथे झालेल्या भव्य कबड्डी स्पर्धेत आपल्या प्रशालेच्या 17 वर्षीय मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला विजय संघाचे हार्दिक अभिनंदन.

सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 इयत्ता 10 वी व्याख्यानमाला. विषय : गणित भाग 1 व भाग 2 चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा. वाळुंज सर.

भावे हायस्कूल मधील बक्षिसांची वाहती गंगा म्हणजेच प्रशालेचा चित्रकला विभाग.
शनिवारी सकाळी ॲक्सिस बँक नॅशनल ड्रॉइंग कॉम्पिटिशन व (शासकीय रेखा कला परीक्षा ) ग्रेड एक्झाम च्या विद्यार्थ्यांचा सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक करत सत्कार केला होता. त्याच शनिवारी दि 18 जाने. 2025 रोजी ग्राहक पेठ व पार्ले प्रोडक्ट्स इंडिया लि. यांच्यावतीने कित्येक वर्षापासून पुण्यातील अग्रगण्य अशी चित्रकला स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमध्ये आपल्या प्रशालेतील तीनही गटातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वात जास्त बक्षिसे प्राप्त करत शाळेच्या नावलौकिकात भर घालत मानाचा तुरा रोवला व पुणे व पिंपरी चिंचवड बहुतांश शाळांचा सहभाग असताना शहरामध्ये सर्वात जास्त बक्षीस घेणारी प्रशाला म्हणून गौरवण्यात आले. व मुलांबरोबर प्रशालेला देखील ट्रॉफी प्रदान करण्यात आली . ग्राहक पेठ चे अध्यक्ष व पार्ले प्रॉडक्ट इंडिया च्या मार्केटिंग हेड सिंग यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. ही स्पर्धा तीन टप्प्यात घेऊन आपल्या प्रशालेतील 10 विद्यार्थ्यांनी तीनही गटात प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल 22 विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे कलाशिक्षक श्री. विनोद पारे सर यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. चंदू गवळे व पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये यांनी सर्व मुलांचे कौतुक करत प्रोत्साहन दिले. प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर व इतर विद्यार्थ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
*प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांची प्रशालेस भेट *
आपल्या प्रशालेच्या 1969 च्या SSC बॅचच्या माजी विदयार्थ्यांनी आपल्या प्रशालेच्या ग्रंथालयास आज 18 पुस्तके भेट दिली. त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री. दिवेकर अशोक आणि श्री. गर्गे प्रदीप हे दोन माजी विदयार्थी उपस्थित होते. प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर आणि पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम यांनी त्याचा स्वीकार केला आणि त्याबद्दल आभार मानले.
पुस्तकांची नावे पुढीलप्रमाणे
१) वपुर्झा.
२) सामान्यातील असामान्य
३) हरवलेल्या मंदिराचे रहस्य
४) आजच्या पोतडीतील गोष्टी.
५) स्वर्गाच्या वाटेवर
६) घालमेल.
७) व्यक्ती आणि वल्ली
८) हसवणूक
९) नस्ती उठा ठेव.
१०) बटाट्याची चाळ
११) असा मी असा मी
१२) वंगचित्रे.
१३) आपण सारे अर्जुन
१४) काळे पाणी.
१५) सहा सोनेरी पाने
१६) माझी जन्मठेप
१७) सावरकर-वाळिंबे
१८) सावरकरांचा राष्ट्रधर्म
अशी एकूण 4200 रुपयांचे
18 पुस्तके ग्रंथालयास भेट म्हणून दिली आहे.

रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत रॅली
शनिवार दि.18 जानेवारी 2025 रोजी रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत एक उपक्रम म्हणजे रॅली.
इ. 7वी क, 9वी ब व एन. सी. सी च्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली. यामध्ये विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम, वाहनांचा वेग व हेल्मेट वापरणे याबद्दल जनजागृती केली. या रॅलीत सौ. राऊत, सौ. टपळे, सौ शिंदे मंजुश्री व श्री बुधियाळ सर सहभागी झाले. मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर,मा. उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर व मा. पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार या रॅलीचे आयोजन करण्यात आले.
म. ए. सो. मुलांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पुणे- 30
प्रशालेची परंपरा अबाधित राखून सलग अकराव्या वर्षी शाळेचा व आपल्या सेंटरचा देखील निकाल 100% टक्के
A ग्रेड - 20 विद्यार्थी (07)
B ग्रेड - 20 विद्यार्थी (05)
C ग्रेड - 05 विद्यार्थी (03)
वरील विद्यार्थ्यांचे दहावीच्या बोर्ड परीक्षा (कंसात) दिलेले गुण वाढले.
प्रशालेचे मुख्याध्यापक, चित्रकलाशिक्षक श्री पारे सर व सहकार्य केलेले सर्व अध्यापक, शिक्षकेतर तसेच
सर्व विद्यार्थी व पालकांचे मनस्वी अभिनंदन.

ॲक्सिस बँक राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा 2024-25
पुणे जिल्हा स्थरवर आपल्या प्रशालेतील
चि. रोहित ढेबे (गोल्ड)
चि. कुणाल ढेबे (सिल्वर)
चि. सहिष्ण धारूरकर (ब्राँझ) पदके प्राप्त करत इतर 50 मुलांना बँकेच्या वतीने गिफ्ट देण्यात आले. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये यांनी सन्मानित केले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रशालेचे कलाशिक्षक श्री. पारे विनोद दे. यांनी केले,
सर्वांचे मनस्वी अभिनंदन.
रोटरी क्लब तर्फे पुणे वॉरियर कार्यक्रम
गुरुवार दिनांक 16 जानेवारी रोजी रोटरी क्लब तर्फे इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे क्लाइमेट वॉरियर चा कार्यक्रम घेण्यात आला .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या हर्षदा अभ्यंकर मॅडम तसेच रोटरी क्लबचे रोटेरियन वैशाली बर्वे मॅडम ,रोटेरियन सेक्रेटरी गीता मिस्त्री मॅडम उपस्थित होत्या. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात होणारे बदल व त्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी किंवा ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमधून विद्यार्थ्यांना कसा हातभार लावता येईल, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. माननीय उपमुख्याध्यापक श्री गवळे सर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व सौ दिपाली बधे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
राज्य क्रीडा दिन
म.ए.सो. मुलांचे भावे हायस्कूलमध्ये दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी कुस्तीपटू श्री खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन* म्हणून मोठ्या उत्साहात प्रशालेत साजरा करण्यात आला .प्रमुख पाहुणे म्हणून खो-खो सुवर्णपदक विजेते मा. श्री अनिकेत चराटे हे प्रशालेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते तसेच क्रीडा भारतीचे श्री विजय राजपूत व श्री प्रशांत सर उपस्थित होते .
प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सायसिंग सर यांनी आपल्या प्रास्ताविकात ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांचे कुस्ती क्षेत्रातील योगदान तसेच त्यांचे कष्ट परिश्रम याविषयी सांगून खेळाचे महत्व पटवून दिले ते म्हणाले कोणताही खेळ खेळताना नियम, शिस्त याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशालेतील खेळाडू महाराष्ट्र संघाकडून ड्रॉप रो बाॅल उपविजेता खेळाडू जयवर्धन जाधव, वरद पवार व कर्णबधिर विद्यार्थी कुस्ती खेळाडू अक्षय बोराडे याचा सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे आपल्या भाषणात म्हणाले "खेळामुळे आपले शरीर निरोगी राहते निरोगी शरीर हीच खरी आपली संपत्ती आहे"
या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ लिमये रसिका मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता पाचवी ते दहावी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री अनासपुरे सर,पाहुण्यांचा परिचय सौ राऊत मॅडम,तसेच श्री खाशाबा जाधव यांच्या जीवन कार्याची माहिती श्री खुणे सर यांनी सांगितली.प्रशालेचे मा. उप मुख्याध्यापक श्री गवळे सर यांनी आभार मानले.
सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी भोगी व संक्रांत या सणाची माहिती 8वी अ मधील जय जोशी याने सांगितली.तसेच दि. 14 जानेवारी हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने भूगोल दिनाची माहिती 8वी अ मधील श्रेयश देशमुख याने सांगितली. सर्वांना भोगी व संक्रांत या सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

NCC कॅम्प अहवाल
दिनांक 2 जानेवारी 2025 ते 11 जानेवारी 2025 NCC च्या द्वितीय वर्षातील मुलांचा CATC 10 दिवसांचा कॅम्प NCC ग्रुप हेडकॉर्टर पुणे येथे संपन्न झाला. या कॅम्प साठी 20 मुली आणि 32 मुले असे एकूण 52 मुले सहभागी झाली होती. या कॅम्प मध्ये हेल्थ रन , PT, ड्रिल , लेक्चर, खेळ, NDA ला भेट, एरोमोडलीग , फायरींग, या सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटी होतात तसेच vollyball , drill , throwball या प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या या मध्ये म.ए.सो.मुलांच्या शाळेला Vollyball मध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे . या कॅम्प मध्ये नांदेड , परभणी , सोलापूर ,पुणे या जिल्ह्यातून एकूण 11 शाळा सहभागी झाल्या होत्या. या कॅम्प मधून आपल्या सर्व मुलांना खुप गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत . कॅम्प कमांडर गोराई सर, सार्जंट अनिल सर, सार्जंट महिपाल सर, सार्जंट भुपेंद्र सर या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले .या 10 दिवसांच्या कॅम्प मध्ये ANO मंजुश्री शिंदे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी, पुणे जिल्हा शाखा,ज्युनिअर /युथ रेड क्रॉस मार्फत आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन राष्ट्रीय गीत व रेड क्रॉस गीत स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी म.ए.सो भावे प्राथमिक शाळा येथे करण्यात आले होते. यावर्षी बंकिमचंद्र चटटोपाध्याय रचित “वंदे मातरम” गीतास 150 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून प्रत्येक संघास पूर्ण “वंदे मातरम” गीत व “मानवता के सेवक हे हम सेवा हमारा कर्म है” हे रेड क्रॉस चे गीत अशी दोन गीते सादर करायची होती. एकूण 7 विद्यार्थ्यांनी या सहभाग घेतला होता. वाद्यांची साथ संगत आपल्या प्रशालेतील विद्यार्थी वेदांत काळे इयत्ता 8 ब याने पेटी वाजवून तर विराज जोशी इयत्त्ता 10 अ यानी तबला वाजवून दिली . सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका श्रीमती. काळे सुवर्णा मॅडम यांनी मार्गदर्शन केल. तसेच माननीय मुख्याध्यापक श्री. वसावे सर, मा.उपमुख्याध्यापक श्री.गवळे सर, मा. पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम यांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले.
दिनांक ११ जानेवारी व २०२५ रोजी स्वामी विवेकानंद जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या युवा चेतना दिनाच्या दिवशी म. ए. सो. मुलांचे विद्यालयातील विद्यार्थ्यानी आबासाहेब गरवारे कॉलेज मध्ये घोष स्पर्धेत सहभाग घेतला आणि उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांना श्री. भाऊ राव खुने यांनी मार्गदर्शन केले होते.
आयुका भेट उपक्रम
शनिवार दि 11/1/2025 रोजी विज्ञान उपक्रमांतर्गत पुणे विद्यापीठातील आयुका येथे astrology, AI and the future या विषयावरील व्याख्यानासाठी 9अ चे विद्यार्थी व सौ राऊत मॅडम उपस्थित होते.

