२० फेब्रुवारी २०२५ - प्रशालेत मराठी भाषेचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
दिनांक 20/2/2025 गुरुवार रोजी प्रशालेत मराठी भाषेचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो
प्रशालेचे माननीय उपमुख्याध्यापक श्री गवळे सर जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री बागुल सर जुनिअर कॉलेज विभागाचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन केले सौ. वामन मॅडम यांनी बाळशास्त्री जांभेकर यांची माहिती सांगितली.
१८ फेब्रुवारी २०२५ - प्रशालेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी
दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याने आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आणि ग्रंथालयातील महाराजांच्या पुतळ्याचे पूजन प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री वसावे सर, ज्युनिअर कॉलेज विभागाचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी केले . सौ वामन मॅडम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती सांगितली.
जय भवानी ,जय शिवाजी!
















































































































































