शनिवार दि.11 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री.वसावे सर व मा. पर्यवेक्षिका सौ.लिमये मॅडम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कर्णबधिर युनिटमधील चि.श्रेयस शिंदे 9 ब मधील विद्यार्थ्यांने स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा केली व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी कथा विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच चि. शिवांश पळीवाले 8अ या विद्यार्थ्यांने स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. त्याचप्रमाणे चि. जय जोशी 8अ मधील विद्यार्थ्याने राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना सांगितली.
यानंतर परिपाठ घेण्यात आला. परिपाठ झाल्यानंतर आयोध्ये मधील मंदिरात राममूर्ती प्राणप्रतिष्ठेला तिथीनुसार एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्त सर्व विद्यार्थ्यांकडून रामरक्षा पठण करण्यात आले. त्यानंतर मारुती स्तोत्र पठण करण्यात आले.
भूगोल प्रदर्शन
🔴 जिविधा संस्थेतर्फे🔴
🟪इयत्ता - 7 वी ब व 8 वी क
🟪विद्यार्थी संख्या - 47
🟪ठिकाण - बालगंधर्व कलादालन पुणे
🟪विषय - जीविधा संस्थेमार्फत भूगोल प्रदर्शन
🟪दिनांक - 10 जानेवारी 2025 शुक्रवार
🟪वेळ - दु.12.15 ते 2.30.
आज म.ए.सो. मुलांचे विद्यालय प्रशालेतील विद्यार्थी यांनी भूगोल प्रदर्शनास भेट दिली. श्री.राजीव पंडित सर यांनी विद्यार्थ्यांना खूप उत्तम मार्गदर्शनपर माहिती दिली.
✅चित्रफिती मार्फत पृथ्वीची निर्मिती,
✅हिमालयाची निर्मिती, नद्यांची माहिती,
✅जैवविविधता माहिती दिली.
✅तसेच बेसाल्ट खडक, अग्निजन्य खडक, जांभा खडक यांची माहिती व प्रात्यक्षिक दाखविले.
✅थ्रीडी गॉगल द्वारे भारताचा नकाशा दाखविण्यात आला.
✅विविध प्रकारचे प्राण्यांचे, पक्षांचे पझल्स तिथे सोडविण्यासाठी दिले होते.
मुलांचे मनोरंजना बरोबर विषयाचे मार्गदर्शनही करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील भौगोलिक पशु-प्राण्यांची माहिती असलेले पुस्तक भेट स्वरूप देण्यात आले.श्री बाजारे सर, सौ.धानवले मॅडम, व सौ. सातपुते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्यास नेले होते.
14 वी ड्रॉप रो बॉल राष्ट्रीय स्पर्धा 2025
माउंट लुटेरा जी स्कूल बिहाटा, पटना बिहार येथे संपन्न झाल्या
त्यामध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले आहे
म ए सो मुलांचे विद्यालय, सदाशिव पेठ या शाळेतील दोन मुले या स्पर्धेला गेले होते
त्यापैकी मिक्स डबल या इव्हेंट मध्ये
महाराष्ट्राला उपविजेते पद मिळाले
जयवर्धन जितेंद्र जाधव इयत्ता 9 ब (मिक्स डबल इव्हेंट )
हा विद्यार्थी ज्युनियर गटातून खेळला
वरद विशाल पवार इयत्ता आठवी ड (डबल इव्हेंट )
हा खेळाडू सब ज्युनिअर गटातून खेळला
सिल्वर मेडल मिळाले मिळाले
प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना खूप खूप अभिनंदन
आज दिनांक 7 जानेवारी वार मंगळवार रोजी प्रशालेत प्र.के.अत्रे यांच्या जीवनपटावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य अत्रे समितीचे अध्यक्ष माननीय श्री. विजयजी कोलते सर आणि व्याख्याते म्हणून प्रशालेचे महामात्र माननीय श्री.सुधीरजी गाडे सर उपस्थित होते तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. बाबासाहेब शिंदे सर ,शाला समिती अध्यक्ष माननीय श्री. दिलीपजी शेठ सर तसेच म.ए. सो. चे सचिव माननीय श्री.अतुल कुलकर्णी सर आणि माननीय श्री.एम.एस. जाधव सर, प्रशालाचे मुख्याध्यापक श्री.वसावे सर,उपमुख्याध्यापक श्री.गवळे सर पर्यवेक्षिका सौ.लिमये मॅडम सर्व शिक्षक वृंद व प्रशालेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वतीचे पूजन आणि प्र. के.अत्रे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री.वसावे सर यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांच्या परिचयाची सूत्रे ज्येष्ठ शिक्षक माननीय श्री मस्के सर यांनी स्वीकारली. मार्गदर्शन करताना श्री. विजयजी कोलते सरांनी प्र.के. अत्रे यांच्या जीवनातील काही प्रसंग विद्यार्थ्यांसमोर सांगितले. व्याख्याते माननीय श्री. सुधीरजी गाडे सरांनी प्र.के. अत्रे यांचा संपूर्ण जीवनपट थोडक्यात विद्यार्थ्यांसमोर मांडला तसेच ते आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत, त्यांचा आदर्श समोर ठेवून प्रत्येक विद्यार्थी एवढा सर्वगुणसंपन्न व्हावा अशी इच्छा देखील व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेच्या शिक्षिका सौ. राऊत मॅडम यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जोशी कल्याणी यांनी केले.
दिनांक -7/1/2025
वार - मंगळवार
उपक्रम- कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शब्द संस्कार स्पर्धा
भगिनी निवेदिता प्रतिष्ठान तर्फे कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शब्द संस्कार स्पर्धा झाल्या. यामध्ये खालील विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले.
1) प्रज्वल बडवे (6 वी) इंग्रजी पाठांतर स्पर्धा प्रथम क्रमांक
2) बीनीत नलावडे (6वी) गणितीय स्पर्धा *द्वितीय क्रमांक
3) आर्य जाधव(9 वी) इंग्रजी पाठांतर स्पर्धा प्रथम क्रमांक
4) श्रेयश शिंदे (9वी) इंग्रजी पाठांतर स्पर्धा आणि गणितीय स्पर्धा प्रथम क्रमांक
आज 4 जानेवारी 2025 वार शनिवार रोजी चैतन्य योग साधना संस्था विद्यमाने शनिवार पेठ येथे अखंड सूर्यनमस्कार यागउपक्रम राबविण्यात आला . त्यामध्ये आपली प्रशाला म .ए . सो .मुलांचे (भावे )हायस्कूल मधील इयत्ता सातवी मधील व नववी मधील विद्यार्थी व क्रीडा शिक्षक श्री खुणे सर सहभागी झाले होते .विद्यार्थ्यांनी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्य नमस्कार घातले व शिस्तीचे पालन केले .संस्थेने चांगल्या पद्धतीने सूर्यनमस्कार उपक्रम सेवा सुविधा देऊन राबवला . शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप प्रमाणपत्र व शाळेला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .शेवटी सांगता प्रशालेच्या घोषणेने झाले .
सावित्रीबाई फुले जयंती (बालिका दिन)
शुक्रवार दि. 3 जानेवारी 2025 रोजी क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांची जयंती (बालिका दिन)प्रशालेमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी प्रशालेचे मा.उपमुख्याध्यापक श्री गवळे सर,मा. पर्यवेक्षिका लिमये मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. इ. 8वी क मधील चि. ज्ञानेश्वर एकनाथ खांडेकर या विद्यार्थ्याने क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच उप मुख्याध्यापक मा.श्री गवळी सर यांनी देखील सावित्रीबाई फुले यांची गोष्ट सांगून त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.
वीर बाल दिवस कार्यक्रम
दिनांक 24 डिसेंबर 2024
वार- मंगळवार
एकूण सहभागी विद्यार्थी: 5 ते 12 वी 200 विद्यार्थी
वेळ - सकाळी 8.30 ते 9.30
स्थळ - प्र ल गावडे सभागृह
प्रेक्षक:- इयत्ता 5 ते 12 विद्यार्थी
प्रास्ताविक: सौ.कुलकर्णी
गीत: सौ. जोशी , सौ. निजसुरे
विरगाथा गोष्ट: सौ. सातपुते
समारोप: पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम

दिल्लीत प्रशालेचे नाव उजळले
दि २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिनानिमित्त दिल्लीतील विश्वरूप एज्युकेशन तर्फे घेण्यात आलेल्या संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेत इ ५ वी ते इ १२ वी मधील विद्यार्थी सहभागी झाले होते,त्यामधून ७ विद्यार्थी पहिल्या फेरीत उत्तीर्ण झाले आहेत.त्यांची नावे खालीलप्रमाणे
१)पवार वैभव नितिन(१२ वी ब)
२)शिगवण यश प्रभाकर(११ वी अ)
३)पवार तुषार उदय(११ वी अ)
४)कांबळे ओम सुनिल(७ वीअ)
५)बडदे सूर्या महेश(७ वी ब)
६)मळेकर अथर्व संपत(९ वी ब)
७)तोरसे समर्थ प्रकाश(१० वी ब)
त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ चौधरी मॅडम,सौ हावळे मॅडम,श्री गायकवाड बलभीम सर,सौ सातपुते मॅडम,सौ टपळे मॅडम,सौ कांबळे ज्योती मॅडम,सौ चिप्पा मॅडम,सौ बधे मॅडम,या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन.
स्पर्धेसाठी माननीय पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.
म. ए. सो. मुलांचे विद्यालय पुणे येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात साजरा
दि. 23डिसेंबर 2024रोजी प्रशालेच्या प्रांगणात सकाळी ठीक 9वाजता प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी 1968ची बॅच चे इंजिनियर श्री. श्रीकांत केळकर,शाला समितीअध्यक्ष श्री. दिलीप शेठ मुख्याध्यापक सायसिंग वसावे, उपमुख्यध्यापक श्री. चंदू गवळे, पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये 5वीते 12वी शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आजी, माजी विद्यार्थी, यांच्या उपस्थितीत साजरा झाला.
प्रस्ताविकातून उपमुख्याध्यापक श्री. चंदू गवळे यांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या कार्यक्रमातून यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा हेतू स्पष्ट केला. यानंतर प्रमुख पाहुणे व पदाधिकारी यांचे हस्तेआदर्श शिक्षक,विविध विषयात पारितोषिक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
प्रमुख पाहुणे श्री. श्रीकांत केळकर यांनी आपल्या मनोगतातून उत्तम नागरिक बना. प्रामाणिक पणे मेहनत करा असा संदेश दिला. तर अध्यक्षीय मनोगतातून श्री. दिलीप शेठ यांनी प्रयत्नांचे महत्व सांगून विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सौ. बोरा सुषमा यांनी तर आभारप्रदर्शन सौ. चौधरी यांनी केले. यापूर्वी साजरे झालेले क्रीडास्पर्धा उदघाटन, क्रीडास्पर्धा पारितोषिक वितरण, विविध गुणदर्शन,स्नेहभोजन,वार्षिक पारितोषिक वितरण या कार्यक्रमांनी शाळेच्या सन्मानात वाढ केली.
आज दि 21 डिसेंबर शनिवार रोजी प्रशालेत इ 5 वी ते 12 वी च्या विदयार्थ्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
सनईच्या सुरात जेवणाच्या पंक्तीपद्धतीने सुग्रास जेवण वाढण्यात आले. जिलेबी, मसालेभात, पापड, पोळी, मटारबटाटा रस्साभाजी असा बेत होता. सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने भोजनाचा आस्वाद घेतला.
म. ए. सो.मुलांचे विद्यालय येथे वार्षिक संमेलन सोहळा संपन्न
दि. 20/12/24 वार शुक्रवार
सरस्वती पूजनाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात आणि मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे यांनी संमेलनाचा हेतू सांगताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्राविण्य प्राप्त व्हावी यासाठीच वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असतो हे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 2001 सालचे माजी विद्यार्थी व एके स्टुडिओचे संचालक अभिनेते श्री केदार आठवले यांच्या हस्ते प्रशालेतील विविध स्पर्धातील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. मराठी इंग्रजी, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाचवी ते सातवी गट व आठवी ते दहावी गट यांचा त्यात समावेश होता. आपल्या मनोगता तून प्रमुख पाहुणे केदार आठवले यांनी कोणत्याही क्षेत्रासाठी कौशल्य मिळवणे आवश्यक असून असलेल्या कौशल्यात वाढ करण्यासाठी मेहनत करा हा प्रात्यक्षिकाद्वारे संदेश दिला. आभारप्रदर्शन प्रशाळेच्या शिक्षिका सौ. वामन यांनी व सूत्रसंचालन अमृता अरणके यांनी केले. कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक सायसिंग वसावे, उपमुख्याध्यापक चंदू गवळे, पर्यवेक्षिका रसिका लिमये यांचे सह सर्व पाचवी ते बारावीचा शिक्षक व शिक्षकेतरकर्मचारी वर्ग बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होता. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमातून पाचवी तेबारावी च्या विद्यार्थ्यांनी स्व ची जाणीव विकसित होणाऱ्या समता, बंधुता,एकता, देशभक्ती, संस्कृती इत्यादी मूल्यांवर आधारित मनोरंजक कार्यक्रम सादर केले. त्यात विविध भाषिक, प्रादेशिक, धार्मिक नृत्य, नाट्य, वादन या कार्यक्रमांचा समावेश होता.
पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) पुणे शहर पश्चिम विज्ञान प्रदर्शन इयत्ता अकरावीचे अ (सायन्स) चे विद्यार्थी
◾ निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थी
अथर्व ज्ञानेश्वर शिंदे
◾ विज्ञान प्रदर्शन आणि प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी विद्यार्थी
पार्थ विलास दळवी
गुरु शरद चिवे
म. ए. सो. मुलांचे विद्यालय येथे स्नेहसंमेलनानिमित्त स्टॅचू स्पर्धा संपन्न.
मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे सर यांच्या मार्गदर्शन उपमुख्याध्यापक श्री चंदू गवळे, पर्यवेक्षिका रसिका लिमये यांच्या संयोजनाने प्रशालेत ठीक साडेचार वाजता क्रीडांगणामध्ये स्टॅच्यू स्पर्धा संपन्न झाल्या. माननीय मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे यांनी सर्व स्टॅच्यू स्पर्धकांना शुभेच्छा देताना सहभागाचे महत्त्व सांगितले. प्रास्ताविकातून प्रशालेच्या शिक्षिका सौ चौकटे यांनी स्पर्धे तून विद्यार्थ्यांमध्ये एकता, संघ भावना, सहकार्य निर्माण करण्याचा हेतू स्पष्ट केला. प्रत्यक्ष स्टॅचू स्पर्धेत पाचवी ते दहावीच्या सर्व वर्गांनी प्रत्येकी एक याप्रमाणे स्टॅच्यू तयार केला. त्यात कृष्ण, कोळी धनगर, भगतसिंग, अहिल्याबाई होळकर, कर्नाटकातील वर, आदिवासी, भारत माता, हनुमान, इत्यादी स्टॅचू तयार केले. प्रशालेचे शिक्षक श्री अनासपुरे व मस्के यांनी परीक्षण केले. मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी प्रत्यक्ष स्टॅचू स्पर्धेचे अवलोकन केले. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने स्पर्धेत सहभाग घेतला. यात पाचवी ते सातवी या गटात सातवी ब, पाचवी ब वआठवी ते दहावी या गटात 10वी क,8ब या वर्गांनी यश संपादन केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या सौ. चिप्पा,श्री खुणे यांनी केले.
डेफ अँड ब्लाइंड यांच्या राज्यस्तरीय जुदो स्पर्धेत कर्णबधिर युनिटमधील आपल्या प्रशालेतील अक्षय बोराडे याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे,

शनिवार दि.14/12/24 रोजी प्रशालेत 5वी ते आठवी विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत डॉक्टर प्रशांत विठ्ठल साठे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रस्ताविकातून उपमुख्यध्यापक श्री. गवळे सरांनी विद्यार्थ्यांच्या स्व विकासासाठी प्रशालेच्या प्रयत्नांतर्गत भारतीय ज्ञान परंपरा आणि आपली संस्कृती बद्दल सांगितले. . प्रमुख पाहुणे डॉक्टर साठे सर यांनी भारतीय गणित, मारुती स्तोत्र, पसायदान, रामरक्षा, सूर्यनमस्कार इत्यादीचे महत्व प्रत्यक्ष कृतीतून, संवादा तून विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच स्वबोध म्हणजेच भारतीय संस्कृती समजून घेणे हेही सांगितले. कार्यक्रमाचे आभार माननीय पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका सौ बधे मॅडम यांनी केले.

शांतता एक तास पुणेकर वाचत आहेत ... वाचन उपक्रम
आज बुधवार, दि.11डिसेंबर रोजी म. ए. सो. मुलांचे विद्यालय पुणे येथे दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये एक तास वाचन करून घेण्यात आले. यामध्ये प्रशालेतील पदाधिकारी,विद्यार्थी , शिक्षक, तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रशालेतून विविध पुस्तकांचे वाचनासाठी वाटप करण्यात आले. एक तास सर्वांनी पुस्तकांचे अतिशय शांतपणे आणि व्यवस्थितरित्या वाचन केले. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसोबतच प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे,उपमुख्याध्यापक श्री.चंदू गवळे,पर्यवेक्षिका सौ.रसिका लिमये,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इ. 5 वी ते 10 वी चे सर्व विद्यार्थी यांनी या पुस्तकांचे वाचन करून उपक्रमात सहभाग घेतला.
*क्रीडा महोत्सव उद्घाटन *
आज मंगळवार, दि.10 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. यामध्ये प्रथम क्रीडा ज्योतीचे आगमन झाले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी क्रीडा ज्योतीचे पूजन केले. प्रमुख पाहुणे असलेले श्री.योगेश ताकवले (आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू )प्रशालेचे 2000सालचे माजी विद्यार्थी तसेच श्री अजित जरांडे (आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टिक खेळाडू )1990 सालचे माजी विद्यार्थी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. खेळाडूंसाठी शपथविधी पार पडल्यानंतर प्रशालेचे मा.उपमुख्याध्यापक श्री. चंदू गवळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत क्रीडा शिक्षक प्रतिनिधी श्री अनासपुरे यांनी केले.प्रमुख पाहुण्यांनी प्रशालेच्या विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून खेळाचे महत्व व खेळाविषयी माहिती दिली.यावेळी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री साईसिंग वसावे,उपमुख्याध्यापक श्री.चंदू गवळे, पर्यवेक्षिका सौ.रसिका लिमये स्नेहसंमेलन शिक्षक प्रतिनिधी सौ कचरे,सौ.नांगरे मॅडम, क्रीडा शिक्षक प्रतिनिधी श्री.अनासपुरे सर,शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.श्रीराम पोटे काका उपस्थित होते. सर्वांनी फुगे सोडून उदघाटन केले कार्यक्रमाचे आभार क्रीडा शिक्षक श्री.खुणे यांनी केले. सूत्रसंचालन सौ.शिंदे मंजुश्री यांनी केले. या क्रीडा स्पर्धाची सुरवात नाणे फेकून कबड्डी व खो-खो या सामान्यांनी झाली. कार्यक्रम अतिशय उत्साहात व शिस्तीत पार पडला.
आज दि. 9 डिसेंबर सोमवार रोजी म. ए. सो. मुलांचे विद्यालय पुणे येथे भावे प्राथमिक शाळेतील इयत्ता3 ऱी व ४थी चे 300 विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रशालेत भरवण्यात आलेल्या विज्ञान व गणित प्रदर्शनास भेट दिली.

पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पुणे महानगरपालिका संयुक्त विद्यमाने ड्रॉप रोबॉल या खेळाच्या स्पर्धा आज दिनांक 7 / 12 / 024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येरवडा येथे संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये भावे हायस्कूल मधील 17 वर्षा खालील संघाने व 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवले . या दोन्ही संघाची निवड विभागीय स्तरावरती झालेली आहे. विजय खेळाडूंचे - मागदर्शकांचे - क्रीडाशिक्षकांचे प्रशालेच्या वतीने मा . मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे सर यांनी त्यांचे अभिनंदन केले .
सकाळ स्कूल ऑलिंपिक हॉलीबॉल स्पर्धेमधील आपल्या प्रशालेच्या व्हॉलीबॉल संघाने विद्या प्रतिष्ठान बारामती, व प्रियदर्शनी स्कूल मराठी माध्यम या दोन्ही संघाचा पराभव करून आजचे दोन्ही ही सामने जिंकले त्याबद्दल आपल्या प्रशालेतील सहभागी खेळाडूंचे व क्रीडा मार्गदर्शकांचे प्रशालेतर्फे खूप खूप अभिनंदन उद्याची व्हॉलीबॉल मॅच दुपारी बारा वाजता डेक्कन क्लब या ठिकाणी आहे त्या मॅच साठी प्रशालेतर्फे शुभेच्छा.

आनंददायी शनिवार - चित्रकला स्पर्धा
आज शनिवार, दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत स्नेहसंमेलनानिमित्त आनंददायी शनिवार अंतर्गत साधू वासवानी मिशन आयोजित चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेत इयत्ता 5वी ते10 वीचे 280 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी घेतला .या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री साईसिंग वसावे, उपमुख्याध्यापक श्री चंदू गवळे, पर्यवेक्षिका सौ रसिका लिमये स्नेहसंमेलन शिक्षक प्रतिनिधी सौ.नांगरे मॅडम, क्रीडा शिक्षक प्रतिनिधी श्री.अनासपुरे सर,शिक्षकेतर प्रतिनिधी श्री श्रीराम पोटे काका, चित्रकला विभाग प्रमुख श्री विनोद पारे तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या स्पर्धेतील स्पर्धकांना प्रोत्साहन देत मुलांची सुंदर चित्र पाहिली आणि कौतुकही केले.
आज प्रशालेमध्ये संस्थेचा मानबिंदू असलेल्या व म. ए. सो. कालावर्धिनी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या रंगवेध चित्रकला प्रदर्शनात बक्षीसपात्र व प्रशिस्तीपत्र वाटप करत विद्यार्थ्यांचे कौतुक प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. वसावे व पदाधिकारी यांनी कौतुक केले.
स्नेहसंमेलनानिमित्त गणित विज्ञान प्रदर्शन उद्घाटन सोहळा
दिनांक 6/ 12 /2024 रोजी प्रशालेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमापूजनाने व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
त्यानंतर प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ रसिका लीमये यांनी प्रास्ताविकातून कृतीयुक्त विज्ञान प्रदर्शनाचा हेतू स्पष्ट केला
प्रमुख पाहुण्या श्रीमती पल्लवी गोडसे यांनी छोट्या विज्ञान प्रयोगाद्वारे प्रातिनिधिक स्वरूपात प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यानंतर प्रशालेतील शिक्षिका श्रीमती सुवर्णा काळे व आठवी ब च्या विद्यार्थ्यांनी मिळून 'डोळे उघडून पहा गड्यांनो' हे विज्ञान गीत सादर केले.
प्रमुख पाहुणे श्रीमती गोडसे यांनी विद्यार्थ्यांना गणित व विज्ञानात रस घेऊन आव्हानांना सामोरे जा असा संदेश दिला. शाला समिती अध्यक्ष श्री दिलीप जी शेठ यांनी आपल्या भाषणातून प्रत्यक्ष कृतीद्वारे दोन हात न सोडता गाठ बांधण्याचे प्रात्यक्षिक दाखवून मनोरंजकरीत्या विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी एकूण 140 विज्ञान व गणित प्रकल्प व मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वसावे सर ,त्याचप्रमाणे उप मुख्याध्यापक श्री गवळे सर सर्व स्नेहसंमेलन प्रतिनिधी, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभार श्रीमती पोखरकर यांनी मानले,तर सूत्रसंचालन सौ वामन सीमा या मॅडमनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन
दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी म. ए .सो.मुलांचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पुणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रमुख पाहुण्या श्रीमती गोडसे मॅडम, शाळा समिती अध्यक्ष श्री दिलीपजी शेठ सर ,प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. वसावे सर, उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर, पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली व त्यानंतर प्रशालेतील शिक्षक श्री. गायकवाड बी. एम. यांनी आंबेडकर यांच्या कार्याविषयी विस्तृत माहिती सांगितली.
जागतिक दिव्यांग दिन
आज मंगळवार, दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी म. ए . सो.मुलांचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पुणे, येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने प्रशालेतील दिव्यांग युनिटच्या शिक्षिका श्रीमती आराणके अमृता मॅडम यांनी दिव्यांग दिन का साजरा करावा यामागची कारणे स्पष्ट केली.
प्रशालेत शिकून मोठ्या झालेल्या,व उच्च पदांवर कार्यरत असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती देखील दिली.
त्याचप्रमाणे प्रशालेतील सर्वात पहिले दिव्यांग विद्यार्थी यांनी दिव्यांगांविषयी केलेल्या कवितेचे वाचनही केले व दिव्यांग विद्यार्थ्यांना आपल्याप्रमाणेच समान समजून कायम मदत करण्याचे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले.
या याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री. वसावे सर, उपमुख्याध्यापक माननीय श्री. गवळे सर तसेच पर्यवेक्षिका माननीय सौ.लिमये मॅडम , सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
जागतिक एडस दिन
दि. 2 डिसेंबर, सोमवार, रोजी म. ए. सो.मुलांचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पुणे येथे जागतिक एड्स जनजागृती दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रशालेच्या मा. पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम यांनी विद्यार्थ्यांना एड्स जनजागृती दिन का साजरा करावा,प्रसाराची कारणे इत्यादी सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना रेड रिबन सिम्बॉल चा अर्थ स्पष्ट केला.त्यावेळी प्रशालेचे मा.मुख्याध्यापक श्री वसावे सर,उपमुख्याध्यापक मा. श्री गवळे सर तसेच सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी प्रशालेचे पदाधिकारी व वर्गाचे विद्यार्थी प्रतिनिधी यांना रेड रिबन सिम्बॉल लावण्यात आले व एड्स विषयी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
27 ते 30 नोव्हेंबर 2024 रोजी एस पी कॉलेज मैदानावर सकाळ आयोजित आंतरशालेय स्कूल ऑलिंपिक खो-खो स्पर्धेमध्ये आपल्या म.ए.सो. मुलांचे ( भावे) विद्यालयाने उत्कृष्ट खेळ करून उपविजेते पद मिळवले त्याबद्दल खेळाडू , क्रीडाशिक्षक , क्रीडा मार्गदर्शक, यांचे मा . मुख्याध्यापक श्री साईसिंग वसावे सर - उपमुख्याध्यापक श्री चंद्रकांत गवळे व पर्यवेक्षिका सौ रसिका लिमये मॅडम यांनी प्रशाले तर्फे अभिनंदन केले .
यशवंतराव चव्हाण व ग्रामीण विकास प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यान पुष्प 3 रे
एम.इ. एस. मुलांचे विद्यालय पुणे येथे दि.30नोव्हेंबर शनिवार रोजी विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण विकास प्रशिक्षण संस्थेतर्फे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. माजी विद्यार्थी बेंद्रे सर यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगितलाचिंचोरे सरांनी प्रमुख पाहुणे विश्वास पटवर्धन यांचा परिचय करून दिला.. श्री. विश्वास पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी सुधारा,असे सांगितले. बोलणे, व्यक्त होणे गरजेचे आहेतसेच श्रवण कौशल्य महत्वाचे आहे हे सांगितले .भाषण करण्यास आवश्यक तंत्र सांगितले . . त्याचबरोबर उत्तम वक्ता होण्यासाठी आवश्यक गोष्टी रंजकपणे सांगितल्या.श्री गलांडे यांनी आभार प्रदर्शन केले. उपरोक्त कार्यक्रमास संस्थेचे रमेश बेंद्रे,पद्माकर चिंचोरे, श्री गलांडे, ऍडव्होकेट दौडकर, प्रशालेचे 9वी ,10वी चेविद्यार्थी उपस्थित होते.
दिनांक 30 नोव्हेंबर शनिवार रोजी प्रशालेत इयत्ता 5 वी ते 10 वी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली . यामध्ये मुलांना राष्ट्रीय प्रतीके हा विषय देण्यात आला होता . प्रशालेतील एकूण 85 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आणि विशेष बाब म्हणजे आपल्या शाळेतील कर्णबधिर युनिट च्या 10 मुलांनी देखील या उपक्रमात भाग घेतला आणि मुलांना रांगोळ्या काढण्याचा मनसोक्त आनंद मिळाला . वरील उपक्रमासाठी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सायसिंग उपमुख्याध्यापक श्री. गवळे चंदू आणि पर्यवेक्षिका सौ . लिमये रसिका यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. श्रीम काळे सुवर्णा व श्रीम पोखरकर ज्योती यांनी परीक्षण केले तसेच श्री. हिंगसे किशोर, श्रीम. खाडे राजश्री, सौ. बधे दिपाली, सौ. शिंदे मंजुश्री यांच्या मदतीने उपक्रम संपन्न झाला.
संविधान दिनानिमित्त म. ए. सो. मुलांचे विद्यालय पुणे येथे संविधानावरील घोषवाक्य स्पर्धा घेऊन दि. 30 नोव्हेंबर ( शनिवार ) रोजी प्रभात फेरी कांढण्यात आली.
यामध्ये 106 विद्यार्थी सहभागी होते. मा. मुख्याध्यापक श्री वसावे सर यांच्या प्रेरणेने हा उपक्रम घेण्यात आला.
यशवंतराव चव्हाण व ग्रामीण विकास प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमाला पुष्प 2
दि. 29 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवार रोजी एम.इ. एस. मुलांचे विद्यालय पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण विकास प्रशिक्षण संस्थेतर्फे चला गप्पा मारू या या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. उपमुख्याध्यापक श्री गवळे सर यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगितला. प्रमुख पाहुणे श्री पद्माकर पुंडे यांनी विद्यार्थ्यांना गोष्टीतून वर्तनाचे आवश्यक नियम शिकवले. ज्ञान व माहितीचे आदान-प्रदान महत्त्वाचे असून व्यक्ती वेळ व गोष्ट यांचे महत्त्व समजून स्वतःला स्वीकारा इतरांना स्वीकारा सकारात्मक रहा. इतरांच्या भावनांची मतांची कदर करून समोरच्याचे ऐकायला शिका हा उपदेश केला. त्याचबरोबर उत्तम संवादक होण्यासाठी आवश्यक गोष्टी रंजकपणे सांगितल्या. एडवोकेट श्रीमती दौंडकर यांनी आपल्या आभार प्रदर्शन केले. उपरोक्त कार्यक्रमास संस्थेचे रमेश बेंद्रे,पद्माकर चिंचोरे उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण व ग्रामीण विकास प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यान पुष्प 1 ले
एम.इ. एस. मुलांचे विद्यालय पुणे येथे गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण विकास प्रशिक्षण संस्थेतर्फे योगाचे महत्त्व या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे माजी विद्यार्थी रमेश बेंद्रे यांनी केले व्याख्याते व पाहुण्यांचे स्वागत मा. मुख्याध्यापक वसावे सर यांनी केले श्री पद्माकर चिंचोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले दौंडकर मॅडम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रमुख व्याख्या त्या डॉ. विलीना इनामदार यांनी योगाचे महत्त्व सांगितले तसेच आहार ,विहार, झोप ही पुरेशी असावी मोबाईल इंटरनेटचा योग्य वापर करावा असे त्यांनी सांगितले श्री अँड जगदाळे यांनी आभार मानले प्रशालेचे इयत्ता ९वी चे विद्यार्थी या व्याख्यानाला उपस्थित होते.
दि. 28 नोव्हेंबर (गुरुवार )रोजी इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना जिंकी रे जिंकी हा चित्रपट म. ए. सो. मुलांचे विद्यालय येथे दाखवण्यात आला. चित्रपटाचा विषय खूपच प्रेरणादायी होता. या चित्रपटात कर्णबधिर मुलांच्या माऊंटेनिअरिंगच्या प्रशिक्षणाचे आणि प्रशिक्षणादरम्यान आलेले विविध हृदयस्पर्शी प्रसंग दाखवण्यात आले. आपल्या म.ए.सो. मुलांचे विद्यालय प्रशालेमध्ये अपंग एकात्म शिक्षण योजना राबवली जाते आपल्या प्रशालेतही कर्णबधिर विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे शिकवून त्यांचा विकास केला जातो.
28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यातिथी
दिनांक 28 नोव्हेंबर गुरुवार रोजी प्रशालेत क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची 134 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली . यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वसावे सायसिंग पर्यवेक्षिका सौ. लिमये रसिका यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि 8 वी अ मधील अथर्व गंधुरकर या विद्यार्थ्याने महात्मा फुले यांच्या कार्या बद्दल सर्व 5 वी ते 10 च्या मुलांना माहिती सांगितली .
भारतीय संविधानावर आधारित विश्वरूप नॅशनल ऑलिम्पियाड परीक्षा 2024
आज दिनांक 27 नोव्हेंबर बुधवार रोजी प्रशालेत भारतीय संविधान आधारित विश्वरूप नॅशनल ऑलिम्पियाड परीक्षा 2024घेण्यात आली. त्यावेळी परीक्षेची प्रतिज्ञा घेण्यात आली या परीक्षेसाठी प्रशालेतील एकूण 61 विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षेसाठी मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सायसिंग , उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर, पर्यवेक्षिका सौ. लिमये रसिका या सर्व पदाधिकार्यांनी मार्गदर्शन केले आणि परीक्षेचे सर्व नियोजन श्री वर्मा,सौ. कांबळे ज्योती आणि सौ. चिप्पा वर्षा यांनी केले.

दिनांक 27 नोव्हेंबर 2024 बुधवार रोजी संविधान दिना निमित्त एक छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे सीईओ माननीय श्री सचिन जी कुलकर्णी सर उपस्थित होते .
प्रमुख पाहुणे व प्रशालेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रशालेच्या माननीय पर्यवेक्षिका लिमये मॅडम यांनी केले.
प्रमुख पाहुणे सचिन कुलकर्णी प्रशालेला विवेक विचार मंथन तर्फे प्रशालेला संविधानाची एक प्रत भेट म्हणून दिली . त्यानंतर विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यात संविधानाचे महत्त्व सांगितले.तसेच त्यांनी संविधानाची आवश्यकता का भासली हे सांगून त्यातील सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्ष, समानता ,बंधुता यांचे महत्त्व सांगितले.
सौ शिंदे मॅडम यांनी संविधानाचे वाचन केले त्यांच्या मागून सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी संविधान म्हटले. त्यानंतर पहिल्या तासाला सर्व विद्यार्थ्यांकडून संविधान उद्देशिकेचे लेखन करून घेण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक माननीय श्री गवळे सर ,पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
26 नोव्हेंबर संविधान दिन
म.ए.सो. मुलांच्या विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्तिकी एकादशी निमित्त प्रशालेला सुट्टी असल्याने संविधान दिन गुगल मीट द्वारे ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर,एन सी सीच्या शिक्षिका शिंदे मॅडम श्री खुणे सर व एन सी सी छात्र यांनी प्रशालेत जाऊन हा दिवस साजरा केला. तसेच 26 नोव्हेंबर मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. माननीय मुख्याध्यापक श्री. वसावे सर एन सी सीच्या शिक्षिका सौ शिंदे मॅडम , एन सी सी छात्रांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाच्या प्रतीचे पूजन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री. गवळे सर यांनी केले त्यात त्यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले. संविधानातील प्रत्येक गोष्टीचे महत्त्व,संविधान पूर्ण करण्याचा कालावधी देखील सांगण्यात आला . त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन सौ चौधरी मॅडम यांनी केले त्यांच्या मागून सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी संविधान म्हटले. संविधानाच्या प्रत्येक ओळीचा अर्थ तसेच सार्वभौम ,समाजवादी, धर्मनिरपेक्ष ,लोकशाही, प्रजासत्ताक ,न्याय ,स्वातंत्र्य, समानता व बंधुता या शब्दाचे स्पष्टीकरण सहज सोप्या व सर्वांना कळेल अशा भाषेत केले. प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ लिमये मॅडम यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले . या संविधान दिनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आनंददायी शनिवार अंतर्गत प्रकाशाचे प्रवहन या विषयावर मार्गदर्शन
आज दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी मानसा फाउंडेशन तर्फे श्री. आशिष देसाई यांनी इयत्ता 5वी ते 9च्या विद्यार्थ्यांना प्रकाशाचे प्रवहन या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रकाश ऊर्जा आहे, दिसत नाही पण जाणवते. या प्रकाशाचा उपयोग करून ध्यान धारणा केली असता शरीराला सकारात्मक फायदा होतो. प्रकाशामुळे शांतता जाणवते, आरोग्य सुधारते, स्मरणशक्ती तीक्ष्ण होते.
प्रथम श्री. देसाई सरांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रकाशाचे प्रवहन क्रियेतील चार टप्पे समजावून सांगितले व त्यानंतर विद्यार्थ्यांकडून त्यानुसार क्रिया करून घेतली. प्रकाशाचे प्रवहन ही क्रिया विद्यार्थ्यांना त्यांच्या रोजच्या जीवनात नक्कीच फायदेशीर आहे.
क्रीडा भारतीच्या क्रीडा केंद्राचा उद्घाटन समारंभ
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि क्रीडा भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 22 नोव्हेंबर 2024 रोजी म.ए.सो. मुलांचे (भावे) विद्यालय पुणे ,या ठिकाणी दुसरे क्रीडा केंद्र सुरू करण्यात आले. या क्रीडा केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ सदस्य व क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव यांच्या शुभहस्ते तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे सदस्य व म ए सो मुलांचे विद्यालय या शाळेच्या शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुलांचे भावे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे सर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर मल्लखांब खेळाची प्रात्यक्षिके SVM अकादमी (कृष्णा काळे सहकार नगर) यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केली.
क्रीडा भारतीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष मा विजय पुरंदरे यांनी क्रीडा केंद्र सुरू करण्यामागची भूमिका विशद केली. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी मा. विजय भालेराव यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे शेवटी श्री भाऊसाहेब खुणे सर सहसचिव क्रीडा भारती पुणे महानगर यांनी उपस्थित सदस्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राजपूत यांनी केले. या क्रीडा केंद्रमध्ये मलखांब, क्रिकेट, कबड्डी, आणि बाल क्रीडांगण अशा चार खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. यानंतर क्रिकेट या खेळाच्या क्रीडांगणाचे पूजन करून त्याही खेळाचे क्रीडा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मूल व मुलीना बालपणापासूनच खेळण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून बाल क्रीडांगण चेही उद्घाटन करण्यात आले.
या सर्व उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव श्री सुधीर भोसले, अर्जुन पुरस्कार विजेत्या आणि पुणे महानगराच्या व पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या उपाध्यक्ष श्रीमती शकुंतला खटावकर, क्रीडा भारतीचे अध्यक्ष शैलेश आपटे, क्रीडा भारतीचे पुणे महानगराचे मंत्री आणि अखिल भारतीय कार्यालयीन प्रमुख श्री. विजय रजपूत, श्री. हरीश अनगोळकर, अनुजा दाभाडे, मलखांब खेळातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री.सत्यजित शिंदे,उप मुख्याध्यापक श्री चंद्रकांत गवळे पर्यवेक्षिका सौ रसिका लिमये मॅडम,प्रशालेतील सर्व शिक्षक - शिक्षकेतर वृंद आणि क्रीडा भारतीचे इतर सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा 164 वा वर्धापन दिन म.ए. सो. मुलांचे विद्यालय पुणे येथे सकाळी 8 वाजता साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लक्ष्मणराव इंदापूरकर आणि वामनराव भावे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या आणि आपले मनोगत व्यक्त केले. प्रशालेचे
शिक्षक श्री. हिंगसे सर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली. प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री. आनंद सराफ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रशालेचे अनेक माजी विद्यार्थी, हितचिंतक, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Infosys science lab
दिनांक 18 नोव्हेंबर 20 24 सोमवार रोजी प्रशालेत फिरती प्रयोगशाळा आणण्यात आली होती .विदयार्थ्यांना विज्ञान विषयात गोडी निर्माण व्हावी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा , नवीन प्रकल्प करण्यासाठी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने फिरती प्रयोगशाळेचे आयोजन करण्यात आले . मा. श्री. बोबडे सर यांनी आपल्या इयत्ता 10 वी अ आणि 8 वी अ वर्गातील एकूण 85 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी कन्व्हर्जन ऑफ एनर्जी या मुद्द्यावर आधारित प्रकल्प दाखवून माहिती सांगितली आणि विद्यार्थ्यांकडून प्रकल्प करून घेतले. शेवटी मुलांची एक चाचणी परीक्षा घेण्यात आली या सर्व मार्गदर्शनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला . आजच्या या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर , उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर , पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम या सर्वांचे मार्गदर्शन लाभले . विद्यार्थ्यांना यामधून नवीन काहीतरी शिकता आले .
आज दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रविवार रोजी प्रशालेतील NCC एअर विंग च्या मुलांनी मतदान जनजागृती केली यामध्ये त्यांनी आपल्या पालकांना आणि सर्वांना मतदान करा याबद्दल आवाहन केले . आज पालकांचा देखील मतदान जनजागृती मध्ये सहभाग घेण्यात आला पालकांनी देखील मतदान हा माझा हक्क आहे आणि तो मी नक्की बजावणार अशी ग्वाही दिली . पालक व मुलांना ANO मंजुश्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले .
बालदिन
आज दिनांक 14 नोव्हेंबर 2024 गुरुवार रोजी प्रशालेत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली . यावेळी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर , उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर , पर्यवेक्षिका सौ. लिमये मॅडम विदयार्थी प्रतिनिधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन केले . इयत्ता 8 वी अ मधील जय जोशी या विद्यार्थ्यांने पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली आणि मा. मुख्याध्यापक वसावे सर यांनी बालदिन निमित्ताने सर्व मुलांना संदेश दिला .
पुण्यातल्या मलांच्या भावे शाळेने जमा केलेले एक मुठ धान्य आणि सेवावर्धिनींनी दिलेलं भाऊबीज किट शिवसेवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज लोणावळ्यात रेल्वे स्टेशन जवळील आपले कार्यकर्ते श्री जी पी यादव यांच्या घरी नागनाथ, ठाकूरवाडी, पाटण, कुसगाव आणि मळवली येथील आदिवासी जनजाती कुटुंबांना सुपूर्त केले. साधारणतः सव्वाशे कुटुंबांना या दिपावली कीटचा लाभ झाला. या किटमध्ये अंदाजे पाच किलो तांदूळ, चार किलो गहू, ज्वारी, बाजरी, एक किलो तेल, एक साडी, आणि दिवाळीचा काही फराळ असे एकत्रित देण्यात आलं.
दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी भावे हायस्कूलच्या प्रांगणात आकाश कंदील बनवणे कार्यशाळा संपन्न झाली. माननीय मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे सरांच्या कल्पनेतून पर्यावरण पूरक आकाश कंदील कंदील साकारण्यात आलेल्या या कार्यशाळे ची सुरुवात उपमुख्याध्यापक श्री चंद्रकांत गवळे यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाने झाली.विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी कागद, कार्डशिट पेपर, यांच्या सहाय्याने आकाश कंदील बनवले. पर्यवेक्षिका रसिका लिमये यांनी देखील कार्यशाळेस मार्गदर्शन दिले. चित्रकला शिक्षक श्री मस्के सर यांनी ही कार्यशाळा संयोजित केली. कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी व त्यांचे वर्गशिक्षक उपस्थित होते. दीपावलीच्या या पूर्वतयारीच्या कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाश कंदील लावून शाळेची सजावट करण्यात आली. या कार्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणखी तयार केलेले आकाश कंदील आपल्या घरात लावण्याचा संदेश विद्यार्थ्यांना याप्रसंगी देण्यात आला.
म. ए. सो.मुलांचे विद्यालय येथे वाचन प्रेरणा दिन कल्पकतेने साजरा
दिनांक 15 ऑक्टोबर 2024 मंगळवारी प्रशालेच्या क्रीडांगणावर सरस्वती वंदना व डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.
मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाने क्रीडांगणावर महावाचन व पुस्तक यांच्या आकृतीच्या रचनेत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली. प्रास्ताविकातून प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री गवळे सरांनी इंटरनेटच्या युगात वाचन मागे पडू न देण्यासाठी तसेच कलाम जयंती निमित्त ज्ञानग्रहणासाठी वाचन करणे महत्त्वाचे आहे असे सांगून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. प्रशालेच्या शिक्षिका सौ दिपाली बधे यांनी मा. राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांची माहिती सांगितली. त्यानंतर ग्रंथपाल गायत्री जवळगीकर यांनी वाचन शपथ दिली. प्रशालेतील विद्यार्थ्यांना वाचनासाठी 550 पुस्तके भेट म्हणून दिली. 1977 च्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने प्रशालेस दहा पुस्तकांचा संच भेट म्हणून दिला. विद्यार्थ्यांचे वाचन अधिकाधिक वाढावे यासाठी मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे यांनी वर्षभरात जास्तीत जास्त पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यास 1001 रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. यानंतर मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे उपमुख्याध्यापक श्री चंदू गवळे पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या पुस्तकांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका सौ दिपाली बधे यांनी केले.
म.ए.सो.मुलांचे विद्यालय अर्थात भावे हायस्कूल येथे एक मुष्टी धान्य समर्पण सोहळा साजरा.
दिनांक 14 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी प्रशालेच्या प्रांगणात सरस्वती पूजनाने सोहळ्यास सुरुवात झाली. प्रास्ताविकातून मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे यांनी समर्पण सोहळ्यानिमित्त होणारा सामाजिक जाणिवेचा संस्कार महत्त्वाचा असून गरिबांची दिवाळी चांगली व्हावी हा हेतू स्पष्ट केला. याप्रसंगी शिवसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी आपल्या संस्थेचा स्थापना हेतू सांगून गरजूंपर्यंत हे धान्य पोहोचवण्यासाठी करीत असलेले प्रयत्न सांगितले. यानंतर प्रशालेचे शाळा समितीचे अध्यक्ष श्री दिलीप शेठ व मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे तसेच पदाधिकारी यांचे हस्ते नऊ पोती तांदूळ चार पोती गहू दोन पोती ज्वारी एक पोतं बाजरी व शालेय कर्मचाऱ्यांच्या वतीने 130 किलो खाद्यतेल शिवसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कार्यकर्ते यांना प्रशालेच्या वतीने देण्यात आले. सदरहू धान्य प्रशालेच्या पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी जमा केले होते. प्रमुख पाहुणे एन डी पाटील यांनी आपल्या मनोगतातून दा तृत्वाचे महत्त्व सांगितले. देण्याची वृत्ती जपणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुकही केले. त्यांनी सर्वांनी आपल्या संस्कृतीचे जतन करताना समाजाचाही विचार करावा असा संदेश दिला. दुसरे प्रमुख पाहुणे श्री पराग समुद्र यांनी आपल्या मनोगतातून सतपात्रिदानाचे महत्त्व सांगून एक मुष्टी धान्य सोहळ्याचे कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतातून शाळा समिती अध्यक्ष श्री दिलीप शेठ यांनी दान केल्याने चांगले परिणाम फळ मिळते असे सांगितले. यानंतर प्रशालेच्या शिक्षिका सौ दिपाली बधे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन सौ मंजुश्री शिंदे यांनी केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक श्री चंदू गवळे,पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये सर्व शिक्षक वर्ग व पाचवी ते दहावीचा विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी क्रीडा भारती आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मल्लखांबाचे क्रीडा केंद्र पेरुगेट भावे स्कूलच्या प्रांगणामध्ये सुरू करण्यात आले. क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री श्री राजजी चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पेरुगेट भावे स्कूलचे मुख्याध्यापक श्री वसावे सर, क्रीडा भारती प्रांत अध्यक्ष श्री विजयराव पुरंदरे, क्रीडा भारती पुणे महानगर अध्यक्ष श्री शैलेश आपटे तसेच महानगर मंत्री श्री विजय राजपूत उपस्थित होते. या क्रीडा केंद्रास मल्लखांब पटू श्री सत्यजित शिंदे आणि श्री अनिल उत्पात यांचे मार्गदर्शन लाभणार आहे..
आज ११ ऑक्टोबर २०२४ खंडेनवमी निमित्त प्रशालेतील ग्रंथालयात मा.मुख्याध्यापक ,पदाधिकारी,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सरस्वती व ग्रंथपुजन केले.प्रसंगी 12वी क मधील चि. प्रज्वल कुचेकर या विद्यार्थ्याने उत्तम असे संबळ वाजवले महिलांनी गोंधळ व जोगवा म्हणून पूजन केले. तसेच संगणक विभागात मा. मुख्याध्यापकांच्या हस्ते संगणक पूजन करण्यात आले.
आज १० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशालेमध्ये शासनाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी प्रशालाचे मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे सर यांच्या उपस्थितीत व आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय जाधव व त्यांच्या टीम यांच्याकडून मुलांची आरोग्य तपासणी करताना मुलांच्या आरोग्य विषयी तपासणी बरोबर आरोग्याची काळजी कशी घ्यावी या संदर्भात देखील मार्गदर्शन करण्यात आले.
दिनांक 30 सप्टेंबर 2024 सोमवार रोजी स्वच्छता ही सेवा अंतर्गत म.ए.सो. मुलांचे विद्यालयात एक पेड माँ के नाम हा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये NCC एअर विंग च्या कडेट्स नी स्वतःच्या आई साठी म्हणून एक झाड शाळेला भेट दिले आणि समाज जागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली त्यामध्ये एक पेड माँ के नाम , स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता आशा घोषणा देण्यात आल्या. या रॅली मध्ये प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सायसिंग , क्रीडा शिक्षक श्री. खुणे सर, ANO मंजुश्री शिंदे उपस्थित होते .
आज दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी प्रशालेत आनंददायी शनिवार अंतर्गत रिव्हाइव्ह हार्ड फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना ‘सी पी आर चे ट्रेनिंग’ देण्यात आले. यामध्ये सीपीआर म्हणजे काय? ते कोणाला द्यायचे, त्याची आवश्यकता केव्हा असते, ते कशाप्रकारे द्यायचे, याचे ट्रेनिंग व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यासाठी पीपीटी व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचा उपयोग करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून सुद्धा हे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. ही माहिती देण्यासाठी रोटरीयन श्रीमती कमल कोनलाडे,श्री कौशिक कोनलाडे उपस्थित होते. रोटरी क्लब तर्फे डॉ.शेठ रिवाईव्ह हार्ड फाउंडेशनचे डॉक्टर ‘सीपीआर’मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी प्रशालेचे मा.मुख्याध्यापक श्री वसावे सर व मा. उपमुख्याध्यापक श्री गवळे सर उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय रोटरी क्लबच्या कोऑर्डिनेटर सौ बधे मॅडम यांनी परिचय करून दिला.
जिल्हा क्रीडा परिषद आयोजित जिल्हास्तरीय टेनीक्वाईट स्पर्धा महाराष्ट्र मंडळ येथे संपन्न झाल्या त्यामध्ये आपल्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली .
19 वर्ष वयोगटांमध्ये = द्वितीय क्रमांक
14 वर्षे = वयोगटांमध्ये तिसरा .
क्रमांक 17 वर्षाखालील वयोगटांमध्ये =चौथा क्रमांक मिळवला .त्याबद्दल सर्व सहभागी खेळाडूंचे व क्रीडा मार्गदर्श कांचे प्रशालेतर्फे खूप खूप अभिनंदन .
14 वर्ष वयोगट अंतर्गत शासकीय जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धा खाशाबा जाधव क्रीडा निकेतन मैदानावर स्पर्धा चालू होत्या.एकूण 260 संघ सहभागी होते.त्यात आपल्या शाळेचा संघाने उत्कृष्ट कामगिरी करून 3 रा क्रमांक मिळविला.सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे, मार्गदर्शकांचे (कोच) यांचे हार्दिक अभिनंदन .

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे 6 ऑगस्ट 2024 रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची अभिक्षमता मापन चाचणी ( Aptitude Test ) घेण्यात आली होती त्या चाचणीचे अहवाल 21 सप्टेंबर 2024 रोजी पालक व विद्यार्थी यांना देण्यात आले विद्यार्थ्यांच्या क्षमता नुसार तज्ञांकडून योग्य करिअर मार्गदर्शन करण्यात आले. अभिक्षमता मापन चाचणीच्या मार्गदर्शनाच्या वेळी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. वसावे सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यासाठी केंद्राचे समुपदेशक शोभा कुलकर्णी मॅडम, स्मिता लोकरे मॅडम, गायत्री वाणी मॅडम व केंद्राचे समुपदेशक व केंद्रप्रमुख श्री. सागर गायकवाड सर यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
आनंददायी शनिवार अंतर्गत आज कर्णबधिर यूनिट च्या 5 ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना केळकर संग्रहालय दाखवण्यात आले.या संग्रहालयात जुनी स्वयंपाकाची साधने,जुने दागिने, कपड्यांचे विविध प्रकार,ऐतिहासिक काळातील हत्यारे, देवतांच्या मूर्ती, जुनी सौंदर्यप्रसादानाची साधने,जुनी कपाटे,विविध आरसे अशा विविध वस्तू दाखवण्यात आल्या.
आज दिनांक 21 सप्टेंबर 2024 शनिवारी रोजी NCC एअर विंग च्या कडेट्स ची एव्हीएशन गॅलरी येथे क्षेत्रभेट देण्यात आली यावेळी NCC चे 40 कडेट्स , श्री. बाजारे सर ,सौ. मंजुश्री शिंदे मॅडम उपस्थित होते. एव्हीएशन गॅलरी मध्ये मुलांना सर्व विमानाची माहिती सांगण्यात आली तसेच विमानाचा सर्व इतिहास सांगण्यात आला पुढे विमानात काय बदल होणार आहेत याची देखिल कल्पना मुलांना देण्यात आली. ही सर्व माहिती ओंकार माने सर आणि ओम माने सर यांनी दिली. वरील सर्व माहिती मुळे आपल्या मुलांच्या ज्ञानात अजून भर पडली याचा फायदा मुलांना नक्की होईल . या क्षेत्रभेटीसाठी मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर यांनी मार्गदर्शन केले .

आनंददायी शनिवार अंतर्गत दि. 21 /9/ 2024 रोजी इ. 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिसला भेट दिली. तेथे कामकाज कसे चालते याविषयी माहिती देण्यात आली. पत्र व्यवहार कसा करतात , पत्रावर पिनकोड टाकणे किती महत्त्वाचे आहे तसेच इतर कामकाज इ. ची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी सौ धानवले मॅडम श्री मस्के सर व सौ गायकवाड सविता मॅडम उपस्थित होते.
आनंददायी शनिवार अंतर्गत दि. 21 /9/ 20 24 रोजी इ.7वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी जनता सहकारी बँक, बाजीराव रोड ला क्षेत्रभेट दिली. विद्यार्थ्यांना बँकेविषयी माहिती सांगण्यात आली. यामध्ये नवीन खाते कसे उघडायचे, त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात, बँकेत पैसे भरण्यासाठी व काढण्यासाठी लागणारी स्लिप, मुदत ठेव(FD),लोन, एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेक बुक, बँकेच्या विद्यार्थ्यांसाठीच्या नवीन योजना इत्यादी विषयी माहिती देण्यात आली. यावेळी इयत्ता 7वीचे एकूण 55 विद्यार्थी व सौ नांगरे मॅडम सौ सातपुते मॅडम व सौ राऊत मॅडम उपस्थित होते.
आनंददायी शनिवार अंतर्गत दि. 21 /9/ 2024 रोजी इ. 6 वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पुणे भाजी मंडई येथे भेट दिली. तेथे भाजी विक्रेते जो व्यवसाय करतात उदा.विविध प्रकारच्या भाज्या,फळे, इत्यादींविषयी माहिती देण्यात आली. भाज्यांचे दर विद्यार्थ्यांना समजले. या क्षेत्रभेटी विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्य विकसित व्हावे यासाठी त्यांनी स्वतः भाज्यांची खरेदी केली. त्यानंतर मंडईतील 'शारदा गणपती मंडळ' येथे सुद्धा भेट देण्यात आली. येथील मंदिराला प्राचीन इतिहास असल्यामुळे मंदिरातील गुरुजींनी त्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वास्तू जतन व संवर्धनाचा संदेश मिळाला.
आज शनिवार दि.21/09/2024 रोजी आनंददायी शनिवार अंतर्गत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी फडके वाडा या ठिकाणी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. फडके वाडा या ठिकाणी गेल्यानंतर इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना भावे हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री.अभिजित जोशी यांनी फडके वाडा येथील इतिहास व श्री.नृसिंह मंदिराचे महात्म्य सांगितले. श्री.जोशी यांनी विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप केले. व त्यांनी श्रीफळ देऊन गुरुजनांचा सत्कार केला. यावेळी 5वी चे सर्व विद्यार्थी, श्री कदम सर, श्रीमती खाडे मॅडम व सौ चिप्पा उपस्थित होते.
म. ए सो. मुलांचे विद्यालय ( भावे हायस्कूल ) येथे हिंदी दिवस उत्साहाने साजरा
दिनांक 14 सप्टेंबर 2024 शनिवारी सकाळी ठीक आठ वाजता हिंदी दिन कार्यक्रमास सरस्वती पूजनाने सुरुवात झाली . उपमुख्याध्यापक श्री चंदू गवळे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांची निर्माण के पावनयुगमे ही कविता सादर केली.
मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे यांनी प्रास्ताविकातून हिंदी दिन कार्यक्रमाचे प्रयोजन सांगितले. प्रशालेत मराठी समसपुर्त स्पर्धा हिंदी निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यातील विजेत्या विद्यार्थ्यांची यादी वाचन प्रशालेतील शिक्षिका चौकटे यांनी केले. प्रमुख पाहुणे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री धोत्रे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन पाचवी ते दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. याच समारंभात जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरणही झाले त्यात 200 शालेय संघांमध्ये प्रशालेस चौथ्या क्रमांकाचे विजय चिन्ह अर्थात चषक प्राप्त झाल्या त्या कबड्डी संघाचा सत्कार चषक घेऊन करण्यात आला. तसेच अक्षय बोराडे या जिल्हास्तरावर जुदो खेळात सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देखील प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्राध्यापक धोत्रे यांनी आपल्या मनोगतातून हिंदी भाषेचे महत्त्व सांगून हिंदी दिन कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले तसेच पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुकही केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका सौ सातपुते यांनी केले कार्यक्रमास प्रशालेचे विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होते.
दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी प्रशालेत गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले... प्रशालेत अथर्वशीर्ष पठण घेण्यात आले. गणपती बाप्पाची महापूजा करण्यात आली. मोठ्या आनंदात फेरी काढून गणरायाचे विसर्जन करण्यात आले. श्री गणरायाच्या विसर्जनासाठी आपल्या प्रशालेच्या शाला समिती अध्यक्ष श्री. सेठ सर, मा. मुख्याध्यापक श्री. वसावे सर, उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर , पर्यवेक्षिका सौ. शिंदे मॅडम, सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या...!!!
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय 14 वर्ष वयोगटाच्या कबड्डी स्पर्धा बुधवार 11 सप्टेंबर यादिवशी सुरु झाल्या या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेच्या संघाने चांगला खेळ करून सलग 5 शाळांच्या संघाचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला त्याबद्दल या विद्यार्थ्यांचे प्रशाळेतर्फे अभिनंदन व पुढील स्पर्धेच्या राउंड साठी शुभेच्छा .
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे इयत्ता पाचवी ते सातवीच्या पालक सभेमध्ये सर्व पालकांसाठी मोबाईल एडिक्शन इंटरनेट एडिक्शन सोशल मीडिया एडिक्शन या विषयावरती एक तासाचे सत्र घेण्यात आले. व्यक्तिमत्व विकास केंद्राचे समुपदेशक श्री. सागर गायकवाड सर यांनी हे सत्र घेतले. सत्रा मध्ये व्यसनांचे प्रकार कोणकोणते आहेत हे सांगण्यात आले. व्यसनाची परिभाषा सांगण्यात आली. टेक्नॉलॉजी उपयोगी की धोकादायक याच्यावरती प्रश्न विचारण्यात आले व उत्तरे देण्यात आली. तसेच टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे मेंदूचा कितपत वापर होतो . या सर्व एडिक्शन मुळे व्यक्तीच्या जीवनावर पर्सनल लाईफ वर सोशल लाइफ वर सायकॉलॉजिकल काय परिणाम होतात याची माहिती देण्यात आली विविध उदाहरणे, गोष्टी,PPT, SHORT FILMS च्या माध्यमातून पालकांना माहिती सांगण्यात आले. इंटरनेट एडिक्शन व टेक्नॉलॉजीचा मुलांवर होणारा दुष्परिणाम रोखण्यासाठी पालकांनी घ्यावयाची काळजी पालकांनी स्वतःमध्ये कोणकोणते बदल करणे अपेक्षित आहे. मुलांना योग्य सवयी लावणे व मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालकांची भूमिका याची माहिती इयत्ता पाचवी ते सातवीच्या सर्व पालकांना देण्यात आली.
29 ऑगस्ट 2024 गुरुवारी म.ए.सो.मुलांचे विदयालय, पुणे -30 (भावे हायस्कूल,पेरुगेट) प्रशालेत मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला. यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी मेजर श्री. अरुण फाटक सर यांनी प्रशालेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.वसावे सर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ.सातपुते मॅडम यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी. एम. गायकवाड सर यांनी केले. यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री.गवळे सर उपस्थित होते. श्री.अनासपुरे सर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या बद्दल माहिती सांगितली.
व्यक्तिमत्व विकास केंद्र तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इयत्ता पाचवीच्या सर्व मुलांसाठी चांगला स्पर्श व वाईट स्पर्श ( GOOD TOUCH AND BAD TOUCH ) हे सत्र घेण्यात आले सत्राचे उद्दिष्ट - विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण होण्यापासून सावध करणे, चांगला स्पर्श व वाईट स्पर्श विषय जागरूकता निर्माण करणे, स्वतःचा स्वतः बचाव कसे करावे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देणे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी
दिनांक 24-8-2024 शनिवार रोजी म.ए.सो. मुलांचे विद्यालयामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालीचे उप मुख्याध्यापक माननीय श्री गवळे सर यांनी केले गोपाळ कृष्णाच्या विविध लीलांचे व कृष्णजन्माष्टमीला काला का करतात त्याचे महत्त्व सांगितले दहीहंडीच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी प्रशालेचे माजी शिक्षक माननीय श्री लोखंडे सर उपस्थित होते सरांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व सांगितले राधा कृष्ण व बलराम यांच्या वेशभूषेत आलेले विद्यार्थी व इतर मुलांनी दहीहंडी फोडली या कार्यक्रमासाठी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर परिवेक्षिका सौ शिंदे मॅडम शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार सौ सातपुते मॅडम यांनी केले.
महाराष्ट्राचा पारंपारिक सण रक्षाबंधन भावे हायस्कूलमध्ये उत्साहात साजरा. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री बी.एम. गायकवाड सर यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व व माहिती सांगितली. यावेळी प्रशालेतील मुख्याध्यापक माननीय श्री वसावे सर व उपमुख्याध्यापक श्री. गवळे सर व पर्यवेक्षिका माननीय सौ. विद्या शिंदे मॅडम यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. सातपुते मॅडम यांनी केले.
✅ विद्यार्थ्यांकडून राखी तयार करून घेण्यात आली. याला मार्गदर्शन केले प्रशालेतील शिक्षक श्री. मस्के सर यांनी..
✅विद्यार्थ्यांनी प्रशालेतील वृक्षांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचे वचन दिले.
✅विद्यार्थ्यांनी प्रशालेतील शिक्षक, सेवक, सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक यांनाही सामाजिक बांधिलकी जपत राखी बांधण्यात आली.
✅प्रशालेतील विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याचे काम करणारे बस-रिक्षा-व्हेन चालक यांनाही राखी बांधण्यात आली.
✅रेणुका स्वरूप मधील विद्यार्थिनींनी भावे प्रशालेतील विद्यार्थ्यांना राखी बांधण्यात आली.
दिनांक 15 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी मुलांचे भावे हायस्कूल मध्ये भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर श्री विनोद चिप्पा तसेच प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ शिंदे मॅडम व ग्रंथपाल श्रीमती जवळगीकर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला राष्ट्रीय सलामी देण्यात आले त्यानंतर श्रीमती काळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवी ब च्या विद्यार्थ्यांनी ध्वजगीत सादर केले एनसीसीच्या छात्रांनी प्रमुख पाहुणांना मानवंदना दिले प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले अपरिचित भारतीय क्रांतिकारक या हस्तलिखिताचे प्रकाशन झाले तसेच आज वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर श्री विनोद चिप्पा यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन स्वतःसाठी न जगता देशासाठी जगताआलं पाहिजे आपलं जीवन देशासाठी व समाजासाठी अर्पण केले पाहिजे. शाळांनी दिलेले संस्कार लक्षात ठेवले पाहिजे असे ते म्हणाले शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री दिलीपजी सेठ सर यांनी सर्वांना संदेश दिला राष्ट्रध्वजाला अभिवादन करून मातृभूमीसाठी बलिदान दिलेल्या स्मरण केले पाहिजे .देशाच्या हितासाठी व प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे महामात्र माननीय श्री सुधीरजी गाडे सर माननीय मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे सर ,माननीय उपमुख्याध्यापक श्री गवळे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजी-माजी विद्यार्थी पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अनासपुरे सर यांनी केले.
प्रशालेत नागपंचमीनिमित्त पारंपरिक मंगळागौरीचे खेळ संपन्न.
दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी प्रशालेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनसमोर आपल्या संस्कृतीचे पारंपारिक मंगळागौरीचे खेळ खेळून दाखवण्यात आले. प्रास्ताविकातून पर्यवेक्षिका विद्या शिंदे यांनी पारंपारिक सणांचे महत्त्व विशद करून कार्यक्रमाचे प्रयोजन सांगितले. नंतर माननीय मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे पर्यवेक्षिका विद्या शिंदे यांच्या हस्ते नागदेवतेचे पूजन करण्यात आले त्याचबरोबर जीवती पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रशालेच्या शिक्षिका श्रीमती सुवर्णा काळे यांनी आपल्या भारतीय जीवनातील सणासमारंभाचे महत्त्व सांगितले संवादिनी ग्रुपच्या महिला व प्रशालेतील काही शिक्षिका यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.उत्साहाने साजरा झालेल्या या समारंभाचे सूत्रसंचालन प्रशाळेच्या शिक्षिका सौ. सातपुते यांनी केले.
[18:46, 12/08/2024] 🥰 Sushma Bora 🥰:म. ए. सो. मुलांचे विद्यालय येथे सैनिक बांधवांसाठी राखी प्रदान सोहळा संपन्न.
दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी प्रशालेच्या प्रांगणात सैनिक बांधवांसाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या राखी भेटकार्ड व चित्र प्रदान सोहळा व शिक्षण विवेक अंकाचा वर्धापन सोहळा साजरा करण्यात आला. प्रास्ताविकातून माननीय मुख्यध्यापक श्री वसावे सायसिंग यांनी आपल्या सणसमारंभात सैनिकांसाठी असणारी कृतज्ञ आठवण व्यक्त करून कार्यक्रमाचे प्रयोजन सांगितले. त्यानंतर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पत्रकार माजी विद्यार्थी श्री. आनंद सराफ यांनी सैनिकी जीवनाचा खडतरपणा सांगून आपण आपल्या कृतज्ञ भावना राखीच्या माध्यमातून व्यक्त करीत आहोत असे सांगितले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एअर व्हाईस मार्शल श्री.रवींद्र दत्तात्रय लिमये, माननीय मुख्याध्यापक श्री.वसावे सायसिंग उपमुख्याध्यापक श्री चंदू गवळे,पर्यवेक्षिका शिंदे,प्रशालेचे माजी विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते श्री आनंद सराफ यांच्या हस्ते शिक्षण विवेक च्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त ऑगस्ट 2024 च्या अंकाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी शिक्षण विवेकच्या शालेय प्रतिनिधी सौ. चौकटे यांनी शिक्षण विवेक अंकाचे महत्व थोडक्यात विशद केले. शिक्षण विवेक तर्फे आयोजित काव्यवाचन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या पाचवी ते सातवीच्या गटातील विद्यार्थ्यांचे यादी वाचन श्रीमती खाडे राजश्री यांनी केले.त्यात प्रज्ञान कळमकर (६ अ ), समर्थ माचुत्रे (७ अ ), ओम जोशी(७ अ )यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मनोगतातून प्रमुख पाहुणे रवींद्र लिमये यांनी आपला इतिहास उज्वल असून त्याबद्दल अभिमान बाळगण्यास सांगितले तसेच प्रशालेचा माजी विद्यार्थी म्हणून अभिमान व्यक्त करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली खेळाद्वारे शरीर तंदुरुस्त ठेवून शिवरायांसारखे व्हा असा उपदेश त्यांनी केला त्यानंतर प्रशालेत गेली अकरा वर्षे राखी प्रधान सोहळ्याचे संयोजन करणारे कलाशिक्षक श्री पारे विनोद यांच्या मार्गदर्शनातून जमा करण्यात आलेल्या राख्या, चित्रे,भेटकार्डे,प्रदान सोहळा संपन्न झाला. प्रशालेतर्फे सतराशे राख्या 442 भेटकार्डे व 59 चित्रे प्रदान करण्यात आली उत्साहात सुरू झालेल्या या सोहळ्यास पाचवी ते दहावीचे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन विनोद पारे या कलाशिक्षकांनी केले.
पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ.प्रभाताई अत्रे यांच्या नव्वदी पूर्ती प्रीत्यर्थ सुरू झालेली 'अमृतप्रभा समूहगीत गायन स्पर्धा'दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी मध्ये शुक्रवार दिनांक ९ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाली .आपल्या प्रशालेतील गट क्रमांक दोन इयत्ता ८ वी ते १०वी व गट क्रमांक तीन इयत्ता ११वी व १२वी च्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला, त्यामध्ये गट क्रमांक ८ वी ते १० वी मध्ये विद्यार्थ्यांनी 'सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू' ही प्रार्थना सादर केली तर ज्युनिअर कॉलेजच्या गटाने 'हम करे राष्ट्र आराधन' हे गीत सादर केले व आपला सहभाग नोंदवला. त्यांना मार्गदर्शन श्रीमती. सुवर्णा काळे मॅडम ,सौ.सुप्रिया कचरे मॅडम व श्री .पवनकुमार वर्मा सर यांनी केले.
आजकालच्या स्पर्धात्मक जगात वावरण्यासाठी विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शनाची अतिशय गरज असते, ही गरज समजून घेऊन विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या क्षमता जाणून घेण्यासाठी म. ए. सो. मुलांचे विद्यालयातील व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे, केंद्राचे प्रमुख श्री. सागर गायकवाड सरांनी ६ ऑगस्ट २०२४ रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची अभिक्षमता मापन चाचणी ( Aptitude Test ) घेतली.
आज दिनांक 29 जुलै वार सोमवार रोजी प्रशालेत कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल बी एल भारगव सर व मेजर निंबाळकर सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री वसावे सर यांनी केले. या कार्यक्रमांतर्गतच महिला सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या दामिनी पथकातील महिला पोलिसांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी सिव्हिल लाईन कडे वळावे व तेथील अडचणी दूर कराव्यात अशा प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले.
दामिनी पथकातील हिंगे मॅडम यांनी बोलताना प्रत्येक विद्यार्थ्याने सैनिक व्हायलाच पाहिजे असे नाही परंतु आपल्याला जमेल तशी समोरच्या व्यक्तीची सुरक्षा मात्र करता आली पाहिजे असा मोलाचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांना सैनिकी रिहॅबिलिटेशन सेंटर खडकी ठिकाणाची चित्रफित. दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर यांनी केले.
पाहुण्यांच्या परिचयाची व सूत्रसंचालनाची सूत्रे सौ जोशी कल्याणी यांनी स्वीकारले.
सदर कार्यक्रमासाठी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. वसावे सर, उप मुख्याध्यापक श्री.गवळी सर, पर्यवेक्षिका सौ. शिंदे मॅडम , माजी विद्यार्थी श्री गुजराती सर ,सराफ सर,श्री. शहा सर माजी विद्यार्थी कार्यवाहीका श्रीमती जवळगीकर मॅडम, एनसीसी विभाग प्रमुख सौ. मंजुश्री देशमुख मॅडम आणि प्रशालेतील एनसीसी चे विद्यार्थी तसेच जुनियर कॉलेज विभागातील सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.
दिनांक २१ जुलै २०२४ रोजी येणाऱ्या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दिनांक २० जुलै २०२४ शनिवार रोजी भावे हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री सायसिंग वसावे सरांनी करून गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. गुरु त्यांच्या शिष्यांना आपल्या जवळ असलेल्या विचारातून व ज्ञानातून हुशार बनवून यशस्वी व आनंदी जीवन जगण्याचा कानमंत्र देतात हे सांगून कृतज्ञता अभियानाबाबत माहिती देऊन सर्व माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, हितचिंतक, व पालक यांना सदर अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी सर्व माजी शिक्षकांचा गुलाब पुष्प श्रीफळ व भेटवस्तू देऊन गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या सर्व शिक्षकांचा आशीर्वाद घेतला. माजी शिक्षिका स्वाती भावे मॅडम यांनी विद्यार्थ्यांसमोर आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात त्याचप्रमाणे शिक्षक पण घडत असतो. धडपडणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शाळा व संस्थान नेहमीच प्रोत्साहन देते असे त्या म्हणाल्या. प्रशालेचे शाला समिती अध्यक्ष व माजी विद्यार्थी असणारे माननीय श्री दिलीपजी शेठ सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गुरु शिष्यांची गोष्ट सांगून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली. गुरूंच्या सांगण्याला प्रमाण मानून अभ्यास केला पाहिजे, गुरूंच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे असे त्यांनी सांगितले व त्यानंतर त्यांनी एक हजार रुपये रोख देऊन अभियानाचे उद्घाटन केले. तसेच त्यांनी एक लाख रुपये कृतज्ञता निधी म्हणून देण्याचे घोषित केले. यानंतर वय वर्ष 92 असलेले माजी शिक्षक माननीय श्री पानसरे सरांनी विद्यार्थ्यांना कोणताही एक छंद जोपासायला पाहिजे त्यामुळे आपले मन आनंदित व प्रफुल्लित राहते असे सांगितले. माजी विद्यार्थी माननीय श्री दीपकजी पुजारी यांनी आपल्या भाषणात सांगितले की माणूस जोडा म्हणजे देश जोडला जाईल. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे उप-मुख्याध्यापक माननीय श्री गवळे सर, पर्यवेक्षिका सौ. शिंदे मॅडम, माजी शिक्षक सौ. सुनीती जोशी, माजी विद्यार्थी श्री सुहास साठे, श्री पुष्कर जोशी, श्री हेमंत उत्तेकर, श्री सचिन जयवंत, श्री आनंद सराफ व श्री पराग गुजराथी, श्री योगेश शहा, श्री बारी व सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक श्रीमती जवळगीकर व सूत्रसंचालन आणि आभार सौ. चिप्पा मॅडम यांनी मानले.
म ए सो मुलांचे विद्यालय येथे पालखी सोहळा भक्ती भावात संपन्न.
दिनांक 16 जुलै 2024 मंगळवारी सायंकाळी चार वाजता विठ्ठल रखुमाई च्या प्रतिमांचे प्रशालेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे पूजन करण्यात येऊन सोहळ्यास उत्साहाने सुरुवात झाली. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पूजन श्री सायसिंग वसावे, प्रमुख पाहुणे केसरी क्रीडा विभागाचे संपादक विक्रांत कुलकर्णी, श्री चंदू गवळे, पर्यवेक्षिका विद्या शिंदेयांनी केले. अत्यंत उत्साहात सुरू झालेल्या या कार्यक्रमात प्रास्ताविकातून पर्यवेक्षिका सौ शिंदे यांनी वारीचा मिळणारा आनंद सर्वांना मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असे सांगितले. प्रशालेच्या शिक्षिका वर्षा चीप्पा यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. प्रशालेतील विद्यार्थी काळे वेदांत यांनी आपल्या सुमधुर आवाजात पाऊले चालती पंढरीची वाट हे भजन सादर केले. पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक या सोहळ्यात रंगून गेले. तर त्यांच्या रिंगणाने व टाळाच्या तालातील विठू माऊलीच्या गजराने वातावरण भक्तिमय बनले. सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका श्रीमती काळे यांनी केले.
दिनांक १३ जुलै २०२४ रोजी प्रशालेत गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.श्री अ.ल. देशमुख सर लाभले होते. तसेच प्रशालेच्या शाला समितीचे अध्यक्ष श्री दिलीप शेठ, प्रशालेचे महामात्र श्री सुधीर गाडे व प्रशालेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत आम्ही शाळेला विसरू शकणार नाही असे सांगितले प्रमुख पाहुणे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा मूलमंत्र सांगितला. प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री भालचंद्र महादेव भिडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री समीरजी भिडे यांनी एक शिष्यवृत्ती जाहीर केली. त्या शिष्यवृत्ती अंतर्गत इयत्ता दहावीतील विज्ञान व गणित विषयात एकुणात प्रथम व मागासवर्गीय गटात एकुणात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रत्येकी पाच हजार रुपयांचे शिष्यवृत्ती देण्यात आलली. या कार्यक्रमासाठी श्रीमती भिडे देखील उपस्थित होत्या.
व्यक्तिमत्व विकास केंद्रातर्फे इयत्ता आठवीचे सर्व वर्ग व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्त राहण्यासाठी सत्राचे आयोजन करण्यात आले होते . हे सत्र घेण्यासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे पदाधिकारी माननीय सौ. सोनाली काळे मॅडम उपस्थित होत्या. या सत्रामध्ये व्यसनाचे प्रकार, अमली पदार्थांचे व्यसन व वर्तनात्मक व्यसन कोणत्या प्रकारचे असते? व्यसनांमुळे शारीरिक मानसिक भावनिक आजारांची टक्केवारी व व्यक्तीवर होणारे दुष्परिणामांची माहिती व सध्याच्या वयोगटावर व्यसनाचे होणारे परिणाम याबाबत माहिती दिली त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाय व उपचार याची माहिती विविध उदाहरणे व पीपीटी च्या साह्याने मुलांना शास्त्रीय भाषेतून समजावण्यात आले. मुलांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली व सत्र पूर्ण झाले.
रविवार दिनांक ७ जुलै २०२४ रोजी आपल्या प्रशालेतील NCC च्या विद्यार्थ्यांनी पर्वतीटेकडीवर वृक्षारोपण केले. या प्रसंगी प्रशालेचे माननीय मुख्याद्यापक श्री. वसावे सर, प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री पराग गुजराथी व NCCच्या प्रमुख सौ मंजुश्री देशमुख मॅडम उपस्थित होत्या. यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. मुलांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी हा उद्देश होता.
शनिवार दिनांक 6जुलै 2024रोजी शैक्षणिक वर्ष 2023-24चा संस्कार या वार्षिक अंकाचा प्रकाशन सोहळा मा. मुख्याध्यापक सायसिंग वसावे यांच्या हस्ते संपन्न झाला. या समारंभास प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्रीयुत गवळे सर, पर्यवेक्षिका सौ विद्या शिंदे मॅडम यांसह पाचवी ते दहावीचा विद्यार्थी वर्ग, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. याच दिवशी शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील पहिला शिक्षण विवेक अंकाचेही प्रकाशन होऊन विद्यार्थ्यांना त्या अंकाचे वाटप करण्यात आले.
आषाढी वारीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका रायगडावरून पंढरपूरला जातात. श्री शिवछत्रपती पालखी सोहळ्यानिमित्त शनिवारी म.ए.सो. मुलांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (भावे हायस्कूल ) येथे शिवयोद्धा मर्दानी आखाडा मधील युवक युवतींनी दांडपट्टा, तलवारबाजी, भाला चालवणे आदी मर्दानी खेळ विद्यार्थ्यांसमोर सादर केले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये भक्ती आणि शक्तीची प्रेरणा जागावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू असल्याचे संदीप महिंद यांनी सांगितले.
शनिवार दिनांक 29 जून रोजी रोटरी क्लब, लक्ष्मी रोड अंतर्गत इयत्ता आठवी व नववी साठी प्रसिद्ध गिर्यारोहक माननीय श्री. उमेश झिरपे यांनी विद्यार्थ्यांना एवरेस्ट पर्वतावर चढाई करताना येणारे विविध अनुभव ,घ्यावयाची काळजी गिरीप्रेमी संस्थेचे कार्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . यावेळी रोटरी क्लब समन्वयक बर्वे मॅडम व व्यंकटेश्वरा हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जन जागृती अभियान
माननीय महासंचालक केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभाग नवी दिल्ली यांच्या सूचने नुसार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आज दिनांक २६.०६.२०२४ रोजी दुपारी ३.०० ते ०५.३० च्या दरम्यान सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेच्या प्रांगणात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला.
अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जन जागृती अभियानांतर्गत रेणुका स्वरूप प्रशाला ते सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेपर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात श्री.संदीपसिंह गिल पोलीस उपायुक्त पुणे शहर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. याप्रसंगी मा.श्री.संदीपसिंह गिल, यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगून व्यसनापासून दूर राहण्याचा मोलाचा संदेश दिला.
सदर रॅलीचा मार्ग रेणुका स्वरूप प्रशाला, भावे हायस्कूल, अलका टॉकिज चौक, सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला असा होता.
रॅलीचा सांगता समारंभ सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेत करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त श्री. सुधाकर ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती दिपाली भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक श्रीयुत घोडके, श्रीमती सुप्रिया पढेरकर पोलीस उपनिरीक्षक, श्री.फडतरे पोलीस उपनिरीक्षक तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सचिन आंबर्डेकर, कार्यक्रमाचे समन्वयक भावे हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री.पराग गुजराथी, मएसो मुलांचे विद्यालय, पेरुगेट भावे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सायसिंग वसावे, मएसो रेणुका स्वरूप गर्ल्स मेमोरियल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी कांबळे व सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ, उपमुख्याध्यापिका श्रीमती ज्योती खिरीड, पर्यवेक्षिका श्रीमती मार्गसिद्धा पवार, तिन्ही शाळांचे NCC विभाग प्रमुख व शिक्षक वृंद उपस्थित होते. पोलीस उपायुक्त श्री.सुधाकर ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना व्यायाम, खेळ व अभ्यासाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. तसेच व्यसनांपासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.घोडके यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याची आवश्यकता तसेच यामुळे होणारे सामाजिक दुष्परिणाम याविषयी माहिती दिली. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये समुपदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीमती मृणाल क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी मी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही, तसेच इतरांनाही व्यसनांपासून दूर ठेवीन अशा प्रकारची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.रोहिदास भारमळ, तर सूत्रसंचालन व आभार श्रीमती नलिनी पवार यांनी केले.
२१ जून २०२४ आंतरराष्ट्रीय योगदिन
21 जून 2024 रोजी प्रशालेच्या प्रांगणामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा. नगरसेविका सौ.गायत्रीताई खडके कार्यक्रमाचे व शाला समितीचे अध्यक्ष मा श्री.दिलीप शेठ क्रीडावर्धिनी समन्वयक श्री जयसिंग जगताप सर तसेच शाळेचे सर्व पदाधिकारी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना योग आहार याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी जीवनातील योगाचे महत्त्व सांगितले. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री.वसावे सायसिंग यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व व वर्षभर निरोगी आनंदी राहण्याकरता रोज योग प्राणायम व व्यायाम करावा असा संकल्प करण्यासाठी मार्गदर्शन केले. योग दिनाच्या कार्यक्रमाला 1000 विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी सहभागी होते अशा रीतीने योग दिन साजरा करण्यात आला.
शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी प्रशालेच्या प्र.ल.गावडे सभागृहात आगामी शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या संदर्भात सर्व शालेय पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी संकल्प घेऊन नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवात केली. पर्यवेक्षिका सौ विद्या शिंदे मॅडम यांनी संकल्पचा हेतू व्यक्त करून नववर्षाच्या सदिच्छा दिल्या. प्रशालेच्या शिक्षिका सौ. खिरिड मॅडम यांनी संकल्पाचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळा समितीचे अध्यक्ष व प्रशालेचे माजी विद्यार्थी एस.पी. कॉलेजचे माजी प्राचार्य श्री दिलीप शेठ यांनी आपल्या मनोगतातून संकल्पाच्या महत्त्वापासून संकल्प सिद्धीच्या वाटेवर येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगितले. आशावादी दृष्टीकोन ठेवून कार्यरत राहण्याचा संदेश दिला. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वसावे सर यांनी आपले विचार व्यक्त करताना सहकार्याचे महत्त्व सांगत आरोग्य राखण्याचा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे हा संदेश दिला. त्याचबरोबर वक्तशीरपणा, स्वयंशिस्त, कार्य तत्परता यांचे पालन करण्यास सांगितले विद्यार्थी विकासासाठी आवश्यक गोष्टींबाबत सविस्तर आढावा घेतला.
प्रशालेतील शिक्षकांच्या कलगुणांना वाव मिळण्यासाठी आणि कामाच्या धावपळीतून थोडा विरंगुळा मिळण्यासाठी २८ ऑक्टोबर ,२०२३ शनिवार रोजी प्रशालेमध्ये कोजागिरीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रशालेतील अनेक शिक्षक उत्साहाने सहभागी झाले होते. सादर कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशाळेतील शिक्षकांनी समूह काव्यवाचन, विनोदी नाट्यवाचन यामधून आपल्या कलगुणांचे प्रदर्शन केले. हसतखेळत आणि आनंददायी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी छत्र
पती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने भावे हायस्कूलमध्ये इ ५वी ते १०वी तील विद्यार्थ्यांना आधुनिक युगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची थोरवी ‘गोष्ट येथे संपत नाही’ या कथाकथनाच्या सदरात शिवछत्रपती मंडळाचे कार्यकर्ते श्री.सारंग मांडके व श्री. सारंग भोईरे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय रंजक रोमहर्षक, जोशपूर्ण अशा कथाकथनातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची थोरवी सांगितली.तसेच सध्याच्या जगात आपली संस्कृती, मायभूमीचा आदर, सन्मान करावा हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. श्री. अनासपुरे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री सय्यद सर, उपमुख्याध्यापिका मा. श्रीमती शर्मिला जोशी मॅडम पर्यवेक्षक मा. श्री. जायभाय सर उपस्थित होते.

‘रांगोळीचे रंग विज्ञानाच्या संगे’
विज्ञान दिनाच्या निमित्ताने प्रशालेत दरवर्षी विविध उपक्रम घेतले जातात. इयत्ता ५वी ते १०वीच्या वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात असतो. विज्ञानाचे महत्त्व समजावताना विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला, कौशल्याला वेगवेगळ्या पैलूंनी सादर करण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध होत असते. म्हणून सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इतर विषयांबरोबर विज्ञानाचा असलेला सहसंबंध शिक्षकांच्या मार्गदर्शनांनी व विद्यार्थ्यांच्या कलांनी रांगोळीच्या माध्यमातून सादर करण्यात आला. हिंदी, मराठी, भूगोल, इंग्रजी व इतर अनेक विषयांतर्गत विज्ञानाचा संबंध रांगोळीतून प्रस्तुत केला. आधुनिक जीवनात प्रत्येक विषयात विज्ञान असते हे या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातील बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचे भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले.
पालक आणि शिक्षक यांच्यातील स्नेह संबंध वाढण्यासाठी आणि आपुलकीचे नाते निर्माण होण्यासाठी २१ ऑक्टोबर २०२३ शनिवार रोजी प्रशालेमध्ये भोंडल्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. इयत्ता ५ वी ते १२ वीचे पालक, पालक प्रतिनिधी , सर्व शिक्षक वृंद आणि पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी होते. या कार्यक्रमाची सुरुवात हत्ती पूजनाने करण्यात आली. हत्तीचे पूजन केल्यानंतर भोंडल्याची माहिती सांगितली. त्यानंतर गाणी म्हणून फेर धरून भोंडला साजरा करण्यात आला. त्यानंतर दांडिया खेळण्यात आला. खिरापत म्हणून खिचडी देण्यात आली.

मनयुद्ध (माईंड वॉर) प्रश्नमंजुषा
दि. ४ मार्च २०२४ रोजी झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेड यांच्यामार्फत मन युद्ध (माईंड वॉर) स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा चि.नमन जैन यांने घेतली. इ.७ वी च्या वर्गातील ९० विद्यार्थ्यांची प्रथम सामान्यज्ञानावर आधारित चाचणी घेण्यात आली.त्यातून फक्त १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. नंतर दोन-दोन चे गट करून प्रश्नमंजुषा घेण्यात आली. विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले.

मराठी दिनानिमित्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी रोजी प्रशालेत विद्यार्थांसाठी ‘काव्यवाचन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी इ. ५ वी ते ७ वी व ज्यु. कॉलेजच्या १४ विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेचे विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रजांच्याच कवितांचे तालासुरात, लयबद्ध पद्धतीने उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी तबला व पखवाज यांच्या साथीने उत्कृष्ट कविता सादर केल्या.
यावेळी मराठी दिनाची माहिती श्रीमती उबाळे यांनी सांगितली; तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कुलकर्णी माया यांनी केले. यावेळी पर्यवेक्षिका सौ. शिंदे विद्या व ग्रंथपाल श्रीमती जवळगीकर उपस्थित होत्या.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या आठवणींना व त्यांच्या महान कार्याला उजाळा देण्यासाठी ३ ऑक्टोबर ,२०२३ मंगळवार रोजी प्रशालेमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन करून जुनिअर कॉलेजमधील इयत्ता १२ वी मधील चि.चैतन्य जाधव या विद्यार्थ्याने महात्मा गांधी यांची माहिती सांगितली व प्रणव कालेकर या विद्यार्थ्याने लालबहादूर शास्त्री यांची माहिती सांगितली. स्वच्छतेच्या प्रतिज्ञेचे वाचन
करून विद्यार्थ्याकडून आणि शिक्षकांकडून तसा शपथविधी पार पडला.

‘आम्ही भावेमय’
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा 2023-24
शनिवार दि. १३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी प्रशालेच्या प्रांगणात माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न झाला. शाळेची घंटा, सरस्वती वंदना यांनी सुरू झालेल्या या सोहळ्यात प्रशालेतर्फे खास माजी विद्यार्थी समिती स्थापन करण्यात आली. या मेळाव्यास डेक्कन कॉलेजचे माझी कुलपती मा. श्री गोरक्ष देगलूरकर सर, प्रख्यात लेखिका श्रीमती माधवी वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शाला समितीचे अध्यक्ष मा. श्री राहुल मिरासदार सर, प्रशालेच्या महामात्रा श्रीमती अश्विनी पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कीर्तीवंत व दिग्गज माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते श्री आनंद सराफ यांनी शाळेची घोषणा देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती कल्याणी जोशी व श्रीमती दिपाली बधे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री बाजारे सर यांनी केले. या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, तसेच बहुसंख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.

रोटरी क्लब तर्फे विद्यार्थ्यांना व्याख्यान
१० ऑगस्ट २०२३ रोजी इ. ८वी व ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब तर्फे व्याख्यान देण्यात आले. यावेळी डॉक्टर गौरी जोशी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या वयाच्या विविध अवस्था सांगून वय वर्षे १२ नंतर विद्यार्थ्यांना स्ट्रेस मॅनेजमेंट कसे करावे याचे त्यांनी स्लाईड शो मार्फत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे श्री. व सौ. शहा व श्रीमती गौरी जोशी यांचे सहाय्यक श्री नंद हे उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ बधे मॅडम यांनी केले.
लेखक आपल्या भेटीला
दि. ९ फेब्रुवारी २०२४ शुक्रवार रोजी प्रशालेत मुलांच्या भेटीला लेखिका श्रीमती मेधा इनामदार उपस्थित होत्या. त्यांनी मुलांशी संवाद साधून बडबड गीतांपासून ते कथा, कादंबऱ्यांचा प्रवास कसा असतो याबद्दल माहिती दिली. गाणी, कविता, गोष्टी, नाटक, सिनेमा, दूरदर्शन मालिका, अंतरजालातील मालिका अशा विविध प्रकारच्या लेखन प्रकाराबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती देशपांडे प्रज्ञा मॅडम कार्यक्रमास उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती चिप्पा मॅडम यांनी केले.

प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी एक ऑगस्ट 2023 निमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली यात प्रशालेतील इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी आणि ज्यु . कॉलेजमधील इयत्ता १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील विषय देण्यात आले होते. इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी व इयत्ता १२ वी च्या मुलांनी उत्कृष्टपणे तयारी केली व सादरीकरणही केले या स्पर्धेत प्रत्येक इयत्तेतून दोन विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. मुलांच्या अंगी वक्तृत्व कौशल्य, सभा धीटपणा आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी अश्या स्पर्धा उपयुक्त ठरतात.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वेगवेगळ्या विषयातील माहिती आणि ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी १४ ऑक्टोबर ,२०२३ वार शनिवार रोजी प्रशालेमध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त सामुहिक वाचन आणि पुस्तक परीक्षण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशाळेतील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होते. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची माहिती सर्व विद्यार्थ्यांना सांगितली आणि विद्यार्थ्यांनी एकाच वेळेला सामुदायिक वाचक केले. तर जुनिअर कोलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी वाचलेल्या अवांतर वाचनाच्या पुस्तकाचे त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांसमोर परीक्षण केले.
आंतरशालेय स्तरावर जिल्हा, राज्य स्तरावर विशेष कामगिरी
जिल्हास्तरीय आंतरशालेय ‘ड्रॉप रो बॉल’ स्पर्धेत चि. जाधव जयवर्धन, चि. ठाणेकर तन्मय व चि. पवार वरद यांनी ‘ट्रिपल इव्हेंट’ मध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. तसेच विभागीय स्पर्धेत पुणे शहर विभागाचे ‘ट्रिपल इव्हेंट’ मध्ये नेतृत्व करून द्वितीय क्रमांक पटकावला.
हायटेक टेक्निकल कॉलेज गाजियाबाद उत्तर प्रदेश येथे झालेल्या ‘सब ज्युनिअर’ या गटात ‘ट्रिपल इव्हेंट’ मध्ये महाराष्ट्रचे नेतृत्व करून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले.
जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय ‘फेंटबॉल’ स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे नेतृत्व करत ‘ट्रिपल इव्हेंट’ मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
इ.७वी क मधील चि. वरद विशाल पवार याने ड्रॉप रो बॉल जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत व निवड चाचणी २०२३ या स्पर्धेत ‘सिंगल इव्हेंट’ मध्ये तिसरा क्रमांक मिळवला. पुढे नायगाव सातारा येथे राज्यस्तरीय ड्रॉप रो बॉल स्पर्धेत ‘सिंगल इव्हेंट’ मध्ये सहभागी झाला. त्यातून पुढे राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड झाली.
प्रशालेतील १७ वर्षे वयोगटाचा कबड्डी संघ आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत सेमी फायनल मध्ये पोहोचले.
चि. दुबे अंश जितेंद्र ९वी मधील विद्यार्थ्यास जिल्हा क्रीडा परिषद पुणे व पुणे महानगरपालिका आयोजित कबड्डी स्पर्धेत निवड झाली.






























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































